छत्रपती संभाजी राजे ३ फेब्रु १६८९ रोजी संगमेश्वरास
कैद झाले आणि रायगड हादरला...
रायगडचे किल्लेदार चांगोजी काटकर आणि रायगडाचे
मुख्याधिकारी येसाजी कंक यांनी महाराणी येसूबाई- साहेबांची भेट घेऊन सल्लामसलत केली येसूबाईसाहेबांनी तत्काळ राजाराम महाराजांना मराठयांचा राजा म्हणून जाहीर केले.राज्यप्रतिनिधी म्हणून राजारामांनी राज्यकारभार पहावा असे बाईसाहेबांचे मत होते.त्यावेळीराजाराम महाराजांचे वय अवघे १९ होते तर बाल शाहूंचेवय ७ वर्ष होते.शाहू महाराज लहान असल्यामुळे राजाराम महाराजांनी राज्यकारभार पहावा असे महाराणी येसूबाईंच्या सल्ल्यानुसार सर्वानुमते ठरले.
शके १६१० विभव नाम संवत्सरे, फाल्गुन शु.३ म्हणजे
१२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांचे रायगडी
मंचकारोहन झाले.त्यावेळी रायगडावर प्रल्हाद निराजी ,
रामचंद्रपंत,शंकराजी नारायण,निळो मोरेशवर,राहुजी सोमनाथ,संताजी घोरपडे,हंबीरराव मोहिते ( दुसरा )
धनाजी जाधव,विठोजी चव्हाण आणि इतर बरेच सरदार
उपस्थित होते.
याच दरम्यान रायगडाभोवती जुल्फिकारखानाने वेढा घातला. जोडीला बख्तबरामंदखान व इतर सरदार सैन्य
होते.या मोहीमेसाठी औरंगजेबाने २ लाख रुपये सरकारी
खजिन्यातून दिले होते.पण रायगड हा फार दुर्गम किल्ला
होता.जुल्फिकारखानाच्या मोहिमेचे वर्णन करताना
मोगली इतिहासकर ईश्वरदास नागर याने म्हटले आहे,
" रायगड किल्ला अतिशय मजबूत आणि बेलाग आहे
कोकणात त्याच्या तोडीचा दुसरा किल्ला नव्हता.
किल्ल्याकडे जाण्यासाठी एकच वाट होती.किल्ल्याच्या
भोवती मोठमोठे डोंगर असल्याने किल्ल्याखाली सुरुंग
लावणे अशक्य होते."
रायगडाची नैसर्गिक स्थितीच अशी आहे की,कोणीही
शत्रू त्यास पूर्णपणे वेढू शकत नाही.रायगड किल्ला हा
समुद्र सपाटीपासूनची उंची २८५० फूट आहे.आणि
पायथ्यापासून तो २२५० फूट उंच आहे.त्याचा माथा पूर्व-
पश्चिम दीड मैल लांबीचा असून त्याची रुंदी सुमारे एक
मैल आहे.पश्चिमेकडील मुख्य दरवाजाची बाजू सोडली तर त्याची सर्व बाजूंना शेकडो फूट उंचीचे भयाण तुटलेले
व तासलेले कडे आहेत.किल्ल्याच्या सभोवताली त्याच्याच उंचीचे पर्वत पसरले आहेत.
अशा परिस्थितीत गडापासून २-३ मैल अंतराने पश्चिमेच्या
बाजूस पाचाडसारख्या ठिकाणी मुख्य छावणी करून
गडाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करणे,एवढेच मोगलांच्या हातात होते.ईशान्ये लिंगाणा,पूर्वेस तोरणा
दक्षिणेस कंगोरा चांभांरगड,सोनगड,वायव्येस तळगड
व उत्तरेस घोसाळगड अशी अनेक अनेक किल्ल्यांची
नैसर्गिक तटबंदी रायगडास लाभली होती.
अशा अनेक गडांच्या घेऱ्यात रायगड सुरक्षित होता.
