लुखेजीराव जाधवराव यांच्या पदरी असलेले भाट रामसिगं व भाट बजरंग यांनी जिजाबाई साहेबाच्या जन्माच्या वेळी केलेले कवन ..---
राजे लखूजी पोटी मातापूर तुलजापुर जगदंबा आली।।
इचेपाटी पुढे शंकर घेतील ।।
अवतार ऐकून सर्व आनंदले ।।
राजाने ब्राह्मण अनुष्ठानी बसविले ।।
महाली मंत्रघोष चालू झाले ।।
भाट बंदी गर्जू लागले।।
हत्ती घोड़े बाजे मिरवणूक निघाली गावात।।
साखरपान वाटी फिरून आली महालात।।
जंगदेबेला अभिषेक केला।।
आरती करून केले ब्राह्मण पुजन ।।
पोषाख दक्षिणा व संवत्स गाई देऊन।।
एक वीस भाटास पोषाख देऊन।।
घातल्या मोहरा पदरात ।।
नाव ठेविले जीजा।।
महाली वाजे बाजा।।
दारी हत्ती झुलती।।
पाळणी चौया मोरचेल ढळती।।
बाया गवई गाती।।
थाटात बारशे झाले।।
काय सागु तुम्हाला।।
आनंद झाला सर्वाला ।।
जिजाबाईचा जन्म सिदंखेडराजा येथे फसली सन 1007 म्हणजे 12 जानेवारी 1598 पौष महिन्यातील पौर्णिमेस गुरूपुष्यामृत योग वर गुरूवारी सुर्योदयाचे वेळी झाला.
पण आज एखाद्या घरात मुलगी जन्मली तर हत्या करतात. पण 17 व्या शतकात हत्ती घोड्यावरून सिदंखेडराजा येथे साखर वाटली नगर भोजन दिले .व दीपोत्सव साजरा केला तर शहीराच्या कवन (कविता ) झाल्या आज स्त्रीभ्रूण हत्या करणारे समाजातील लोकांनी याचा आदर्श घेतला पाहिजे.
एक संकल्प करा हा मेसेज वाचणाऱ्या प्रत्येक श्रीशिंवशंभु व माँजिजाऊ प्रेमी व भारतीय समाजातील प्रत्येकानी मी स्त्री जन्माचे स्वागत करणार ।।भ्रूणहत्याला विरोध करणार त्या शिवाय पून्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ घराघरात तयार होणार नाहीत
स्त्री जन्माचे स्वागत करा व शिवबाराजे पून्हा जन्माला येण्याची आज गरज आहे .
राजे लुखोजीराव जाधवराव हे किती स्त्री शक्तीचा सन्मान व आदर करतात. सामाजिक परिवर्तन करणाऱ्या या लखुजीराजेंना आमचा मानचा जोहार
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद् महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे9049760888
जिजाऊ साहेब व बाल शिवबा याचा सिदंखेडराजा येथे आगमन. .
राजे जगदेवराव यांना पत्र लिहिले जिजाऊबाईला।।
तुम्ही या वे भेटीला..पत्र वाचुन आनंद झाला जिजाबाई ला ।।
बालराजे बरोबर घेऊन जिजाबाई आली सिदंखेडराजा ला।।
राजे जगदेवराव हत्ती.घोडे. पालख्या म्याने छत्र्या चामरे बाजे घेऊन सामोरे आले।।
बाजे उदंड वाजती .साखर बहु वाटती ।।
कदमापुर पेठेतून मिरवणुक महाली आली।
सुवासिनीनी दहिभात.गुलाल. नारळ ओवाळून टाकली. जिजाबाई बालराजे आले महालात।।
म्हालसाबाईने पाहिले बालशिवाजीला .प्रमोचे भरते आले.नयनी अश्रू दाटले .शिवबाला कडेला उचलून घेतले ।।
हे घडले सन.1042 फसली म्हणजे इ.स.1633 फसली ला
दोन वर्षे मुक्काम झाला सिदंखेडराजा ला आनंद झाला सर्वांना
