कांडली (हदगाव) व तळेगाव (उमरी) इथले देशमुखांचा वाडा
पोस्ट सांभार :अमित वानखेडे
शिवाजीराव देशमुख, कांडली (हदगाव) ४ एकर मध्ये पसरलेला प्रशस्त दुमजली वाडा, या वाड्यास ४ बुरूज या बुरूजावर १६ लोक रखवालीला, ३० ते ४० मजुर घरकाम करायला होती. २७०० एकर जमिनीचे मालक, कुळात सगळी जमीन गेली. सध्या ४०० एकर जमिन ते वाहतात. परंतु स्वभाव अगदी साधा सरळ, आजुबाजुच्या गावातल्या लोकांकडून या वाड्याच्या मालकाच्या चांगल्या स्वभावाच्या अनेक किस्से एकायला मिळाले. सद्या ४०० एकर जमिनीचे मालक स्वतः सगळे काम करतात. मनुष्यबळ पहिल्या सारखे मिळत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मोहनराव देशमुख, तळेगाव (उमरी) उमरी स्टेशन पासुन जवळच असलेले हे गाव, ९ एकर ७ गुंठ्यात हा वाडा आहे. वाड्याच्या भिंतीवरून एका वेळेस दोन कार चालतील एवढ्या मोठ्या भिंती व वाड्याला ५ बुरूज आहे. आजही अगदी सुस्थितीत असलेला वाडा या बाबत मालकाची स्तुती करावी तेवढी कमी, साडे छत्तीस गावाचे हे जमीनदार निजामशाहीत या वाड्यावरुन या भागातील सर्व कारभार चालायचा. मोहनरावांचे वडील मा. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे जिवलग, नांदेडला अशोकरावांच्या घराजवळच यांचे आजही घर आहे. सद्या १५५ एकर सलग त्यांच्या वाड्यापासुन ते माळापर्यत देशमुखांची जमीन आहे. गावातल्या बसस्टॉप वर जरी भांडण लागली तर देशमुखांच्या माडीवर स्पष्ट आवाज येतो अशी वास्तुकला आहे. ४० घोड्यांचा तबेला, दिवानखाण्यात मोठे २ भुयारघर व या भुयारघरातुन ७ किमीचा भुयारी रस्ता, वाड्यात येण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे. हत्तीने किंवा माणसे लाकडी ओंडक्याने दरवाजा तोडता येऊ नये म्हणुन उत्कृष्ट अशी वास्तुकला येथे बांधणार्यांनी दाखवली आहे. छोट्या छोट्या गोष्टी लिहायला गेल तर कितीतरी विशेष गोष्टी या वाड्याविषयी लिहता येतील.
दोन्ही वाड्यातील नविन पिढ्या आता जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात सध्या लॉकडाऊन मुळे गावाकडे आले आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे पुरातत्व खात्याने याच्या संवर्धनासाठी काहीतरी पावले उचलणे आवश्यक आहे. कालांतराने नाहीतर हा ठेवा मातीत मिसळुन जाणार...
No comments:
Post a Comment