मोगलांना कल्पना आली की हे आसपासचे गडकोट
जिकल्या शिवाय रायगड जेर होणार नाही.
राजांचा गड आणि गडांचा राजा रायगड हा एक भक्कम नैतिकपायावर उभ्या असलेल्या हिंदवी स्वराज्याची राजगादीसांभाळत होता.
परिस्थिती केवळ गंभीरच नव्हती,तर मोठी अभूतपूर्व होती.छत्रपती संभाजी महाराजांची हालहाल करून हत्या
करण्यात आल्याची वार्ता रायगडावर आली.गडाचे
वातावरण आत्यंतिक दुःख व चिंता यांनी भरून गेले होते.
अशा परिस्थितीत पतिनिधनाचे आकाश कोसळलेल्या
मन: स्थितीत महाराणी येसूबाईंनी जो धीरोदात्तता दाखविली,मनाचा उत्तुंगता दाखविली त्यास मराठयांच्या
इतिहासात तोड नाही.
महाराणी येसूबाईंसाहेबांना राजकुटुंबप्रमुख मानून त्यांच्या
सल्ल्याने पुढील मसलत योजावी,असे ठरविले.
रायगडावर जमलेल्या समस्थ मराठा मंडळींनी महाराणी
" येसूबाईंसाहेबांना पुढे विचार कसा करावा म्हणून विचारिले.ते समयी त्यांनी सल्ला सांगितली जे मुलाचे( शाहू )वय लहान,राज्य तरी गेलेच,त्या अर्थी तुम्ही
सर्वही पराक्रमी मनसबदार शूर यांणि एक विचार होऊन
राजारासाहेब यांस घेऊन बाहेर पडावे.मुलास बाहेर जाऊन राहाणे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐशी दुसरी नाहीच.त्या अर्थी मुलास व आम्हांस तेथील बंदोबस्त करून येथे ठेवावे.तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसह वर्तमान बाहेर पडून फौजा जमा करून प्रांताचा बंदोबस्त राखला असता सर्व मसलत वोढ
तिकडे आधी पडेल.येथे गिल्ला पडणार नाही.तथापि थोडीबहूत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलाग
मजबूद वर्ष सहा महिने टिकाव पडेल.तो तुमचा सर्वांचा
एखादे ठायी जमाव पोक्त जाला म्हणजे आम्हास काढून
न्यावे;
रायगड हा सहजासहजी जेर होऊन शत्रूच्या ताब्यात जाणारा किल्ला नाही.तेव्हा येसूबाईंसाहेबांनी बाल शाहूराजासह तेथेच म्हणजेच रायगडी रहावे,राजाराम महाराज व इतर प्रमुख अधिकारी-सेनानी व सरदार यांनी
रायगडाबाहेर पडून मोगली फौजांचा प्रतिकार करावा आणि शत्रूचा जोर फारच झाला तर जिंजी-तंजावरकडे
जाऊन आपला जीव वाचवावा;पण रायगडावर सर्व राजपरीवार व राजकुटुंबाने एकत्र न रहावे,ही येसूबाईंसाहेबांची कल्पना ( डावपेच) आणि मसलत प्राप्त
परिस्थिती अगदी योग्यच होती.
५ एप्रिल १६८९ राजाराम महाराज येसूबाईंनीसाहेबांचा निरोप घेतला व आपल्या राण्या प्रमुख सरदार व मुत्सद्दी लोकांनी गुप्तपणे रायगड सोडला.आणि प्रतापगडावर गेले.
इकडे रायगडाचा वेढा दिवसगनि अधिक आवळत गेला
किल्लेदार चांगोजी काटकर प्राणपणाने किल्ला लढवत
होते.झुंज चालूच होती.वेळीअवेळी मोर्च्यांवर हल्ले सुरूच
होते.जुल्फिकारखानाने दमदमे उभारून गडावर तोफांचा
मारा अखंड सुरू ठेवला होता.पण अशा प्रकारच्या मारगिरीस जुमानणारा तो गड नव्हता.
