विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

२० मार्च १७६१... The last Maratha's in Panipat.

 











२० मार्च १७६१...
The last Maratha's in Panipat...
बलुचिस्तानमधील सुई प्रांतात आज मोठ्या संख्येने मराठा समुदाय आहे. मराठा समुदाय जवळजवळ २०० वर्ष बलुचिस्तानमधील विविध आदिवासी मध्ये गुलाम म्हणून राहिला गेला. मुस्लिम सरदारांच्या पदरी राहिल्यामुळे यापैकी जवळजवळ सर्वच मराठ्यांचे धर्मांतर झाले आहे. मुस्लिम होऊनही नावापुढे मराठा शब्द आजही ते अभिमानाने लावतात. बलुचिस्तानमध्ये आढळणारा मराठा समाज हा मुळचा महाराष्ट्रीयन असून पानिपतच्या युध्दानंतर अहमदशहा अब्दालीने याने अंदाजे २२००० हजाराहून अधिक मराठा युध्द कैद्यांना बंदी बनवून सोबत नेले होते (तारीख २० मार्च १७६१). याचा उल्लेख ‘सियार उल मुत्ताखिरीन’ या इतिहासकाराने केलेला आहे. पानिपतच्या युध्दातील मराठा युध्दकैदी, बलुच सरदार मीर नासीर खान यांस अब्दालीने युध्दाचा मोबदला म्हणून दिले. मराठा युध्दकैद्यांना एकत्र ठेवले तर ते बंड करतील या भितीने बुगती, रायझानी, गुरचानी, मझारी अशा अनेक आदिवासी जमातींमध्ये मीर नासीर खानाने त्यांना गुलाम म्हणून ठेवले होते...
१९४८ साली बुगती जमातीचे मुख्य सरदार नबाब अकबर खान बुगती यांनी मराठ्यांना गुलामगिरीतून मुक्त केले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर मराठा समाजाने शिक्षणात मजल मारून विविध ठिकाणी व्यवसाय तसेच नोकरीमध्ये आपले बस्तान बसविलेले आहे आज बलुचिस्तानातील प्रसिध्द पेट्रोलियम कंपनी, सुई पेट्रोलियम मध्ये आज बहुसंख्य मराठा नोकरीस आहेत.आजही मराठा समाज बुगती समाजाच्या विविध जमातीवरून ओळखला जातो...
‘The Tigers of Baluchistan’ या पुस्तकाच्या लेखिका ‘Sylvia Matheson’ यांचे पति सुई पेट्रोलियम या कंपनीत नोकरीस होते तेथे त्यांनी नोकरीस असलेल्या मराठ्यांच्या शोषणाबद्दल आपल्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. त्या म्हणतात की आज मराठे आज हिंदू राहिलेले नसून ते मुस्लिम झाले आहेत. बुगती लोकांनी त्यांच्या स्त्रियांचे शोषण केले असून ते त्याबद्दल आवाजही उठवू शकत नाहीत. त्या म्हणतात, ‘In Sui Petroleum employees were the Mrattas (Maratha) who were not really Bugtis at all but descendants of Hindu prisoners captured in past battles and enslaved by the Bugtis. By now the Mrattas were Muslims and had quite a lot of Bugti blood as their women were regarded as fair game for all Bugtis. No male Marattas dare so much as glance at a Bugti women. There was no tribal law that forced an Mratta (Maratha) to stand by and watch a non-Bugti molest his women folk. Any Bugti could take an Mrattas woman at will and her husband dared not complain. Mrattas could be bought and sold like cattle.
सुई कंपनीतील मराठ्यांच्या स्थितीबद्दल त्या लिहितात, Once a week, two Mrattas walked with a load of mail some forty miles from Dera Bugti to Sui, collected the incoming mail and walked back again, leaving Dera at about three in the morning and arriving at Sui about eight a.m. They stayed in the gas field all day and walked back in the cool of the night. Eighty miles in one day is not bad going by anyone’s reckoning, and until the coming of the natural-gas company, they had been walking a further thirty-five miles on to Kashmor and back again! ‘Surely they could use a horse?’ I asked once, and Sardar Ahmad Nawaz, the Chieftain’s younger brother who had been telling me about them, looked at me with an amused smile. ‘They’re only slaves’, he explained. ‘They’re used to it. Why on earth waste good horses when they can just as easily walk’.
एका मराठा गुलामाने आपल्या मालकाबरोबर अवघड कडा चढण्याची पैज लावून तो कडा चढला व स्वत:ची गुलामगिरीतून सुटका करून घेतलेले वर्णन लेखिकेने केलेले आहे, ‘Mratta slave had gained his freedom as the result of a bet his master had made ’.
बुगती समाज भटका असल्यामुळे त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी साहु (शाहु) मराठा समाजास शेतीचे ज्ञान अवगत असल्यामुळे शेती करण्यासाठी मोकळीक दिलेली होती. साहु मराठा पुर्वीपासुनच स्वतंत्र होता. आज बलुचिस्तानसारख्या बंजर भागात या साहु मराठा समाजामुळेच शेती विकसित झालेली आहे. रंगवानी, पेशवानी, गढवानी, किलवानी अशा सातहुन अधिक पोटजाती या समाजात आहेत. काही जाती या सरदारांच्या नावावरूनही आहेत.
बलुचिस्तानमधील मराठ्यांच्या खान-पान, लग्नातील विधी, त्यांचा पेहराव, दागिने, जेवण बनविण्याच्या पध्दती यावर आजही महाराष्ट्राची छाप आहे. आजही त्यांच्या लग्नातील नाच-गाण्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण बाज आढळतो. लग्नामध्ये मुस्लीम असुनही हळद लावणे, घाना भरणे तसेच नवरीच्या बहिणीला पैसे देणे, एकमेकांची नावे घेणे अशा अनेक विधी आजही तेथे प्रचलित आहेत. जेवण बनविण्याच्या पध्दती पाकिस्तानातील इतर लोकांपेक्षा पुर्णत: वेगळ्या आहेत. पारंपारिक कपडे,दागदागिने त्यांचे वेगळेपण दाखवतात. मुस्लिम असूनही ते बुगती समाजाच्या अनेक पोटजातीमध्ये आईला संबोधन्यासाठी, ‘आई’ हाच शब्द वापरला जातो. बुगती मराठ्यांचे खाण्याचे पदार्थ बलुचिस्तानमधील खुप प्रसिध्द आहेत. चुलीवर बनविण्यात येणार पाव ज्याला ‘काक’ किंवा ‘स्टोन ब्रेड’ असेही म्हटले जाते, तो सर्वात प्रसिध्द आहे. लग्नामध्ये वयस्कर व्यक्तिना मान देण्यात येतो त्यांच्यासाठी पारंपारिक स्वंयपाक बनविला जातो बलुच मराठा मुलींचे दागिने, कपडे वैशिष्ट्यपुर्ण असतात...
--------------
- इतिहासतज्ञ दामोदर मगदूम सर...🙏♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...