विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

हिंमतखानाचा अंत

 


हिंमतखानाचा अंत
नुकतंच औरंग बादशाहनं संताजी घोरपड्यांच्या विरुद्ध सात लाखाचा इनाम जाहीर केला होता.तशी फर्मानं त्यांनी सर्वदूर पाठवली होती.संताजींचा काटा कायमचा उपटन्याचा बादशाहचा इरादा होता.इनाम जारी करण्याचा
हेतू म्हणजे संताजी विरुद्ध लढणाऱ्या आपल्या निकम्म्या
सरदारांना फुरसान यावं म्हणून हा खटाटोप केला होता. बादशाहनं दरबार भरवून कासिमखानाला पीळ भरून संताजीवर चढाई करण्यास नामजद केलं होतं.
बादशाहला कासिमखानावर भरोसा होता.पण मनातून
बादशहाही चरकला होता.संताजी नावाचं भूत कायम बादशहाच्या मनात नाचत होतं.बादशाहाच्या मनात सहज विचार आला.आपण कासिमखानाला पाठवतोय खरं
पण नजाणो हा जर का त्या संताच्या जाळ्यात सापडला तर संता ह्याची गर्धन मारल्याशिवाय राहणार नाही.
स्वतःच्या मनाची समजूत घालून बादशाहनं कासिमखानाची पाठवणी केली.खान गेल्यापासून बादशहाला ब्रह्मपुरीच्या छावणीत बसून दिवसाचीच स्वप्न पडत होती.कासिमखानाकडून येणाऱ्या फत्तेमुबारकिच्या बातमीचा त्याला इंतजार होता.मराठयांचा मोड करण्यासाठी तडाखेबंद तजवीज त्यांनी केलेली होती.
५० हजारांचं लावालष्कर,त्याचं नेतृत्व करणारे अस्कऱ्याचे सरदार,तोफखाना,बंदुका,बारुद,अगणित हत्ती-घोडे,मुबलक धान्यसाठा कुटे कसली कमतरता बादशाहनं या मोहिमेतसाठी ठेवली नव्हती. कासिमखानाला कर्नाटकाचा कोनाकोपरा ठाऊक होता. असा तजुर्बेकार रुस्तुम फौजेचं नेतृत्व करत होता.त्याला साथ देणारे सरदारही तसेच.त्याच तोलामोलाचे आपलं जलाल लष्कर मराठयांची भंबेरी उडवणार अशी बादशहा ची समजूत होती.
सकाळच्या कोवळ्या उन्हात बादशहा फेरफटका मारून आलेले खलिते चाळीत गुलालबारीत बसला होता.तो वाट बघत होता ती कासिमखानाच्या खबरेची.पण खबर आली भलतीच.संताजी घोरपड्यांनी कासिमखानाचा पूर्ण सफाया केला म्हणून.सर्व मोगली लष्कराचा संताजींनी चुराडा केला होता.ही खबर कानी पडताच बादशहाला घाम फुटला.या खुदा..!!म्हणत बादशाह उठला आणि आता गेला.पुरे तीन दिवस बादशाह कुणालाही भेटला नाही.
दोड्डेरिच्या विजया नंतर सेनापती संताजी घोरपड्यांनी आपली छावणी दोड्डेरी पासून पंधरा-वीस कोस दक्षिणेकडे केली होती.त्यांना खरतर जिंजीकडे जण्याचा बेत होता.पण तिकडं जाण्यात धोका होता.कारण आधीच जिंजी इलाख्यात जुल्फिकारखान म्हणजे दक्षिणेकडे आणि हिंमतखान,हमीदुद्दीनखान हे उत्तरेला होते.म्हणून सेनापती कात्रीत सापडले असते.नाहीतरी त्यांना हिंमतखाना कडून जुना हिशोब घेयचाच होता.एक दिशा मोकळी असावी म्हणून सेनापतींनी उत्तर बाजू मोकळी करू असं नियोजन केलं.बादशाहनं पुन्हा फौज एकत्र करण्याची सुरवात केली आहे अशी खबर सेनापतींना देण्यात आली होती.हमीदुद्दीनखान हा मोठं लष्कर घेऊन चालून येत आहे व रुस्तुमदिलखान हा हिंमतखानाच्या मदतीला येत आहे अशी पक्की खबर होती.तीस-चाळीस हजाराचा लष्कर एकत्र येण्याची आधीच ते उधळून लावण्याचा विचार संताजींनी केला.
आधी हिंमतखानाचा निकाल लावायचा असा निर्धार सेनापतींनी केला.छावणी पासून बसवापट्टणची गढी ही विघी पंधरा-वीस कोसांवर होती आणि त्या गढीत हिंमतखान होता.हिंमतखानाची गर्धन मारल्याशिवाय सेनापती शांत बसणार नव्हते.सोबतीच्या पाच हजार बर्कंदाजांच पथकाला आणि चार हजार हशमांना त्यांनी बसवापट्टणच्या गढी पासून दहा-बारा कोसावर जंगलात