तथापि,स्वराज्याची परिस्थिती बिघडत चालली होती.
येसूबाईंसाहेबांन सह शिवबंदीची असहायता पराकोटीस
पोहोचली होती.किल्ल्यामागून किल्ले व ठाणी शत्रूच्या
हाती पडू लागली.आणि त्यात राजाराम महाराज जिंजीच्या वाटेवर असताना कैद झाल्या ची वार्ता रायगडावर पोहोचली.
रायगडावरील येसूबाईंसाहेब व इतर मंडळी यांचे नितीधैर्य
उच्च कोटीतील होते यात शंका नाही.पण त्यांच्यावर
कोसळलेली संकटेच इतकी जबरदस्त होती की,अशा
त्यांच्या नितीधैर्याचाही त्या संकटाच्या दबावाखाली
चुराडा व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली.एका छत्रपतींची हत्या झाली म्हणून दुसरा छत्रपती उभा केला,
तोही कर्नाटक (जिंजी)च्या वाटेवर दस्त झाला; अशा
अत्यंत भयाण परिस्थिती आता आपण रायगड फार काळ लढवू शकणार नाही,असे येसूबाईंसाहेब व किल्ल्यातील शिवबंदी यांना वाटल्यास ते स्वाभाविक होते
परिणामी,मोगलांच्या प्रचंड शक्ती समोर किल्ला जेर
होऊन तो जिंकून घेतल्यावर मग दयेची याचना करण्यापेक्षा त्याआधीच सन्माननिय वाटाघाटी करून तो
ताब्यात देणे अधिक श्रेयस्कर,हा विचार रायगडावर
बळावत गेला.कारण प्राप्त परिस्थिती येसूबाईंसाहेबांन
समोर अन्य पर्यायही उरला नव्हता.
याच दरम्यान कर्नाटक जातेसमयी राजाराम महाराजांनी
देश रामचंद्रपंत अमात्य यांच्या कडे सोपवला.त्यासाठी त्यांना हुकुमतपन्हा( कुलमुखत्यार) हा किताब दिला.
त्यामुळे देश आपोआपच पंतांच्या हुकुमाखाली आला.
येसूबाईंसाहेबांनी कारभारी मंडळा कडे मदतीसाठी अनेक हरकारे व खलिते पाठवले,करणं त्यांनी दहा महिने गड
भांडवला.या जिद्दीवर की आपले लोक एक होतील.
जमाव पोख्त करून गडाचा परीघ आज ना उद्या मारून
काढतील.पण त्यांची अशा फोल ठरली.
याच कारण म्हणजे कारभारीमंडळात सुरु असलेल्या लाथाळ्या.जर सर्वांनी मिळून हात दिला असता तर नक्कीच गड भांडता राहिला असता.आणि ही गोष्ट
संताजी घोरपडे रामचंद्रपंतांच्या काणीकपाळी ओरडून
सांगत होते.
" शंकराजींना मावळातून तलब करा.त्यांचा,धनसिंगरावां-
चा आणि आमचा मिळून वीस हजाराचा जमाव एक करून रायगडाचा शह मारून काढू "
पण पंतांनी काडीची कृती केली नाही. शेवटी होयच ते झाल.
रायगड मोगलांनाच्या ताब्यात देण्याविषयी वाटाघाटी सुर
झाल्या
" किल्लेदार चांगोजी काटकर यांणी झुंजणे,मोर्च्यांवर
पडणे इत्यादी शर्थ करणे ती केली,दाहा महिने किल्ला
भांडविला.बाहेरील कुमक येणे राहिले.राजारामसाहेब
चंदीकडे सर्व कारभारीसह निघोन गेले.शह भारी.परिणाम नाही.तेव्हा जुल्फिकारखान यांणी सांगून पाठविले की
" सर्व सरदार व राजाराम गेले.संभाजीराजे यांचे इलाका
( कुटुंब,कबीला)यास काडीइतके भय नाही."
