जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली तेव्हा तिच्या मदतीला धावला महाराष्ट्र.. इतिहासाची पाने उलगडताना अगदी आजपर्यंत याचे दाखले मिळतात असाच एक दाखला भारत इतिहास संशोधक मंडळाने जतन केला आहे दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना दिल्लीची जबाबदारी अक्षरशः आमंत्रण देऊन सोपवली होती याचा पुरावा असणारे एक अस्सल फर्मान मंडळात आहे..,
निपतच्या लढ्याच्या आधीच्या दहा वर्षांतले हे फर्मान असल्याने त्याला आगळे महत्त्व आहे सन १७५४ ते १७५९ या काळात मुघल बादशहा दुसरा अलमगीर अझिजुद्दिन महंमद हा दिल्लीच्या तख्तावर होता १७४७ पासून अहमदशहा अब्दालीच्या भारतावरच्यास्वाऱ्या सुरू झाल्या होत्या पानिपतचे युद्ध होईपर्यंत म्हणजे १७६१ पर्यंत अब्दालीने भारतावर एकूण पाच वेळा स्वारी केली..
त्यातल्या चौथ्या मोहिमेनंतर राघोबादादांनी अब्दालीच्या मुलाला तैमूरला पळवून लावत अटकेपार मराठी राज्याचा झेंडा फडकवला त्यानंतरच्या अब्दालीच्या स्वारीत घडले ते ‘पानिपत’ दरम्यानच्या काळात दिल्लीचा मुघल दरबार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता वास्तविक पाहता १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा उत्तरेतला प्रभाव वाढत होता त्याला कळस चढला तो १७ व्या शतकातल्या सहाव्या दशकात १७५४ ते १७५९ या काळात दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याला सतत आपल्या राज्याची चिंता वाटत होती एका बाजूला अब्दालीच्या आक्रमणाचे भय होते तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दगाफटक्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर होती त्याच स्थितीत त्याने मराठ्यांच्या नावे एक फर्मान पाठविले..
पुण्याच्या शनिवार वाड्यात जसे हे पत्र आले होते तसेच एक पत्र इंदोर ला मल्हारराव होळकर यांनाही पोच झालेचं होते या फर्मानात तीन विनंत्या करण्यात आल्या होत्या मराठ्यांनी बादशहाच्या रक्षणासाठी फौज तैनात करावी असे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे आवाहन त्यात होते..
दिल्लीचा वझीर आणि मीरबक्षी (सैन्याचे पगारपाणी पाहणारा अधिकारी किंवा आताच्या भाषेत पे-मास्टर जनरल) या दोन्ही पदांवर मराठ्यांनीच आपली माणसे नेमावीत हे दुसरे आवाहन बादशहाने केले होते त्या वेळी बादशहा एवढा अगतिक झाला होता की सरळ नामधारी बादशहा म्हणून राहून मराठ्यांच्या ताब्यात हिंदुस्थानची सत्ता सोपवण्याचीही त्याची तयारी झाली होती हे तिसऱ्या आवाहनावरून दिसते मराठ्यांनी बादशहासाठी तनखा सुरू करावा असे हे तिसरे आवाहन आहे..
कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता...
No comments:
Post a Comment