विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

कुरुंदवाड येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी

 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका व या तालुक्यामधील कुरुंदवाड हे गाव . साखरेच्या गोडव्याने व कृष्णा-पंचगंगेच्या अमृतधारेने संपन्न असा हा परिसर ज्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे .नृसिंहवाडीच्या मुख्य मंदिरापासून हाकेच्या अंतरावर


कुरुंदवाड येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे . या समाधीकडे जात असताना उजव्या बाजूला संताजी घोरपडे यांच्या पर्वजांनी बांधलेले महाभारतातील सुब्रह्मण्येश्वर या इंद्राचा सेनापतीचे व शिवशंकराचे पुत्र असणारे कार्तिकेय स्वामी यांचे मंदिर नजरेस पडते .
प्रभू रामचंद्र यांचे पुत्र लव याचे घराणे म्हणून घोरपडे घराणे प्रसिध्द आहे .हे घराणे स्वतःच्या कर्तबगारीवर नावारूपाला आले व त्यांनी स्वराज्याची सेवा देखील केली . भारतातील सात प्रमुख प्रयाग तीर्थांपैकी एक असे हे तीर्थ आहे . श्रीसुब्रह्मण्येश्वराचे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून सुबक असे आहे .मंदिराच्या भिंतींवर काही शिल्पे देखील आहेत.सध्या ह्या मंदिराचे रंगकाम झाले आहे . या मंदिरामध्येच शिवपुत्र राजाराम महाराज सरसेनापती संताजी घोरपडे व बंधू बहिर्जी-मालोजी यांनी स्वराज्यकार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची व एकमेकांत वितुष्ट न येऊ देण्याची शपथ घेतल्याची कथा इथे सांगितली जाते त्यामुळे या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित आहे .
मंदिर छोटेखानी असून मुख्य देवता श्री शिवशंकर आहे .शेजारी कार्तिकेय आहेत ज्यांचे दर्शन बारा महिने महिलावर्ग घेऊ शकतो. मंदिराच्या समोर घाटाच्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर संगमाच्या काठावर सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी आहे .कारखेल येथे त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई यांनी संताजीरावांचे पार्थिव येथे आणविले व चूड दिला .येथील घाटाची रचना , बांधकाम ,छोट्या देवळ्या पाहण्यासारख्या आहेत .प्रत्येक शिवप्रेमीने इथे येऊन श्रीशिवाचे व सरसेनापतींच्या समाधीचे दर्शन घ्यावेच.

लेखन व छायाचित्रे : @abhijeet_shinde_sarkar99

माहिती साभार :
उदयसिंह बाबा घोरपडे (सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे विद्यमान वंशज, सेनापती कापशी.)
माहिती फलक , मंदिर परिसर व संबंधित सर्व

विशेष टीप : सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी :
१ संताजी : काका विधाते
२ सेनापती संताजी घोरपडे : डॉ. जयसिंगराव पवार

Follow 👇👇
@sarsenapati_santaji_ghorpade

#संताजी_घोरपडे #संताजी_नावाचे_वादळ🔥
#सरसेनापती #स्वराज्यनिष्ठा #स्वामीनिष्ठा
#स्वराज्य_चरणी_तत्पर_घोरपडे_घराणे_निरंतर
#घोरपडे_घराण्याचा_इतिहास

#santaji_ghorpade #santajighorpade
#sarsenapati

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...