विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

हिंमतखान संताजींच्या मागावर

 


हिंमतखान संताजींच्या मागावर
मराठ्यांची घोडदौड हा काय प्रकार आहे आणि त्यांच्या मागे धावताना कमरेची हाडे कशी ढिल्ली होतात याचा अनुभव घेत घेतच ह्या हिंमतखानाचा बाप खानजहान हा म्हातारा झाला होता. आता तोच अनुभव त्याचा चिरंजीव हिंमतखान घेत होता.

हिंमतखानाला गरा गरा फिरविण्याच्या नादात मुघलांच्या फौजा जितक्या पांगविता येतील तितक्या त्या दूर पांगवाव्यात असे संताजींचे धोरण होते. संताजीराव त्यांच्या ह्या व्युव्हरचनेत यशस्वी झाले.
ह्या व्युव्हरचनेला इंग्रजीत 'Divided we fall' असे म्हणतात. ( म्हण अशी आहे: United we stand, divided we fall )
पाठलागावर पुढे जात ह्या हिंमतखानाने चितापूरजवळ असलेल्या अलूरच्या गढीत संताजींला कोंडले आणि गढीला वेढा दिला. इतकेच नव्हे तर हिंमतखानाने त्या
परिसरातील जमीनदारांकडून 'आम्ही संताजींस पळून जाण्यास मदत करणार नाही' असे मुचलके लिहून घेतले.
पण तरीही संताजीराव वेढा फोडून निसटलेच,
संताजींचा पाठलाग करत करत हिंमतखान ६ मार्च १६९४ रोजी थेट आंध्र प्रदेशातील कालकुर्ती भरम येथे पोहचला. ह्यावेळी पाठलागावरच्या लढाया सारख्या चालूच होत्या.
संताजींने ह्या हिंमतखानाला असेच महिनाभर आपल्यामागे फिरवत फिरवत आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे साताऱ्याजवळील महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला आणले.,,
#हर_हर_महादेव
#स्वराज्यनिष्ठा
#स्वामीनिष्ठा
#सरसेनापती
#संताजी_घोरपडे
#घोरपडे_घराण्याचा_इतिहास

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...