विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 March 2021

* खानदेशातील हाटकर घराणी - लोहारा येथील देशमुखांचा वाडा इतिहासाचा पुरावा

 


* खानदेशातील हाटकर घराणी - लोहारा येथील देशमुखांचा वाडा इतिहासाचा पुरावा
लोहारा येथील ब्रिटिश राजवटीच्या काळात बांधण्यात आलेला देशमुखांचा वाडा अजूनही भक्कमपणे उभा असून वाडा पाहिल्यावर गतकाळाच्या आठवणी जाग्या होतात. लोहार येथील अभिमान रामदास देशमुख (वय ६५) हे सध्या या वाड्यात राहतात. ब्रिटिश काळातील भक्कम भिंती, आकर्षक लाकूडकाम, सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोरपणे वास्तुशास्त्राचे नियम पळून बांधण्यात आलेला हा पुरातन वाडा अजूनही दिमाखाने उभा असून सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या वाड्यात अगोदर सुखसमृद्धी व वाघिणीचे दूध होते. अभिमान देशमुख मोठ्या अभिमानाने त्यांच्या देशमयूख घराण्याचा इतिहास सांगतात.
त्र्यंबक नारायण देशमुख यांनी ब्रिटिश सरकारच्या काळात लोहारा व बडोदा येथे वाघाला झोपेतून उठवून त्याची शिकार केली होती म्हणून सयाजीराजे यांचे सरदार अंबोजीराजे पांढरे यांची मुलगी शांताबाई हिच्याशी सन्मानाने लग्न झाले होते. अहिल्याबाई होळकर यांच्याशीही नातेसंबंध असल्याचा ऐतिहासिक पुरावा अभिमान देशमुख देतात. त्यांच्या लोहारा येथील देशमुखवाड्याचे भलेमोठे प्रवेशद्वार सागवानी लाकडाचे बनवले असून वाड्याच्या संपूर्ण बांधकामात कारागिरांनी जीव ओतून नक्षीकाम करून आपल्या कळीची जाणीव करून दिली आहे. वाड्याच्या वरच्या भागास रखवालदारासाठी निगराणी करण्याच्या हेतूने सुरक्षा व्यवस्थेची खोली आहे. वाड्यात विहिरी असून त्यांना अद्यापही पाणी आहे. ९०० पोटे धान्य मावेल असे दोन पेव (बळद) आहेत. देशमुख घराण्यात ब्रिटिश काळात १२०० एकर जमीन होती.
देशमुख घराण्याचे दैवत विठ्ठल महाराज, सखाराम महाराज, राममंदिर, तापेश्वर, बालाजी व अहिल्याबाई होळकर यांची देवस्थाने या वाड्यात आहेत. अजूनही देशमुख घराण्यातून महाशिवरात्री, व आशावादी एकादशीचे दिवशी लोकांना जेवू घातले जाते. असा देशमुख घराण्याचा अभिमानाने इतिहास सांगणारे अभिमान देशमुख यांच्याकडे आता फक्त उदारनिर्वाहाइतकी शेती असून वाडा मात्र चांगल्या परिस्थितीत उभा आहे. या वाड्यात अगोदर १०० लोक एकत्र कुटुंबात राहत होते.
* माहिती साभार- कु. शुभम दाभाडे पाटील. कुऱ्हाड, ता. पाचोरा, जि. जळगाव (सदस्य- मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...