विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 5 March 2021

मराठा साम्राज्य विस्तार : १७०७ ते १७१९. भाग १

 


मराठा साम्राज्य विस्तार : १७०७ ते १७१९.
भाग १
लेखन माहिती :सुरेश जाधव
इतिहास माहितीकार
_______________________________
पार्श्वभूमी :
.................
१७०७ च्या दरम्याने परिस्थितीच अशी झाली होती की मराठ्यांच्या सततच्या आक्रमणामुळे मोगल त्रस्त झाले होते . अहमदाबादच्या संरक्षणासाठी नुकतीच मोठी खंडणी द्यावी लागली होती . छत्रपती शाहूंना कैदेत ठेऊन धोका वाढू लागला होता . दक्षिणेतही मोगलांना सुरक्षा आवश्यक वाटू लागली होती . अशावेळी शाहूंशी मैत्रीपूर्ण संबंध हाच एकमेव मार्ग होता . मोगलांना स्वतःच्या सुरेक्षेसाठी महाराज स्वतंत्र राहणे गरजेचे होते . शाहू मोगलांच्या प्रांतात आक्रमण करणार नाहीत आणि प्रसंगी मदतीला येतील असा भरवसा मोगलांना होता . अशा परस्पर समजुतीने शाहू महाराज महाराष्ट्रात आले .
तरीही प्रसंग कठीण होता . महाराजांच्या मातोश्री व बंधू मोगलांच्या ताब्यात होते . तरीही महाराजांनी आक्रमक भूमिका घेतली
यात त्यांची पूर्वतयारी दिसते .
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी १७०७ पासून लगेचच हालचाली करून विस्ताराची वाट मोकळी करून दिली . दिशा मिळताच
मराठा सरदारांनी सरस कामगिरी करून शाहूंचे धाडसी निर्णय यशस्वी केले . मराठा स्वराज्यावरील ही त्यांची निष्ठा होती .
खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक व माळवा स्वराज्यात आले .
चौथ , सरदेशमुखी वसुलीस सुरुवात करून आर्थिक नियोजनास दिशा दिली .
तरीही बरेच लहान मोठे लेखक मराठा साम्राज्य विस्ताराबद्ल व त्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेविषयी बोलताना ,
याने पाठिंबा दिला , त्याने सहाय्य केले अशी मांडणी करतात . पण वास्तव हे आहे की , कैदेत असतानाच छत्रपती शाहू महाराज प्रमुख मराठा सरदार व राजपूत राजे यांचे संपर्कात होते .
महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर मेवाडचे महाराणा , सवाई जयसिंग व अजितसिंह यांनी एकत्र येऊन सवाई जयसिंगामार्फत पत्र लिहून त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती . त्यासाठी आपल्या पूर्वजांच्या एकमेकाशी असलेल्या स्नेहबंधांची आठवणही करून दिली . हा शाहूंबद्दलचा त्याचा आत्मविश्वास म्हणजे त्यांच्या समर्थ नेतृत्वाची कबुलीच आहे .
महाराष्ट्रात आल्यावर त्यांना येऊन मिळाले ते मराठा साम्राज्याचे निष्ठावंत राजसेवक होते . शाहूंचे नेतृत्व आणि सामर्थ्य जाणूनच ते शाहूंसोबत होते . वारसाहक्काने राज्य छत्रपती थोरले शाहू महाराज यांचेच होते .
शाहूंकडे जे आले त्यांच्या कर्तबगारीला राजाश्रय मिळाला . शाहूंचे नेतृत्व , आर्थिक पाठबळ , पूर्वनियोजित रणनीती याने जे आले त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला , ते यशस्वी झाले . राजाच्या सेवेतच राजाने दिलेल्या पदाच्या अधिकारात कर्तृत्व उजाळले .
शाहूंबद्दल अनेकांनी आशीही आवई उठवून दिलीय की त्यांनी बादशहाचे मांडलिकत्व मान्य केले होते . पण राज्यविस्तारासाठी केलेली व्यूहरचना पाहता त्यात काही तथ्य दिसत नाहीय . छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मोगलांची पर्वा न करता साम्राज्य विस्तार केला हे निर्विवाद सत्य आहे .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...