२८ जानेवारी १६४५
स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली
【पत्राचा मराठीत अनुवाद】
राजेश्री सिवाजीराजे दामदौलत ज्यानिब कारकुनानी हाल व इस्तकबाल देसमुखानि व देसकुलकर्णियानी तर्फ खेडेबारे बिदानद के सुहुरसन सीत अर्बैन अलफ बावाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांजे तर्फ मार हा मौजे मारची मोकदमी करित असता यासपासुन काही बद अमल जाला हे हकिकत हूजूर साहेबाशी विदित जाली. त्यावरून बहुकुमी तलब करुन साहेबी हुजुर आणुन वाजपुस करिता खरे जाले याकरिता बावाजी याची वतनी मोकदम हुरुर अनामत केली. बावाजीचे हातपाय तोडून अनामत केला ते वरुती सोनजी गुजर किले पुरंधर हे जनात गोत म्हणुन येउन अर्ज केला. जे आपले हाती देणे बराय अर्ज खातिरेस आणुन बावाजी मार याचे माथा गुन्हेगार होन पा तीनसे करार केले ते सोनजी मार याने देउन बावाजीस हाती घेतले. याचे पोटी संतान नाही हे कुळीचे गुजर होउन साहेबी मेहेरबान होउन मौजे रांजे ता माची मोकदमी सोनजी बीन बयाजी गुजर याचे दुमाला करून याजपासून दिवाणात सेरणी होन पा दोनसे होन करार करून घेउन मोकदमी त्यास दिधली. असे यास कोणी मुजाहीम न होणे असल पत्र फिराउन भोगवटियास देणे.
उजुर न करण.
.|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||
No comments:
Post a Comment