विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 April 2021

कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे

 


कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे
१२ एप्रिल इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना १२ एप्रिल १६८९ रोजी पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की, “सरदार गोळे यांना आपल्या अनुयायांसहित चरितार्थाकरता योग्य ती व्यवस्था इनाम गांवे जोडून केली जाईल. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठे सरदार, सैनिक राखण्यासाठी निश्चित सहाय्यकारी झाली. हे औरंगजेबाच्या कानी येताच त्याने मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की, मोगल बादशहाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते (सरदार गोळे) तयार असतील तर बादशहा त्यांना चार गांवे इनाम देऊन सातगावांची जहागीरही देतील जी निरंतर त्यांना उपभोगावयास मिळेल. परंतु देवदयेने ह्या मसलतीमध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या प्रयत्नास यश आले. गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशहाने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली. गोळे घराणे हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...