यवतमाळ जिल्ह्य़ातील टिपेश्वर अभयारण्यात निघालो होतो. दारव्हा वरुन यवतमाळ ला जातांना रस्त्यावरच माहुली नावाचे छोटे गाव लागले. गावाच्या मधोमध असलेल्या हवेलीने लक्ष वेधले आणि गाडी थांबवून पाय कळत नकळत हवेली कडे वळले. हवेली म्हणजे छोटा राजवाडाच होता तो. सौंदर्य पाहण्याराच्या दुरूष्टिकोनात असते. म्हणतात ते जुने पिढीजात सौंदर्य पाहुन अगदी भारावून गेलो होतो. दौलत खूप लोकांजवळ असते परंतु एक तर ती खर्च करण्याची वृत्ती हवी आणि दुसरे म्हणजे अमुक वस्तू अमुक ठिकाणाहून आणुन अमुक ठिकाणी बसविणे ह्या गोष्टीसाठी रसिकता हवी. हवेली तशी निर्मनुष्यच होती. परंतु इतके अमूल्य सामान बेवारस पडले होते. विशेष म्हणजे तेथील काही दालने ऊघडीच होती म्हणून हवेली च्या आतल्या गोष्टी आम्हाला पहावयास मिळाल्या. कदाचित रात्रीस कोणी चौकीदार राहत असावा. हवेलीमधील प्रत्येक वस्तू अप्रतिम आहे. दरवाजे, खिडक्यांच्या पटांचे रंगीत काच, कोरीव टेबल व खुर्ची, बंगळी (बंगयी), बैठकीतील झूंबरे, तावदाने फरशी, भिंती, कपाटे, कोरीवकाम केलेले सागवानी पलंग, लहान मुलांचे पाळने सब कुछ बेहतरीन. वरच्या बैठकीतील त्यांच्या घराण्यातील लोकांचे फोटो घराण्याचा दबदबा कायम ठेवतात. हवेलीचे प्लॅनिंग ईतके जबरदस्त की आधुनिक इंजिनिअर ला सुद्धा थोडा विचार करायला लावणारे. हवेली चे वारसदार हल्ली नागपूर व मुंबई ला स्थाईक झाल्याचे कळले. परंतु इतक्या सुंदर इमारत चे संवर्धन व्हायला हवे असे मनोमन वाटते.
(माहिती आणि फोटो - संदीप सरडे)
No comments:
Post a Comment