बेगम इजलाही समजले.तिने पादशाहाशी बोलविले की
" तो शाहू बेटा माझा.त्यास अभय कौल देऊन आणावे. "
" हे सर्व येसूबाईंसाहेबांस सांगून पाठविले.तेव्हा बाईसाहेब
बोलिली,असे सापडलो म्हणजे आधीच अविंध,त्यात द्वेषी
चांगले नाही.जुल्फकारखान यांचे इमान प्रमाण करून त्याचा आश्रय करावा हे उत्तम दिसते व बेगमेचेही निरोप
आदरयुक्त आले.तेच साधन करावे आणि जाऊन भेटावे
ऐशी मसलत सर्वांच्या विचारे करून जुल्फकारखान यांशी
राजकारण बळावले. त्यात बेगमेसही निरोप पाठवणे पक्के केले.तिचे इमान आश्वासन आणिले.आणि
महाराज शाहू उतरून आणून खानाचे मांडीवरी बसविले.
' याचे वडील,चुलते ते सर्व सोडून गेले.सर्वाविशी वडील
तुम्ही आहां ' असे म्हटलियावरि त्यांणिहि ' येवेशि याउपरि
तुम्ही खतरा न करणे.याचे जिवास व अबरुस कदापी धक्का लागू देणार नाही 'म्हणून कुराण उचलून दिले
खातरजमा केली "
ज्या रायगडावर येसूबाईंनीसाहेबांनी शिवछत्रपतीं राज्यभिषेक पाहिला होता.संभाजी राजांशेजारी प्रसंगी
पट्टराणी म्हणून त्यांच्या मस्तकी अभिषेक धारा पडल्या होत्या." क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय " "छत्रपती संभाजी महाराज की जय " हे शब्द या रायगडावर घुमले होते.
अखेर " रायगड " सोडावा लागला.
कार्तिक मासी सला करून मार्गशीर्ष शुध २, रविवारी
रायगड मोगलास दिल्ह.ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रायगडा संबंधी वाटाघाटी होऊन करार झाला व नंतर ३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मोगलांच्या
ताब्यात देण्यात आला.
खानाशी झालेल्या कराराप्रमाणे महाराणी येसूबाईंनीसाहेब,बालशाहूराजे,सकवारबाईसाहेब( छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात असलेल्या धर्म पत्नी) छत्रपती संभाजी महाराजांच्या नाटकशाळा त्याचे मानसिंग व मदानसिंग हे दोन अनौरस पुत्र , जोत्याजीराव केसकरव इतर प्रमुख अधिकारी मंडळ मोगलांच्या ताब्यात राजकीय कैदी म्हणून गेले.
" किल्ला फत्ते झाल्याची खबर जुल्फिकारखानाने औरंगजेब बादशहास कळविली.किल्ल्याच्या बंदोबस्तास
त्याने अधिकारी नेमले.बादशहाला किल्ला फत्ते झाल्याची
बातमी कळून आनंद झाला.विजयाचे चौघडे वाजविण्याची आज्ञा केली.रायगडला " इस्लामगड "
हे नाव देण्यात आले "
त्यानंतर वर्ष ते दीड वर्षांचा काळ लोटला असेल
दर्याला उधाण यावं तशी पराक्रमाची प्रचंड मोठी लाट
महाराष्ट्रात निर्माण झाली.मराठा सरदार,सुभेदार खुशाल
मनाने परस्परांना लिहू-कळवू लागले.
" अजी दोन वर्षे मोगलांची धामधूम आपल्या राज्यात होत आहे...हाली श्री कृपेने राज्याचा मामला थाटत
चालला. "
मामला थाटण्याच्या या उद्योगाचा श्री गणेश संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांनी केला यात शंका नव्हती
या दोघांनी मराठयांचा दरारा पुनश्च निर्माण केला.
