विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 5 March 2021

माचणूर किल्ल्याच्या परिघातलं "श्री सिद्धेश्वर मंदिर." आणि औरंगजेब

 




माचणूर किल्ल्याच्या परिघातलं "श्री सिद्धेश्वर मंदिर." आणि औरंगजेब
सोलापुर जिल्हा..
ऐतिहासिक पार्श्वभुमीनं नटलेला महाराष्ट्राचा एक महत्वपुर्ण भाग.
दख्खन गिळायला मोठ्या दिमाखात निघालेला आलमगीर औरंगजेब मराठ्यांच्या भितीनं याच जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरीला तळ ठोकुन बसला.
सरसेनापती संताजी घोरपडेंच्या छापेमारीला धास्तावुन माचणुरला त्यानं किल्ला उभा केला.
जो पर्यंत मराठ्यांचा संपुर्ण नायनाट करत नाही तोपर्यंत कोणत्याही सुखसोईचा अंगिकार करणार नाही अशी शपथ औरंगजेबानं याच माचणुरच्या किल्ल्यात घेतली.
स्वतःला तैमुरलंगाचा वंशज मानणार्या हिंदुस्थानच्या बादशहाला आलमगिर औरंगजेबाला मराठ्यांनी पाच वर्ष जमिनीवर झोपायला भाग पाडलं या महत्वपुर्ण इतिहासाचा साक्षीदार असणारा माचणूर किल्ला..
याच माचणूर किल्ल्याच्या परिघातलं "श्री सिद्धेश्वर मंदिर."
हा भाग जिंकल्यानंतर औरंगजेबानं याच सिद्धेश्वर मंदिरातल्या शिवलिंगाला उद्ध्वस्त करण्यासाठी हशम पाठवले असता भुंग्यांनी हशमांवर हल्ला केला.
औरंगजेबानं यावर चिडून मांसाचा नैवेद्य श्री शंकराला पाठवला असता मंदिरात त्या मांसाच्या ताटावरील वस्त्र हटवले असता मांसाऐवजी फुले दिसली.
अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.
मांसाचा नूर पलटला म्हणुन मासनूर असे या प्रदेशाचे नाव पडले,पुढे मासनूरचा अपभ्रंश होत होत ते 'माचणूर' झाले.
शेवटी खजिल झालेल्या औरंगजेबाने याच सिद्धेश्वर मंदिराला 400 रुपये व 6 रुपये अशी दोन वर्षासने चालू केली.
आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला 480 रुपये वर्षासन मिळते.
अशी या श्री सिद्धेश्वराची कहाणी..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...