विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 6 April 2021

सातवाहन राजघराणे भाग २

 


सातवाहन राजघराणे
भाग २
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...