असा हा रायगड म्हणजे मराठ्यांची अस्मिता होती.तो
पुन्हा जिंकुन स्वराज्य आणावा ही राजराम महाराजांची
तिव्र आंतरीक तळमळ होती ती त्यांना जिंजीत ही
स्वस्त बसून देत नव्हती.या संदर्भात देशाचे हुकुमापना
स्वराज्याचे प्रमुख कारभारी रामचंद्रपंत अमात्य यांना
महाराजांनी खलिता पाठवून रायगडाच्या मोहिमेचे संयोजन करण्याची आज्ञा केली होती.
त्यानुसार रात्रीची किल्ल्यावर चढाई करण्यात पटाईत
असणाऱ्या मावळ्यांशी अमात्यांनी संपर्क साधला होता.
आणि त्या मावळ्यांनवर ती कामगिरी सोपवली होती,
खुद्द महाराजांनी जिंजीहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या
काळातील अनुभवी व जेष्ठ सेनानी आबाजी सोनदेव
यासी या दाब जोर मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी
धाडले होते.
म्हातारा सत्तरीच्या पुढचा,पण हाड मूळचंच मजबूत.
ओठावर भरदार पांढऱ्याघोट मिशा राखलेल्या.तोंडातले
सगळे दात अजून शाबूत होते.जाड भुवयांचे केस करडे
झालेले.नजर तीक्ष्ण होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या
उमेदीच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत खपलेला
कणखर गडी! महाराजांना कल्याण-भिवंडी ची मोहीम आबाजीपंतांनीच फत्ते केली होती.तिथली सुभेदारी पण
उत्तम प्रकारे सांभाळली होती.त्या काळी उत्तर कोकणात
पायपीट करून गावं, वाड्या त्यांनी पिंजून काढल्या.
मावळे,हेटकरी,कोळी,आग्री,भंडारी यांना दिलभरवसा
देऊन हाताशी धरलं.त्यांच्याकडून स्वराज्याची सेवा करून घेतली.आणि याच तडफेने रायगडची मोहीम
फत्ते करण्याची अवघड जबाबदारी अंगावर घेऊन ते
जिंजीहुन देशावर ( महाराष्ट्रात )आले होते.
कोणत्याही परिस्थितीत रायगड काबीज करण्याचे आवाहन करताना राजाराम महाराज जाऊलकर,दरेकर
कासुर्डे,गोळे इत्यादी इरसाल मावळ्यांच्या पुढाऱ्यांना लिहितात:-
" कैलासवासी स्वामींचे वेलेस तुम्ही लोकी कस्ट मेहनत
करून थोरथोर कामे करून दिल्ही आहेत.सांप्रद रायेगड
हस्तगत करून घेणे,हे कार्य बहुतच थोर आहे.ऐवेसी राजश्री रामचंद्र अमात्य यांणी तुम्हास सांगितले आहे
त्यावरून तुम्ही गड हस्तगत करून घ्यावयाच्या येत्नात
आहां.
सांप्रत स्वामींने राजश्री आबाजी सोनदेव यासी पाठविले
आहे.रायेगड हस्तगत करून घ्यावयाची आज्ञा यांस केली
हे(तिकडे)जाऊनी राजकारण जे अनुकूल होऊन
रायेगडाची हवल करणे( बीत-बातमी राखणे)वस्ती
करून ते स्थल हस्तगत करून फतेचे ( विजयाचे)वर्तमान
स्वामीस लिहिणे.
म्हणजे स्वामी तुमची विशेष उर्जित करितील.तुम्हांस
देण्याघेण्याचा तह-रह जो करणे,तो मारनील(आबाजी
सोनदेव) करितील.गड हस्तगत जाला म्हणजे स्वामी तेनेच प्रमाणे चालवितील.आपले दिलासा असो देऊन
येवढे कार्य अविलंबे करून स्वामीस संतोषी करणे.
येवेसी राजश्री रामचंद्र पंतांसही लिहिले आहे.तेही जे
बेगमी करावयाची ते करितील.आई भवानी तुम्हास
यश देणारी थोर आहे." (१२ मे १६९२)
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभू रौद्र ॥
No comments:
Post a Comment