विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 March 2021

सिन्नर तालुक्यात देवपूर गावात स्वामीनिष्ठ सेवक राणेखान मकबरा (समाधी)....

 


सिन्नर तालुक्यात देवपूर गावात स्वामीनिष्ठ सेवक राणेखान मकबरा (समाधी)....
नाशिकच्या नसानसांत ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची आणि ते जपण्याची गरज आहे असे सिन्नर तालुक्यातील देवपूर हे गाव पाह‌िलं की वाटायला लागतं राणेखाणाचे शौर्य भागवतबाबांची महती अन शाहिरांची गुरूभूमी या इतिहासाने देवपूर सजले आहे मात्र देवपूरचा हा प्रवास अस्वस्थ तर करतोच पण नाशिकचा वारशाची स्थिती पाहून ह्दय पिळवटून टाकतो..
देवपूर आणि राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे त्यामुळे हा इतिहासही जाणून घेणे रोमांचक ठरते १४ जानेवारी १७६१ ला अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्घ झालं या युद्धात नानासाहेब पेशव्यांबरोबर १२-१३ वर्षांचे अगदीच नवखे महादजी शिंदे सहभागी झाले होते मात्र मराठ्यांचे पानिपत होऊ लागलं ‘पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां महादजीही परत फिरला.ल वाटेत एका पठाणाने त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असता राणाखान (राणेखान) नावाच्या एका मराठे लष्करातील माणसाने त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणले त्याबद्दल खानास महादजीने भाऊ मानून व पुष्कळ इनामे देऊन योग्यतेस चढविले...’
असा उल्लेख इतिहासाच्या पानात मिळतो राणेखान एक पखाली (पाणी वाहणारा) होता।जखमी अवस्थेतेतील महादजींना त्या धामधूमीतून राणेखानाने पुन्हा आपल्या मुलखात आणल राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इनाम म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते गावची जहागिरीही दिली राणेखानास देवनदीचा सहवास आवडल्याने त्याने वास्तवासाठी देवपूरची निवड केली आता पर्यंत एवढाच राणेखानाचा इतिहास सांगितला जातो मात्र राणेखानाच्या पराक्रमांची अनेक उदाहरणे इतिहासात नोंदविलेली आहेत...
राणेखान २२ डिसेंबर १७९१ ला कायमचा देवपूरच्या मातीत एकरूप झाला राणेखानाचा मृत्यू हा देखील अज्ञात इतिहास आहे देवनदी काठावरील राणेखानाच्या महालाच्या प्रवेशद्वारासमोरच नदीपलीकडे राणेखानाने आपले आई-वडील आणि नर्तकी यांच्या कबरीसाठी बडाबाग नावाची शाही कब्रस्तान तयार केली होती।या बडाबागेतच नंतर राणेखानाची दगडी बांधणीची व नक्ष‌ीकाम केलेली सर्वात मोठी व सुंदर कबर आज पहायला मिळते बडाबागेला किल्ल्यासारखा पूर्व दरवाजा आहे या दरवाज्यात उभे राहिले की राणेखानाची हवेली दिसते मात्र बडाबागेभवतीचा भक्कम कोट पडला आहे अनेक कबरींची नासधूस झालेली दिसते राणेखानाची कबर एक मराठा-मुस्लिम वास्तुशैलीचा उत्तम उदाहरण आहे...
माहिती रमेश पडवळ..
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : Bhojraj Sampatrao Gaikwad Patil ♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...