मुस्तफाखान, अफजलखान आणि बाजी घोरपडे या तिघांबद्दल शिवरायांना अत्यंत चीड होती. मुस्तफा आपल्या मरनाने पूर्वीच मेला होता. अफजल खानाला फाडून काढून आई वडीलांची मोठी हौस महाराजांनी पार पाडली होती. पण उरला होता फक्त बाजी. वडीलांच्या हयातितच बाजीला ठार मारायचा महाराजांचा हेतु घडू शकला नाही. "स्वधर्म साधनता सोडून यवन दुष्ट तुरुकहाचे क्रुत्यास अनुकूल होऊन दगाबाजी चे हुनरे करून बाजींनी जन्मभर वर्तन केले होते. वडीलांची महाराजांस अशी आज्ञाच होती की "त्यांचे वेढे घ्यावे " आण आमचे मनोदय शेवटास नेणार तुम्ही सुपुत्र निर्माण आहा. वेढे म्हणजे सूड म्हणूनच बाजी घोरपडे मुधोळहून निघण्याआधीच आपण मुधोळ गाठायचे असा कष्टाचा व तितकाच धाडसी विचार महाराजांनी केला.
खासा शिवाजीराजे मुधोळवर येवून वज्रासारखा आपल्यावर कोसळेल अशी बाजी ला पुसट कल्पनाही नव्हती.
महाराज एकदम मुधोळवर चालून निघाले. पोहचले. आणि अकस्मात मुधोळात घुसले. गावात एकच गोंधळ उडाला.शिवराय आल्याची बातमी बाजी ला कळताच तो सापासारखा उसळला. होती नव्हती तेवढी फौज घेऊन तो महाराजांवर चालून आला.
राजांच्या हातात भवानी तलवार व डाव्या हाती ढाल होती. आज ते वारुळातच घुसले होते. त्यांचा आवेश विलक्षण होता. बाजी धावून आला. समोरून महाराज धावून येत होते. दोघेही चवताळुन एकमेकावर तुटून पडले. महाराजांच्या व बाजीच्या फौजांचीही घोर लढाई जुंपली.
क्षणापुर्वी शांत असलेले मुधोळ आता रक्त ओकत होते.
एवढ्यात महाराजांच्या भवानीचा खाडकन घाव बाजीवर पडला. खसकन तलवार बाजींच्या देहात घुसली. अखेरचा चित्कार उमटला. हेलकावे खात बाजीची घटका बुडाली. बाजी ठार झाला. महाराजांच्या हातून खुद्द मुधोळांतच बाजीला मरण भोगायचे होते. त्याच्या रक्ताने महाराजांची तलवार लाल झाली होती. संतुष्ट झाली होती. शहाजीराजेंचे खरे श्राद्ध आज बाजीच्या मरणाने पार पडले होते.
जय शिवराय.....
No comments:
Post a Comment