सरसेनापती संताजीराव घोरपडे आणी गनिमीकावा,
एक चूक झाली तरी, युद्धभूमी मराठ्यांची मसणावाट ठरणार यात शंका नव्हती.पण सारे सरदार संताजी #घोरपडेच्या मागे जायला तयार होते. फिरतील ते कसले मरहठे, हे ब्रीद प्रत्येक मावळा उराशी बाळगून होता. तिकडं तळ ठोकून बसलेला कासीम खान सन्ताजीची वाटच बघत होता.
" खबर क्या है उस संताजीकी? इस वक्त वो कहा है. - कासिम खान खान्जाद खानाला म्हणाला .
"बस थोडी दुरी पर है , हमने उसाका रस्ता जो रोक रखा है.! परेशान होगा बिचारा"- खान्जाद खान उत्तरला.
" बडा कुछ सुना है, संताजी के बारे मै, होशियार होगा तो अक्कलमदी दिखायेगा, 60 हजार की फौज के सामने अपनी 15 हजार की फोज लेकर क्या मरने आयेगा? तोफ भी नही उसके पास देख लेना भाग ही जायेगा." - कासिम खान असे म्हणताच सारे हसू लागले.
कुठल्याही परिस्थितीत संताजीला जिंजीला पोहचु द्यायचे नाही. संताजी चित्रदुर्गलाच अडवायचे याचा पुरेपुर आराखडा मुघल बनवून बसले होते; 60 हजार सैनिकांच्या माजात असलेल्या कासीम खानाला संताजी अजून कळलेच नव्हते.
इकडे संताजीला गुप्तहेरा मार्फत या साऱ्या बातम्या मिळत होत्या. खानाला चुकवून ते सहज पुढे जाऊ शकले असते. पण....संताजीचा विचार वेगळा होता!
" काय करायचे ठरवले आहे तुम्ही"- हणमंतराव.
" गनिमाला चिरडूनच पुढे जाऊ ! -" संताजी.
अहो दाजी, सैन्य तरी पहा गनिमाचे ६०,००० ची फौज चिरडणे शक्य आहे काय? " - हणमंतराव
"दुसरा पर्याय नाही. यांना टाळून पुढे गेलो तर पुढून जुल्फकर खान आणि मागून कासिम खान भुगा करतील आपला." - संताजी
" मागे फिरून गेलो तर ." - हणमंतराव
" शक्य नाही..! महाराज जिंजीला आपली चातकाप्रमाणे वाट पहात आहेत आपण जर गेलो नाही; तर ते मुघलांच्या तावडीत सापडतील." - संताजी
लढाई सुरु झाली कि ,आम्ही सैन्याच्या खोल वर घुसून त्याला दोतर्फ करणार त्यासाठी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या पाडू. पहिल्या तुकडीने अगोदर पेशखाण्यावर हल्ला करायचा शिपायाला मारा पण बुनाग्याला सोडा. बुणगे निरउपद्रवी त्यांना मारण्यात शान नाही. हे बुणगेच आपला पुढचा डाव यशस्वी करतील.बोंबलत मुख्य छावणीकडे जातील आणि कासिम खानाला वर्दी देतील. खबर मिळताच खान आपल्यावर चालून येईल.त्यावेळी छावणीत उरतील फक्त बुणगे. मग दुसरी तुकडी खानाला अंगावर घेईल. तिच्या मदतीला पहिली तुकडी येईल. आणि तिसरी तुकडी खानची छावणी लुटून काम फत्ते करेन. ...सारे लुटा ; जे लुटता येणार नाही ते जाळून टाका. मागे काही सुटता काम नये." - संताजींचा आराखडा रचून झाला.
तांबड झाली बघता बघता मराठ्यांनी मोघलांचा पेशखाना तासाभरात लुटला. बुणगे पळाले. छावणीकडे गेले. खानाला वर्दी दिली. खान संतापला, संताजीचा बंदोबस्त करायला निघाला. सर्व काही आराखड्याप्रमाने होत होते. इतक्यात तिसऱ्या टोळीने छावणी लुटली. दुसरी तुकडी जी खानाबरोबर लढत होती तिच्या मदतीला पहिली तुकडी आली. खानाला पळवाट नव्हती.तिन्ही बाजूने मावळ्यांनी त्याला घेरले होते.
मुघल सैन्य युद्धभूमी सोडून पळू लागले त्यांनी दोन कोस लांब असलेल्या दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घालुन मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. दिवसेंदिवस किल्ल्यातली रसद संपत होती. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मुघलांनी संताजीकड़े जीवदानाची विनंती केली. संताजीने मुघलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. खानाची नामुष्की झाली होती. शेवटी कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली.
मराठ्यांना बुडवायला आलेल्या खानाला मराठ्यांनी बुडवले. गनिमी कावा काय असतो, हे साऱ्या मुघलांना दाखवून दिले. संताजी नावाची दहशत मुघालांमध्ये अशी काही पसरली की, या रणधुरंधर सेनापती विरोधात मोहिमेवर जाण्यासाठी मुघल सरदार तयार होत नव्हते. कारण संताजी घोरपडे विरुद्धच्या लढाईत जिवंत परत येवू कि नाही, याची हमी नव्हती.
_ अक्षय चंदेल
Post - @sarsenapati_santaji_ghorpade
No comments:
Post a Comment