दबा धरून बसण्याचा हुकूम केला.आपल्या सोबत अवघे तीन हजार घोडदळ घेऊन त्यांनी गढीच्या दिशेने चाल केली.हिंमतखानाला वाटलं मराठ्यांचा सेनापती आणि फक्त तीन हजार घोडदळ..!!आणि ते पण आपल्यावर चाल करून येत आहे.तसा हिंमतखान तयारीला लागला.
चिलखत शिरस्त्राण घालून त्यानं किल्लेदार मुहंमद ऐवज
फौजदार दाऊद दिलनाक यांना संगती घेऊन फौजेसह
गढीतून बाहेर पडला.
तोपर्यंत संताजींनी गढीवर हल्ला चढवला होता.त्या दामधुमीत हिंमतीखानानं गढीचा दरवाजा उघडण्याचा हुकूम केला. संताजींना पण हेच पाहिजे होतं.दरवाजा उघडताच मराठ्यांनी जोर वाढवला.घमासान युद्धला सुरवात झाली.खान पण पुरता पेटला.तासाभराची खणा-खणी झाली की सेनापतींनी माघार घेण्याचा हुकूम केला.मराठयांनी पाय काढताच हिंमतखानाला जोर चढला.तो मराठयांच्या माघे लागला.मराठ्यांनी ठरलेलं ठिकाण येताच घोडी जंगलात घुसवली.खान बिचारा तो मराठयांच्या मागोमाग जंगलात शिरला.हिंमतखानाच्या डोक्यात एकच विचार होता आणि तो म्हणजे संता च धड बादशाहला पेश करायचं.पण खानाला हे माहीत नव्हतं की आपलंच पुढे काय होणार आहे.
हिंमतखान मराठयांचा पाठलाग करण्याच्या नादात खोल
जंगलात गेला.ठरलेली जागा येताच मराठे उलटले.
तोपर्यंत खानही नेटाने लढत होता.मराठ्यांच्या बर्कंदाज
पथकाने झाडावर चढून मोगलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.खालून स्वार प्यादे मोगलांना भिडले. सेनापतींनी हुकूम करताच राखीव घोडदळानं खानाच्या
परतीची वाट बंद केली.तोपर्यंत मराठयांनी मोगलांचे हजार-दोन हजार हशम कापून काडले होते.हिंमतखानानं
चौफेर नजर फिरवली आणि त्याला कळून चुकले की आपण पुरते घेरलो आहोत.गर्दीत संतजींही बेजरब हत्यार चालवत होते.हिंमतखानाचा हात्ती हेरून संताजींनी आपला घोडा गर्दीत घुसवला आणि खानाच्या हात्ती पाशी आणला.तोपर्यंत खानानं एक दोन बाण संताजींच्या दिशेने सोडले होते.बाण चुकवत त्यांनी दुशेल्यात खवलेला तमंचा काढला आणि खानाच्या कपाळावर नेम धरून चाप ओढला.सुटलेल्या गोळीनं खानाच्या कपाळाचा वेद घेला.तसा खाना हौद्यात कोसळला.
खानाच्या माहुताने लढाईचा रागरंग ओळखून हत्ती दाट झाडीत घुसवला.त्या दंगलीतून कुशलतेने त्याने तो बाहेर काढला आणि बसवापट्टणच्या दिशेनं पळवला.दुपारी सूर झालेली लढाई संध्याकाळी संपली.अडीच-तीन हजार मोगल कामी आले होते.मोगलांना या युद्धात जबर किंमत मोजावी लागली.कसा-बसा माहुताने हत्ती गढी घातला.
हिंमतखानाला खाली घेण्यात आलं.पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता मध्यरात्री हिंमतखान खुदाला प्यारा झाला.
सकाळी महादेवाला बेलफुलं वाहत असताना बीऱ्या आपल्या धन्या पाशी हजर झाला.मुजरा करून त्यानी
हिंमतखान रात्रीच मेल्याची खबर दिली.खानाला संपावल्याच एक वेगळंच तेज सेनापतींच्या चेहऱ्यावर दिसत होतं.बीऱ्याला खबरगीर लोक जिंजीच्या वाटेवर पेरायला सांगून सेनापती उठले.
सदर लेखन सेवा सेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी अर्पण करतो...!!
लेखन समाप्त.
( इंद्रजीत खोरे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...