विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 30 April 2021

सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम) भाग १

 


सूर्यवंशी मराठा घराणे बर्गे (उपनाव निकम)
भाग १
मराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.
उत्पत्ति :
बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शस्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्गे / बरगे म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुषाला पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले पैकी एक चिंचनेरला व एक महादेव डोंगराला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला
बर्गे कुळाचार:
नाव : बर्गे
कुली : निकम
जात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा
मूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान )सैधंति, कर्नाटक.
वंश : सूर्यवंश
राजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा
गोत्र : पराशर / मानव्य
वेद : यजुर्वेद
अश्व / वारू : पिवळा
निशाण : ध्वजस्तंभी हनुमान
मंत्र : सुर्य गायत्री मंत्र
कुल देवता : जोगेश्वरी (अंबाजोगाई )/मुळ तुळजाभवानी
देवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...