postsambhar :प्रवीण भोसले
इतिहास अभ्यासक
9422619791, 7709577277
शिवछत्रपतींचे पंचहजारी सेनानी असलेले सिधोजीराव पट्टा किल्ल्याजवळच्या (ता.अकोले.जि.नगर) संग्रामात मारले गेले. शिवाजी महाराजांची शेवटची मोहिम म्हणजे मोगलाच्या अधिपत्याखालील जालना शहराची लूट नोव्हेंबर 1679 च्या अखेरीच्या सुमारास करण्यात आली. जालना व आसपाचे गावे लुटून येताना महाराजांबरोबर एकूण 10,000 फौज होती. लुटीचे घोडे, बैल बरोबर घेऊन जाताना मोलगांनी जवळपास सर्व बाजूंनी घेरा घालून नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला, तो पट्टा या किल्ल्याच्या परिसरात. सिधोजीरांवानी निम्मी फौज घेऊन मोगलांना अडविण्यास सुरुवात केली व शिवराय हेरांच्या मदतीने गुप्त मार्गाने पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. शिवराय 22 नोव्हेंबर गडांवर पोहचेपर्यंत सतत तीन दिवस सिधोजीराव मोगलांशी लढत होते. या लढाईत सिधोजीराव मारले गेले. शिवराय बचावले. त्यांची समाधी पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असून "निंबाळकर समाधी' या नावाने ती ओळखली जात. पण हे निबांळकर कोण हे स्थानिकांनाही माहित नाही. शिवाय आसपासच्या गावात कोणी निबांळकर नाहीत. समाधीची शिवकालीन बांधकाम पद्धत व प्रथम त्यांच्या मूळ गावी केलेल्या चौकशीतून ही समाधी सिधोजीरावांचीच आहे हे स्पष्ट होते. या मोहिमेनंतर 4 महिन्यातच शिवराय परलोकी गेले. शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी पहिली आहुती पडली ती वीर बाजी पासलकरांची आणि शेवटचे बलिदान दिले ते सिधोजीरावांनी.
No comments:
Post a Comment