शाहजी महाराज "स्वराज्य संकल्पक" च....
रियासतकार गो .स सरदेसाई ह्यांनी मराठा रियासतीचे जेव्हा सलग खंड लिहिले त्यात पहिल्या खंडातल्या पहिल्या भागाचे नामकरण "स्वराज्य संकल्पक शाहजी" असे ठेवले .स्वराज्य निर्मितीचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांचे .पण ह्या वटवृक्षाचे बीज हे शहाजी महाराजांनीच लावले होते.रियासतकरांच्या प्रदिर्घ व्यासंगाला आणि अभ्यासाला दाद द्यायलाच हवी.स्वराज हि प्रदिर्घ प्रक्रिया आहे.अचानक ठिणगी पडली आणि वणवा लागला असे नैमित्तिक स्वरुप त्याचे नाही...भोसले घराण्याच्या एकूण तीन शाखा भोसले ,घोरपडे ,सावंत सोळाव्या शतकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत.मोगलाई,आदिलशाही,निजामशाही ह्या मुसलमानी सत्तांमधून त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला होता.....
शिवछत्रपती आणि शाहाजी महाराज ह्या दोघांच्या कारकिर्दिचं समान बलस्थान शहाजहाँन आणि औरंगजेब ह्यांनी अनुक्रमे ओळखलं होतं.मुर्तजा निजाम मांडीवर बसवून राज्य करायची खेळी शाहजी महाराज खेळले .मुगल व आदिलशाहिच्या संयुक्त सैन्याने त्यांचा पराभव केला.तेव्हा शहाजहाँन शहाजी महाराज सह्याद्रीच्या आसमंतात राहणार नाहीत ही अट इब्राहिम आदिलशहास घातली.औरंगजेबाचे आदिलशाहिला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्या पत्रात आदिलशहाला हि तो हेच म्हणतो "शिवाजीवर लक्ष ठेवावे त्याला नोकरीस ठेवणे झाल्यास दक्षिणेत ठेवावे " .केद्रिय इस्लामी सत्तेला आव्हान देणारी स्वाभीमानी वृत्ती आणि सह्याद्रीच्या अनुषंगाने लाभणारे गनिमी काव्याचे तंत्र ह्या धसकाच जणू तत्कालीन सत्ताधीशांनी घेतला होता.
शाहाजी महाराज कायम चाकरीत जरी राहिले असले तरीही त्यांच्या जहागिरी बदलली नाही.भीमा नदीच्या बेचक्यातला पुणे,सुपे,चाकण हा मुगल आणि आदिलशाहिच्या सरहद्दिचा प्रदेश कायम शाहजी महाराजांच्याकडे राहिला.तसेच बारा मावळचे वतनदार प्रारंभी निजामशाहाकडेच होते .जेधे,पासलकर,बांदल ही मातब्बर मंडळी आरंभापासून शाहजी महाराजांच्या तंत्राने वागताना दिसतात.कान्होजी जेधेंना रणदुल्लाखानाकडून मागून घेवून "मावळप्रांती शिवबाराजांस सहाय्य करणे "ह्या गोष्टी विश्वसनीय पुराव्यावर उभ्या आहेत.
इ.स १६४८-४९ मध्ये झालेल्या फतहखानाच्या स्वारीत महाराज आदिलशाहिकडील पुरंदर वरुन लढा देतात.पुरंदरचे किल्लेदार लौकिक अर्थाने आदिलशाही नोकर पणझ ह्या नीळकंठराव आणि शाहाजी महाराज ह्या संबंध चांगले होते ह्या लढाईत बांदल,पासलकर जगताप हि घराणी शहाजी महाराजांच्या मसलतीने छत्रपती शिवाजी महाराजांना सामील होती.
महाराजांना सुरवातीच्या प्रशासनाची घडी सुद्धा शाहजी महाराजच घालून देतात. शिवचरित्रप्रदीप मध्ये स्पष्ट उल्लेख आहे "महाराजांनी राजश्री सिवाजीराजे यांसमागमे राजश्री सामराजपंत पेशवे व माणकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वारांचा जमाव देऊन पुण्यास पाठविले ." दादोजी कोंडदेव,सोनोपंत डबीर ,बाजी पासलकर,कान्होजी जेधे ह्यासारखी स्वराज्याच्या सेवेत असणारी मंडळी शाहजी महाराजांच्या तालमीत तयार झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पूर्वतयारी शाहजी महाराजांच्या कारकिर्दितच आकार घेत होती.शिवछत्रपतींची प्रचलित राजमुद्रा ,निशाण ह्या मागचा शाहजी महाराजांचा स्वातंत्र्यप्रिय संस्कार सहज दिसून येतो .इतिहासाचा सलग अभ्यास केला असता सहज दिसून येईल शाहजी महाराजांचा घोडा जिथे जिथे नाचत होता तिथे तिथे मुगल आणि आदिलशाहिची हद्द ठरत होती.
"राधामाधवविलासचंपू" मधली शाहजी महाराजांच्या दरबाराची गुणग्राहकतेची वर्णने महाराजांच्या कारभाराशी जुळतात.शिवछत्रपतींच्या प्रचलित राजमुद्रेवर शाहजी महाराजांचा प्रभाव"शाहसूनो शिवसैष्या " म्हणून ठळक दिसतो.
शाहजी महाराजांच्या कर्तुत्वाशिवाय स्वराज्य निर्मितीचा इतिहास अभ्यासणं म्हणजे खडकावर डोके आपटण्याचा प्रकार आहे.
महाराष्ट्र पूर्वजांच्या कर्तुत्वाबद्दल जर जातीनिहाय कृतज्ञ राहिला तर इतिहासाचा उपहास होण्यास वेळ लागणार नाही .
सचिन शिवाजीराव खोपडे -देशमुख.
नाझरे.ता.भोर ,जि.पुणे
No comments:
Post a Comment