३१ मार्च १७३७....
“
बेलापूरच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला...”
पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे मुख्यत्वे कोळ्यांची वस्ती असलेल्या गावात पोर्तुगिजांनी किल्ला बांधला तो म्हणजे बेलापूरचा किल्ला वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणार्या वाहातूकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणार्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी बेलापूरचा किल्ला बांधला...
पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता गडावर २० तोफा होत्या ३१ मार्च १७३७ रोजी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १९३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला...
फोटोग्राफी : @_bheresnehal
No comments:
Post a Comment