पुणे जहागिरी जाण्याचा बेत ठरला. पोषाख रत्नहार मोतीहि दिले
जिजाबाई आणि बालराजे शिवाजीला .दास दासी .हत्ती. घोडे ।।
पालख्या म्याने देऊन बंदोबस्त पाचशे स्वार सोबत ।।
झाली तयारी निघण्याची बालराजे पालखीत बसले।।
जिजामाता सोबत भासला कैसा सूर्य उगवला जैसा।
अंगी भरजरी अंगरखा भरजरी शेला बाधंला कमरेला ।।
त्यात जंभीया रत्नजडीत मुठीचा खोवला।।
भरजरी पगडीवर मोत्याचा तुरा साजे।।
वाजंत्री हत्ती घोड़े चामरपुढे बाजे मिरवणूक गावाबाहेर गेली।।
पुण्याची वाट नगापूर डाकलाईन धरली।।
पुणे जहागिरी पोहचले सन 1044 फसली म्हणेज इ स 1635।।
फसलीला खुशालीचे पत्र आ ले राजाचे दप्तरी लागले।।।।।।।।
जिजाबाई व बाल शिवाजी सिदंखेडराजा येथे इ.स.1633 मध्ये गेले होते. त्याचा इ.स.1635 पर्यंत दोन वर्षे मुक्काम होता.या प्रसंगी लखूजीराव जाधवरावाच्या पदरी असलेले रामसिगं व बजरंग भाटास यांनी केलेले कवन .....
सदर कवन शिवकालीन कालखंडातील आहे व वरील प्रसंग भाटास बंधूंचा उपस्थित होते उत्तर पेशव्यांतील बखर कार व कादंबरीकार यांनी खाडगळे हत्ती प्रकरणानंतर जिजाऊसाहेब माहेरी गेल्या नाहीत व राजे भोसले व राजे जाधवराव परिवार मध्ये वैर होते हा मुद्दा येथे खोटे ठरतो . तसेच यावेळी बालशिवाजी सोबत आहेत म्हणजे राजे शहाजीराजे यांच्या मनात पण आपल्या सासरवाडीतील लोकांना बद्दल वैर वैगेर नाही तर वैर व राग असता तर फक्त राजमाता जिजाऊ एकट्याच आल्या असत्या.पण शहाजी राजे यांना बाल शिवबाला सोबत पाठवले .व राजेभोसले. जाधवराव परिवार तील ऐक्य. प्रेम .आदर दोन्ही परिवार कडून केला गेला . खोटे इतिहास सांगणार बखरकार व कादंबरीकार यांनी आजपर्यंत लिहालेले खोट्या इतिहासकारा ला खोटे पाडणारे हे कवन आहे .
लखूजीराव जाधवराव च्या समाधीवरील शिलालेख व सुरतमजलीस राजे लखूजीराव जाधवरावाची सिदंखेडराजा ला जी समाधी आहे. त्या समाधी स " घुमट " असे संबोधण्यात येते. लखूजीरावाच्या या समाधीस्थानावर बाहेर च्या भिंतीवथ मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला दगडी खांबावर पाच ओळीचा शिलालेख कोरलेला आहे. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे. ...
1) पहिला ओळ-- सिदंखेडचे देशमुख भानवसे वीटाजी
2)ओळ दुसरे --अरधागी ठाकराई राणि त्याचे पोटी जाधवराव लकूजी म. (मुलगा ).
3)3)तिसरे ओळ--महाराज अरधागी गिरजाई राणि त्याचे पोटी पुत्र दत्ताजी
4)ओळ चौथी --अचलोजी व राघोजीराजे व जाधवराव लकूजी पुत्र
5) पाचवी ओळ-- दत्ताजी त्याचे पोटी यशवंत राजे व लिबाजीराजे ...
या शिलालेखात लखूजीरावाना तीन पुत्र असलेला उल्लेख असला तर जाधवरावाच्या बखरीत चार पुत्र असलेला उल्लेख आहे .बहादूरजी नांवाचा पुत्र आपल्या भावास (भूतजी ऊर्फ जगदेवराव) दत्तक दिले असलेने त्यांचे नाव शिलालेखात नमूद नसावेत.असे वाटतं. .
