मराठयांच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा विचार करताना सरसेनापती संताजी घोरपडे याचं कर्तृत्व डावलून आपल्या पुढे जाताच येणार नाही. राष्ट्राच्या ऐतिहासिक कालखंडात एखाद्या वीर पुरुषाने गाजवलेली अशी कर्तबगारी थोड्याच ठिकाणी दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा पूर्ण विकास संताजींमध्ये आपल्याला दिसतो.गनिमी कावा ही मराठयांची पूर्वापार युद्धपद्धती संताजींनी ती अचूक आणि धारधार बनवून इतक्या प्रभावीपणे ती वापरली,की हिंदुस्थान , अफगाणिस्तान,बल्ख बदकशानपर्यंतच्या अवाढव्य प्रदेशात अजेय,अपराजित ठरलेल्या बलाढ्य मोगली लष्कराचा दमसास उखडून गेला.कायम विजयाच्या घमेंडीत वावरणारं ते सैन्य महाराष्ट्राच्या भूमीत पराभूतासारखं वावरू लागलं ते फक्त मराठयांचा सरसेनापती संताजी घोरपड्यांन मुळेच.
म्हणून रामचंद्रपंतासारखा तत्कालीन मुत्सद्दी म्हणतो :
" राज्यात काही अर्थ उरला नव्हता...याही राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठ धरून इमानास खता न करता जमाव करून उमदे वजीर बुडवले. जागा जागा गणिमास
कोटगा घालून नेस्तनाबूद केला आणि देश सोडविला.
राज्यरक्षणतेच्या प्रसंगास असाधारण श्रम केले औरंगजेबास दहशद लाविली ..."
छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर पुढील सात-आठ
वर्षांच्या आणी-बाणीच्या काळात संताजींने जो अतुलनीय प्रराक्रम गाजवला त्याला मराठयांच्या इतिहासात तोड नाही.मराठ्यांचा दरारा व दबदबा पुनसच्या अखंड हिंदुस्थानात निर्माण करणारा हरहुन्नरी
सेनापती.रणांगणाची अचूक निवड करणारा.शत्रूस हवं
तिथं खेचून आणून दरोबस्त बुडवणारा सेनापती.संकटात सापडलेल्या स्वराज्याला अशा बाक्या समयी असा नरसिंह पदरी मिळाला हे मराठयांच भाग्य म्हणावं लागेल.
रुस्तुमखान,शेख निजाम,जान निसारखान,लुतफुल्लाखान
जुल्फिकारखान,कामबक्ष,अलीमर्दखान,कासीमखान,
हिम्मतखान,हमीदुद्दिनखान,आसदखान,खानजाखान
शर्जाखान,जाँनिसरखान इत्यादी मी मी म्हणविणाऱ्या
बड्या मोगली सरदारांना आपला तलवारीचा अस्कारा
दाखवला.त्यापैकी काही जणांना कैद केले आणि जबर
खंडण्या घेऊन अपमानित स्थितीत सोडून दिले.काही जणांना पळवून लावले तर काही संताजींच्या समशेरीचे
बळी पडले.औरंग बादशहाच्या फौजेतील अशा नामांकित
सेनानीचा जबर पराभव केल्यामुळे संताजींच्या नावाची
दहशत दरारा मोगली छावणीत निर्माण झाला.
म्हणूनच मिर्झा मुहंमद हा बडा बादशाही सरदार संताजींचा उल्लेख " अजकबार रऊसाए मरहटा व मुफसदाने दखन " (मराठयांच्या सारदारांमध्ये सर्वात श्रेष्ठ
द:खनी युद्धा ) आणि हाच मिर्झा मुहंमद संताजींन बरोबर झालेल्या लढाई मारला गेला.
विश्वसनीय आणि प्रमाण मानलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभासदकृत बखरीत प्राणोत्क्रमण होण्यापूर्वी महाराजांनी खालील उद्गार काढल्याचे नमूद आहे, " मराठयांमध्ये संताजी घोरपडे व बहीरजी घोरपडे व धनाजी जाधव हे जरी वाचले तरी ते तिघे मोठे पराक्रम करतील."
संताजींची युद्धनीती :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या लढाईचा सर्वोत्तम व प्रभावी वापर जर कोणी केला असेल तर तो संताजींनेच.या लढाईचं एक परिपूर्ण शास्त्र त्यांने विकसित केलं होतं.स्वतःची कमीत कमी शक्ती वापरून शत्रूचं अधिकाधिक नुकसान करण्याचं तंत्र त्यांनी वापरलं
प्रत्येक वेळेला वेगवेगळे डावपेच लढवून ते त्यांना गोधळात पाडत असे.
सैन्याच्या लहान लहान तुकड्या करून आपल्या बळाचा शत्रूला अंदाज लागू देत नसे.त्यांचे हेर अंत्यत चपळ आणि अचूक बातम्या काढणारे होते.शत्रूच्या हालचालीची
बारीक आणि अचूक माहिती त्यामुळे त्यांना मिळे.त्यानुसार आपल्या सैन्याच्या हालचाली घडवणं वा हल्ले करणं त्यांना सोपं जाई.प्रत्येक नवीन प्रदेशाची भौगोलिक परिस्थितीचा ते अचूक उपयोग करून घेत.
