विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

किल्ले रायगड जगदीश्वर मंदिर शिलालेख


 

किल्ले रायगड जगदीश्वर मंदिर शिलालेख -:-
किल्ले रायगड बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:
श्री गणपतये नम: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।
याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्‌ छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने "शके १५९६ "मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
हर हर महादेव ,जय शिवराय
______________________________
..............जय रुद्रशिवशंभौ 🚩...........
------------------------------------------------
🎯Post By ::
इतिहासाचे_वारस_शिवमावळे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...