जाधवरावच्या घराण्यातील ऐतिहासिक कागदपत्रातील वाटणीपत्र असून लखूजीरावाच्या मृत्यूनंतर वाटणीपत्रक करणेसाठी शहाण्या सुरत्या वडीलधारी लोकांनी दिलेला निर्णय म्हणजे"" सुरत मजलीस" "म्हणजे च निवाडयांचा निर्णय होय." सुरतमजलीस"" हा तत्कालीन शब्द आहे .
लखूजीरावाच्या एकुण तीन पत्नी .
1)म्हालसाबाई उर्फ गिरीजाबाई..
2)यमुनाबाई
3) भागीरथाबाई.
कन्या
1) जिजाबाई
पुत्र
1)दत्ताजीराव.
2)अचलोजीराव
3)राघोजीराव
4)बहादूर जी राव
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे शिक्षण व प्रशिक्षण
सिदंखेडराजा ला लखूजीरावाची विशाल गढीवजा वाडा होता. या वाडाच्या परिसरात घोडयाच्या पागा. हत्ती खा ने.तोफखाने सर्व प्रकारांची शस्त्रगारे. दारू गोळ्याची कोठारे .अशाप्रकारे युध्दजन्य वातावरण होते. या वातावरणात जिजाऊ साहेब चे बालपण गेले .त्यांना घोडयावर बसणे .रपेट करणे. हत्ती च्या अंबारीत बसून भालाफेकी निरनिराळी शस्त्रे चालविणे वगैरेचा प्रशिक्षण राजे लखूजीराव व काका जगदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शन खाली लष्कर शिक्षणात जिजाऊ साहेब पटाईत झाले.आपल्या 4 बंधूराजाच्या सोबत तलवार चालविणे. भाल फेक करणे. धनुष्यबाण चालविणे वगैरेचा प्रशिक्षण लखूजीराव जाधव यांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना बालपणीचा दिले. युद्धाजन्य परिस्थिती शत्रू पक्षाची कोडी करणे.गनिमी कावा .युद्धाचे नियोजन करणे .वेगैर प्रकारात जिजाऊ पारंगत होत्या तात्कालिन परिस्थिती धामधुमीची असल्याने स्त्रियांना युद्धकलेमध्ये पारंगत करावे लागते असे निदान राजघराण्यातील मुलीनाही मुलांच्या प्रमाणे प्रशिक्षण दिले जातो असं. त्यामुळे जिजाऊ साहेबना युद्ध कलेचे पुर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांत पारगंत केले होते. .जिजाऊ साहेब यांना विविध भाषेचे शिक्षण देण्यात आले .तसेच दरबारातील शिष्टाचार . रिवाज..पद्धतीचे प्रशिक्षण राजे लखूजीरावाच्या मार्गदर्शन खाली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मिळाले.
|!!जिजाऊ माँसाहेब व शहाजी राजे यांचा विवाह आणि (1610 ते 129 )!!
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब याचा ४२3व्या जयंतीनिमिन विन्रम आभिवादन
सिंधखेड येथील जाधव रावांचे दरबारी रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांनी शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब
यांच्या विवाहाच्या संबंधाने
जे काव्य केलेले आहे ते पुढीलप्रमाणे ;
" जिजाऊ " झाले पाच वर्षांची ।
वडीलासोबत गेली रंग
पंचमी दरबारी ॥
शहाजी राजे भोसले आले होते दरबारी । वय
आठ वर्षाचे ॥
दरबारी आले होते शहाजी राजांचे
वडील । मोठे मोठे सरदार
मानकरी ॥
राजे लखुजी बोलले जिजाऊला राजबिंडा जोडा ।
शहाजीराजे सुंद
दिसतो हा मनोहर ॥
ठरविला आम्ही निर्धार । सिंधखेडचे महालात
झाली सोयरिक निश्चित॥
पुढे लग्न झाले दौलताबादेत । फसली सन १०१४ त ।।
तसेच श्री वृद्धीश्वरालय
येथील शिलालेख , सभासद बखर यामध्ये उल्लेख आलेले आहेत कि " राजे लखुजीनी आपली लाडकी कन्या जिजाऊ इजला शहाजी राजे भोसले यांना राजीखुशीने दिली .राजेशहाजी हा देखणा कर्तुत्ववान आणि कुलीन लढवय्यां तरुण राजे लखुजीच्या डोक्यात चांगलाच बसला होता . म्हणून आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह शहाजीराजे भोसलेशी करण्याचे मनोमन ठरविले होते . त्या संदर्भात सन १६०५ मध्ये राजे लखुजी आणि मालोजी राजे यांच्यात या विवाह संबंधी बोलणी झाली होती . जिजाऊ - शहाजी चा विवाह निश्चित केला होता . पण सन १६०५ - ०६ मध्ये मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत अकस्मात मारले गेले त्यामुळे हा विवाह पडला गेला .