संताजींच्या लढ्याचं आनखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लष्करी हालचालीची जबरदस्त गती नी वेग.
मोगलांचे हेर त्यांच्या हालचालीच्या खबरा खूप चपळपणाने आणत.संताजींना गाठण्यासाठी पातशहा तात्काळ उपाययोजनाही करी.त्यानुसार त्याचे सरदार फौजेचा दळभार घेऊन तातडीने निघत.पण ते येईपर्यंत संताजीं सैन्यासह कुठल्याकुठे निघून गेलेले असत.
संताजींनी त्यांच्या कारकीर्दीत मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर
ते हैदराबाद(गोवळकोंडा)ते पुलकित,मद्रास,तंजावर,
त्रिचनापल्ली(तामिळनाडू)ते गजेंद्रगड,केळदी,धारवाड
संगमेश्वर,रायगड ते नंदुरबार पर्यंत इतक्या विस्तीर्ण व मोठ्या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली.अंदाजे ८०० ते १००० मैलांचा हा प्रदेश आहे
एक हिंमतखान वगळता मोगलांच्या कुठल्याही सरदारला संताजींचा यशस्वी पाठलाग करणं जमलं नाही.हिंमतखानाचीही या प्रयत्नात इतकी धावपळ आणि दैना उडाली की त्याच्या सैन्यातली शेकडो घोडी,उंट,वाहतूककीची जनावरे अतिश्रमाने मेली.त्याच्या स्वार शिपायांना बसायला घोडी राहिली नाहीत.आणि शेवट बसवापट्टणच्या जंगलात झालेल्या लढाई संताजींन
कडून तो मारला गेला.
गनिमी काव्याच्या बळावर अनेक लढाया संताजींने जिंकल्या.मोगलांच्या मातब्बर सरदारांना धूळ चारली.त्यातील काहींना रणास आणून त्यांनी ठार मारलं
म्हणूनच मोगली इतिहासकार खाफिखान लिहितो :
" त्याच्याशी लढण्याचे,त्याला प्रतिकार करण्याचे धैर्य एकाही मोगल अमीरात नव्हते.इतकी त्याच्या नावाची दहशत होती.त्याने लष्कराचे केलेले प्रत्येक नुकसान थरकाप उडवणारे होते "
असे एका पाठोपाठ एक भयंकर आघात झाल्यामुळे मोगल सैन्याचं धैर्यच खचून गेलं.पुढे पुढे तर संताजींशी
लढण्याऐवजी त्यांना खंडनी देऊन आपल्या इलका वाचवण्याकडे मोगली सरदारांचा कल वाढू लागला.
संताजींचे अर्थकारण :
फौजा चालविण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि राज्याच्या तिजोरीत तर त्याचा संपूर्ण खडखडाट.सरकारातून सैन्याच्या खर्चासाठी पैसा मिळणं शक्य नव्हतं.त्यावरही संतजींने प्रभावी उपाय योजला.सैन्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारातून काहीही मागायचं नाही,तर फौजेचं पोट परमूलखातून लुट करून वा खंडण्या घेऊन भरायचं ही नीती त्यांनी निर्माण केली.
लुटीचा संपूर्ण ऐवज म्हणजे मोती,हिरे ,सोने-नाणे
अजून काही मौल्यवान वस्तू या सर्व संताजींचे विश्वासू
माणसं कृष्णाजीपंत कुळकर्णी व गणोजी कदम-पाटील
यांच्या हवाली केलं जाई.हे दोघेही गिरवी गावचे (फलटण तालुका) गिरवीला लोक ब्राम्हणां गिरवी म्हणतात.
गावची पाटीलकी व देशमुखी ही गणोजी कदमाकडे होती
दोन्ही घरं पंचक्रोशीत प्रतिष्ठित.त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ व्हायचं आणखी एक कारण म्हणजे संताजी घोरपड्यांच्या स्वराज्यकार्याला त्यांची समरसून साथ होती.
स्वारीतून आणलेली लुट,खंडण्यांचा ऐवज ते कृष्णजीपंताच्या हवाली करत.पंत त्याचा चोख हिशेब ठेवी.सोंनंनानं,जवाहरी,रत्नं इत्यादी विकून लष्करी खर्चासाठी पैसे उभा करी.आणि या कामी पंतांना गणोजी कदम व बाजी जाधव मदत करी.बाजी जाधव म्हणजे
गणोजीचे मेव्हणे व संताजी घोरपडे यांच्या द्वीतीय पत्नी
द्वारकाबाईसाहेब यांचे वडील.बाजी जाधव सातारा,कराड
पंढरपूर,मंगळवेढा,मिरज या भागातून सुगीच्या दिवसात
शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेई आणि गिरवीला पोहोच
करी.वर्षभर ते हे काम करी.गिरवी,फडतरी,मोही,खुंटबाव
या गावातल्या पेवात,तळघरात ते सुरक्षित साठवलं जाई.
