सातवाहन राजघराणे
भाग ३
राज्यकर्ते
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.
शातकर्णी मुद्रा
नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
राजा सिमुक सातवाहन,
राणी नागनिका,
राजा श्री सातकर्णी (नागनिकेचा पती),
कुमार भाय (राजपुत्र),
महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागनिकेचे पिता),
कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.
ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेले इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.
सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे
इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.
सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगांची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
पहिला सातकर्णी (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
वेदिश्री
सतिसिरी (शक्तिश्री)
हाल सातवाहन
गौतमीपुत्र सातकर्णी
आपिलक
कुंतल
सुनंदन
सुंदर
वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
गौतमीपुत्र विजय सातकर्णी
चंड सातकर्णी
वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
पुलुमावी (पुळुमावी)
यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.
No comments:
Post a Comment