विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 March 2021

"येवलेची गढी"

 छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली , अजिंठा डोंगर जंगलाने व्यापलेल्या पर्वत रांगा मधील अकोला पासुन ३८ किमी दुर व अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील काटेपुर्णा नदीच्या तिरावर बसलेले अकोला जिल्ह्यातील शेवटचे गांव धानोरा व काटेपुर्णा नदीच्या पलिकडचे तिरापासुन वाशिम जिल्हा सुरुवात होते... या गावाची


"येवलेची गढी" प्रसिद्ध आहे, सन १६७० मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी कारंजा (लाड) येथुन आक्रमण करुन परत जात असतांना सैन्य दलातील महत्वाच्या घोड्याला ज्या वर कधी कधी दस्तुरखुर्द छत्रपती शिवाजी महाराज सवारी करत होते त्या पैकी एका घोड्याच्या पायाला ईजा झाली होती, महाराजांचे सैन्य हे दऱ्या डोंगरातुनच आक्रमण करण्या करिता जात होते....रस्त्यात धानोरा गावी "दामाजी पाटील येवले" हे वैद्य होते हे महाराजांच्या कानावर होते वैद्य दामाजी पाटील येवले हे महाराजांचे कट्टर समर्थक होते....वैद्य असुन ते माणसां सोबत घायाळ पक्षी व प्राण्यावर सुद्धा उपचार करत होते व त्यांची ख्याती परिसरात सर्वत्र होती...महाराजांनी थोडासा रस्ता बदलुन थोड्या प्रमाणात जखम झालेल्या घोड्यावर उपचार करण्याचे ठरविले व धानोरा येथे दामाजी पाटील येवले यांच्या गढीवर जावुन त्यांच्या घोड्यावर उपचार केला व नंत्तर ते मार्गस्थ झाले, महाराजांची गुप्तचर यंत्रणा फार मजबुत होती....छत्रपती शिवाजी महाराज ज्या वाटेने आले होते तो रस्ता दऱ्या खोऱ्यांचा असुन या गढीपासुन ३ किलोमिटर दुर घनदाट जंगलात "पांडव लेणी" आहे...पांडवांना महाभारतात ज्या वेळी १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास झाला होता तर १ वर्षाच्या अज्ञात वासात ते याच ठिकाणी थांबल्याची नोंद काही ग्रंथांमधे दिसते तर अर्जुनाचा पुत्र "बब्रुवाहन" यांचे गांव जे राजाकिन्ही म्हणुन राजधानी होती ती पण या गावापासुन फक्त ९ किलोमिटर डोगरातुन वाटेने आहे....वरिल गढी पाहील्या नंत्तर लक्षात येते कि याचे बांधकाम कसे केले असावे, आता जरी भग्नावस्थेत असेल तरी सुद्धा जे काही शिल्लक अवषेश आहेत...त्या वरुन गढी किती प्रशस्त होती याचा अनुभव येतो....छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही गढी आजही ताठ मानेने ऊन वारा पाऊस झेलुनही उभी आहे.....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...