धान्याची व पैशाची ददात संताजींच्या लष्कराला कधीच जाणवत नसे.
संताजींच्या पराक्रमी जीवनाचे प्रसिद्ध इतिहासकार
यदुनाथ सरकार यांनी अतिशय समर्पक शब्दात वर्णन केले आहे :
" विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजीएवढा कुशल सेनापती बहुधा
क्वचित आढळतो.विरुद्ध पक्षाच्या क्षणोक्षणी फिरणाऱ्या
योजनेस बिनतोड जबाब द्यावा असा संताजीनेच.शत्रूस
पाहिजे त्या भूप्रदेशात खेचून आणून बुडवणार सेनेनायक
त्याचे हुकूम असंदिग्घ व सुटसुटीत असत एकदा हुकूम सोडला की त्याची सर्व जबाबदारी तो स्वतःकडे घेई.
तो आपले करार व वचने बिनचूक पाळी.पराभूतांना
मृद्ध भावाने वागवी.आणि कोणतेही कृत्य दूरदृष्टीने व उदार वृत्तीने सिद्धीस नेई.म्हणूनच मोगल सरदारांनी सुद्धा
थोर अंत:करणाची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आढळते.."
म्हणून राजाराम महाराजांचे चरित्र लिहिणाऱ्या केशवपंडितांनी सुद्धा संताजी घोरपड्यांच्या तत्कालीन
कामाचे अतिशय बहारीचे वर्णन केले आहे.
निजामविजयार्थ यान् संतघोरपडादिकान्
प्रथमं प्राहिणोतैर्हि निजाम : पारिलुंठित : ।।
गजाश्वादि धनं तत्य बह्यनीतं तदा रणात् ।
भूघरोपत्यकायां तू जीवमात्रावशेषित : ।।
अर्थ :
शेख निजामाला जिंकण्यासाठी पाठविलेल्या रंनगाजी
संताजी घोरपडे आधींनी प्रथम(शेख) निजामाचा पराभव
करून नंतर त्याचे हत्ती,घोडे व पुष्कळ द्रव्य हरण केले.
तेव्हा सर्व ऐश्वर्याचा नाश झाला आहे व सर्वांगावर जखमा
झाल्या आहेत असा तो खल कसाबसा जीव वाचवून पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या करवीरास ( कोल्हापूर)
गेला....
शेख निजाम हा कुतुबशाही सरदार २९ मे १६८७ रोजी
कुतुबशाहीला सोडून मोगलांना मिळाला म्हणून पातशहाने त्याला ६००० जात व ५००० सवाराची मन्सब
आणि मुकर्रबखान हा किताब दिला.छत्रपती संभाजी महाराजांच्या याचा हारामखोरांन कैद केलं संगमेश्वरला
महाराजांना कैद केल्याबद्दल औरंगजेबाने निजामाला
खान जमान फतेहजंग ही पदवी व सात हजारि मन्सब
व ५० हजार रुपये रोख बक्षीस दिले.संगमेश्वरासी झालेल्या लढाईत मालोजी बाबा घोरपड्यांनीही छत्रपती संभाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली
आणि हाच शेख निजाम रात्रंदिवस संताजींच्या डोळ्यात
सलत होता.पित्याच्या मृत्यूचा,शंभुराजांना कैद केल्याचा सूड घ्यायचा होता.दोन वेळा संताजींनी याचा मुडदा पडायचा प्रयत्न केला.एक कोल्हापूर आणि दुसरे नरगुंद
या ठिकाणी.पण दोन्ही वेळा तो वाचला,देवानेच त्याच्यावर खैर केली.
अखेरपर्यंत राजनिष्ठ :
संताजींचे सामर्थ्य मोठे होते तशीच राजनिष्ठाही मोठी होती.राजाराम महाराजांशी अनेकदा खटके उडाले तरी ते राजाराम महाराजांना सोडून गेले नाही.बऱ्याच मराठयांच्या अवलादी औरंगजेबाच्या आमिषाला बळी पडून मराठ्यांच्या राजाला व मराठी राज्याला सोडून मोगलांना आपली निष्ठा वाहिली.पण असा राज्य व राजद्रोहाचा विचारही संताजींच्या मनात आला नाही.
म्हणजे राजाराम महाराजांन बरोबर वितुष्ठ येऊनही
त्यांची राजनिष्ठ अढळ राहिली.जर समजा संताजीं हे मोगलांना जाऊन मिळाले असे तर स्वराज्याला केवढा जबर हादरा बसला असता याची कल्पनाच न केलेली बरी
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा सळसळता मान नी अभिमान होता तो. संकटकाळी राज्य त्यांनी तारलं.बलाढय शत्रूला जरब बसवली.राज्याच्या
स्वातंत्र्यलढायासाठी आयुष्याचा कण न् कण त्यांनी वेचला.
यावरून मराठयांच्या स्वातंत्र्यालढ्याचं संतुलन संताजींच्या समशेरीवर किती नि कसं तोललेलं होतं
ते लक्षात यायला हरकत नाही
अशा या थोर सरसेनापतीस मनाचा मुजरा...
No comments:
Post a Comment