जिंजीच्या वेढ्याची समाप्ति!
शके १६२० च्या फाल्गुन शु. ७ रोजी सात वर्षेपर्यंत रेंगाळत राहिलेला जिंजीचा वेढा संपून झुल्पिकारखानास जिंजी हस्तगत झाली !
राजाराम राजे जिंजीस गेले आहेत असे पाहून २९-८-१६९० रोजी झुल्पिकारखानाने जिंजीस वेढा घातला. सातआठ वर्षेपर्यंत अनेक प्रकारचे संग्राम झाले. महाराष्ट्र व.जिंजी या दोनहि ठिकाणी लक्ष पुरवितांना बादशहास नकोसे झाले. आपला मुलगा कामबक्ष व झुल्पिकारखानाचा बाप आसदखान या दोघांना आणखी फौज देऊन बादशहाने जिजीत पाठविले. यामुळे फायदा न होतां झुल्पिकारखानास राग येऊन वेढ्याच्या कामांत ढिलाईच निर्माण झाली. इकडे रामचंद्रपंतांनी संताजी व धनाजी यांचेबरोबर तीस हजार फौज दिली व त्यांना कर्नाटकांत पाठविले. त्या दोघांनी मोंगली फौजेचा पराभव केला. बादशहाच्या सैन्यांत फारच अनवस्था माजली.. त्यांना दाणावैरणहि मिळण्याची मारामार पडली. कर्नाटकांत सर्वत्र बादशाही फौजेची नाचक्की होऊन मराठ्यांचा अमल सुरू झाला. तरी मोंगल मधून मधून डोके वर काढीतच. सन १६९७ च्या सुमारास झुल्पिकारखानाने पुनः उचल खाऊन वेढ्याच्या कामास जोमाने प्रारंभ केला. जिंजीस राजाराम राडे अडकले गेले. त्यांची सुटका आतां होणे जरूरीचे होते. खंडोबल्लाळाने शिर्के यांना विश्वासात घेतले. त्यांची समजूत काढली की, "तुमचे शिरकाण केले तसेच आमचे तीन पुरुष हत्तीच्या पायाखाली मेले; परंतु हिंदूंच्या दौलतीकरितां आम्ही झटतच आहोत.” दाभोळचे वतन मिळतांच शिर्के राजारामादि मंडळींना मदत करण्यास तयार झाले. मोहितेहि त्यांच्या साह्यात आले व त्यांनी राजाराम महाराजांस बुरख्याच्या पालखीत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असे सांगून स्वतःच्या गोटांत आणले! त्यानंतर राजाराम राजे वेलोरास आले. तेथून धनाजी जाधवींनी त्यास महाराष्ट्रात आणले. इकडे फाल्गुन शु. ७ रोजी जिंजी झुल्पिकारखानाच्या हाती आली. पण एवड्या प्रचंड लढ्याचा काय उपयोग ? राजाराम राजे आधींच निघून गेले होते
-७ फेब्रुवारी १६९८
No comments:
Post a Comment