पोस्टसांभार : ©नरेशराव_जाधवराव
शिवरायांच्या राज दरबारातील कवी श्री.परमानंद नेवासकर यांनी आपल्या ग्रंथात नोंद केलेय. त्यात ते शिवजी महाराजांचा देश म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करतात.
“कर्नाटकाहून महाराष्ट्रात येण्यास शिवराय उत्सुक आहेत. स्वदेशाची जबाबदारी मिळताच त्यांना राजाचे तेज आलेय. जसजसे शिवरायांना यश मिळू लागले, तसतसे त्यांच्या अधिकाराखालील महाराष्ट्र देशातील रयत समृद्ध झाली. “महाराष्ट्र” हे नाव मार्गी लागले.”
शिवभारतातील दहाव्या अध्यायात ते म्हणतात, शहाजीराजांनी बालशिवबांचे कर्नाटकात प्रशिक्षण पुर्ण करुन वयाच्या १२व्या वर्षी म्हणजे इ.स.१६४२ साली पुण्याकडे रवानगी केली याचे सविस्तर वर्णन आढळते ते पुढीलप्रमाणे -
अथ तस्मिन्नाधिपत्ये पिञादत्ते प्रतापिना ।
प्रयातुकामः स्वं राष्ट्रं शिवराजो व्यराजत ।।२४।।
अर्थ =
शहाजीराजेंनी (पुण्याचे) अधिपत्य दिले असता स्वदेशी परत जाऊ इच्छिणारे ते शिवराय राजा शोभु लागले.
ततः कतिपयैरेष दिनैर्दिनक्रुतदन्वयः ।
अयाद्देशं महाराष्ट्रं तस्मात् कर्णाटमंडलात् ।।२८।।
सशक्तिञितयोपेतः समेतस्सैन्यसंचयैः ।
शिवस्स्वया श्रिया सार्धँ पुण्याहं पुरमासदत् ।।२९।।
चक्रप्रियकरः सद्यः समुल्लासितमंडलम् ।
नवोदयास्सुदमुं लोकबंधुं लोको व्यलोकत ।।३०।।
अर्थ =
मग काही दिवसानी तो सुर्यवंशोत्पन्न शिवाजी राजा कर्नाटक प्रांताहुन महाराष्ट्र देशास निघाला. प्रभाव,उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमुह आणि स्वतःची राजलक्ष्मी यांनी युक्त असा तो शिवाजीराजा पुणे नगरास पोहोचला. राष्ट्राचे हित करणारा आणि तात्काळ (प्रुथ्वीस प्रकाशित करणारा) राष्ट्रास उल्हसित करणाऱ्या सुर्यास, लोकमित्रास लोकांनी पाहिले.
ततोनुकुलप्रक्रुतिः कुर्वन् प्रक्रुतिरंजनम् ।
अवर्धत क्रमेणैष विक्रमी यशसा सह ।।३१।।
महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात् ।
अन्वर्थतामन्वभवत् सम्रुद्धजनतान्वितः ।।३२।।
श्रयंतः प्रश्रयोपेतं गुरवस्तं गुणैस्मह ।
अनन्यनिष्ठमनसः समगच्छन् क्रुतार्थताम् ।।३३।।
अर्थ =
पुढे अनुकुल मंत्र्यांच्या सहाय्याने रयतेला आनंद देत असता तो पराक्रमी शिवाजीराजा हळु हळु वाढू लागला, त्याबरोबरच त्यांचे यशही वाढु लागले. तेव्हा त्यांच्या अधिकाराखालील महाराष्ट्र देशातील जनता सम्रुद्ध झाली आणी "महाराष्ट्र" हे नाव अन्वर्थ झाले. त्या विनयशील व गुणवान शिवरायांच्या पदरी असलेले गुरु क्रुतार्थ झाले म्हणजे त्यानी शिकविलेल्या सर्व विद्या व कला यामध्ये तो निपुण झाला.
No comments:
Post a Comment