जगातील पहिले शिवचरित्र...
Vida e accoens do famoso e felicissimo Sevagy....
छत्रपती शिवरायांबद्दल अफाट आकर्ष प्रचंड प्रेम आणि नितांत आदर असणारा हा व्यक्ती मराठी हि नव्हता आणि भारतीय सुद्धा नव्हता मुळचा पोर्तुगीज असणार्या या व्यक्तीच नाव होतं 'कॉस्मे दी गार्डा' गोव्याचा मार्मागोवा भागात हा राहत होता आणि एक प्रशासकीय अधिकारी सुद्धा होता...
छत्रपती शिवरायांच्या मृत्युच्या नंतर फक्त १५ वर्षांनी म्हणजे १६९५ साली कॉस्मे दी गार्डा ने शिवचरित्र लिहून पूर्ण केले या चरित्राचे पोर्तुगीज नाव Vida e accoens do famoso e felicissimo Sevagy असे होते याचा अर्थ इंग्रजी मध्ये Celebrated life of famous Shivaji the Great तर मराठी मध्ये 'सर्वप्रसिध्द असणार्या शिवाजी महाराजांची जीवनगाथा ' असा होतो...
१६९५ चा काळ मराठा, मोगल, पोर्तुगीज सर्वांसाठीच कठीण आणि धामधुमीचा होता त्यामुळे हे शिवचरित्र प्रकाशात येण्यासाठी १७३० साल उजाडले महत्वाची गोष्ट अशी कि तेव्हा हे शिवचरित्र भारतातून निघून लिस्बन पोर्तुगाल येथे पोचले होते १७३० च्या दशकात छत्रपती थोरले शाहू यांच्या आधिपत्याखाली भारताचा बराच भाग आला होता त्यामुळे मराठ्यांचे नाव सर्वदूर पसरलेले याचाच फायदा घेत लिस्बन येथील एका वृत्तपत्राने या मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांचे हे पोर्तुगीज भाषेतील चरित्र काही भागात छापले आणि युरोपियन लोकांना शिवाजी महाराज खर्या अर्थाने कळले...
धन्य तो शिवभक्त कॉस्मे दी गार्डा आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे जीवन भारतीयच नाही तर परदेशी लोकांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरले...
"आपल्या प्रजेला ते अत्यंत आदराने वागवत ते राज्यकारभार इतका प्रामाणिकपणे करत कि लोकांना त्यांच्याविषयी प्रेम आणि विश्वासाच्या भावने शिवाय दुसरे काही वाटत नसे..."
- कॉस्मे दी गार्डा चे शिवरायांबद्दल गौरवोद्गार...
- हे शिवचरित्र लिस्बन येथील National Library of Portugal येथे जतन करण्यात आले आहे..
No comments:
Post a Comment