पूर्वनियोजित कटानुसार २५ जुलै १६२९ रोजी निजामाने लखुजी राजे , त्यांचे दोन पुत्र , व नातु यशवंतराव या निशस्त्र वीरांचा कपटाने खुन केला . त्याचा बदला म्हणून
शहाजी महाराजांनी निजामशाहीवर स्वारी केली . हा त्यांचा #प्रगट_स्वराज्याचा पहिला प्रयत्न होता .
आपल्या प्रच्छन्न स्वराज्याच्या प्रयत्नात त्यांनी बंडखोरी करून लहान मुर्तजास नाममात्र गादीवर बसवून कारभाराची सर्व सुत्रे आपल्या हाती ठेवली . त्यांनी स्वतः चे राज्य स्थापन न करता सावधपणे पाऊले टाकीत आपण एका राजाचे पालक ( King Maker ) आहोत हे सिद्ध केले .
कर्नाटकात त्यांनी हिंदू राज्ये आदिलशाहीच्या अंमलाखाली आणली , मात्र ती पूर्णपणे नष्ट होऊ दिली नाहीत .
पुढे कर्नाटकात मिळालेल्या जहागिरीचे रुपांतर राज्यांतर्गत राज्यात केले .
बेंगलोर येथे स्थायिक झाल्यानंतर शहाजी महाराज स्वतंत्र राजासारखे राहू लागले .
ही मराठा साम्राज्याची पायाभरणी होती .
No comments:
Post a Comment