मालोजीराज्यांचा अकस्मात निधानंतर त्यांची जहागिरी शहजीराज्यांच्या नावे करून देण्यात राजे लखुजी जाधवराव यांनीच पुढाकार घेतला आणि सन १६१० - ११ च्या सुमारास . जिजाऊने शहजीराज्याच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि शहाजीराज्यांनी जिजाऊच्या गळ्यात पुष्पमाला घातली . चंद्रवंश - सुर्यवंश एक झाले . जो पर्यंत चंद्र - सूर्य राहतील तो पर्यंत यांची कीर्ती हि टिकून राहील असे लोकांना वाटत होते तेव्हा .
या लग्ना सबंधी कवींद्र परमानंद आपल्या शिवभारत ग्रंथात खालील मजकूर लिहितात, " उत्तम लक्षणांनी युक्त , दान शील , दयाशील , युद्ध कुशल , आणि महातेजस्वी अशा माजोली पुत्र शहजीस पाहून कुबेरागत श्रीमंत जाधव रावांनी ज्यातीषाने सांगितलेले अनुकूल ग्रह असलेल्या मुहूर्तावर आपली विजय लक्षणा , कमलनेत्रा , आणि कुशल शोभा आणणारी कुलवंत कन्या जिजाऊ वर दक्षिणेसह शहजीस अर्पण केली. "
या विवाहाचे वेळी शहाजीचे वय साधारण १५ - १६ तर जिजाऊचे वय साधारण १२- १३ वर्षांचे होते अजून एक इतिहासकार वा सी बेंद्रे यांनी आसे मत व्यक्त केले " अशा नवरदेवाला हि जे अव्वल क्षत्रिय कुळातील होता , त्याची कीर्ती हि निजामशाही आणि आदिलशाहीत इतर क्षत्रिय कुळातील सरदारपेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती , जे खास पत्नीच्या निकटच्या नात्यातील आहे , ज्याचे स्वरूप सुंदर आणि संस्कृती उच्च दर्जाची आहे , अशा मुलाला आपली मुलगी देण्यात बापाच्या आणि मातेच्या कुटुंबाला विशद मानण्याचे कारण नव्हते , उलट त्या सर्वच्या मनात संतोषाचे वातवरण त्यावेळी नादत असले पाहिजे .
मालोजी राजे भोसले याच्या हयात हि सोयरिक ठरविण्यात
आली आणि नंतर दौलताबाद येथे हा विवाह निजाम
सहा आणि त्याचा वजीर मालीकांबर
यांच्या उपस्थित हिंदू धर्मानुसार इ स १६१० - ११ मध्ये पार पडला.
शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह म्हणजे दोन शूर वीर ,
सामर्थ्यशाली , व प्रतिष्ठीत घराण्याची सोयरिक होती,.या घटनेस
हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना असे म्हणावे लागेल , कारण याच दाम्पत्यांच्या पोटी जन्म आलेले
सुपूत्र म्हणजेच
*" छत्रपति शिवाजी महाराज "* हे होत .
यांनीच सर्व हिंदुस्थानात
इस्लामी सत्ता असताना हिंदूंचे राज्य स्थापन करून सर्व
हिंदुस्थानातील जनतेची अस्मिता जागृत केली . स्वाभिमान जागृत
केला आणि इस्लामी राजवटीची पाळे -मुळे ढिली केली . यानंतर
मराठ्यांनीच दिल्लीचे मोगलांचे तख्त फोडले ,
म्हणूनच शहाजी राजे
व जिजाऊ साहेब यांचा विवाह म्हणजे इतिहासाला कलाटणी होय .
मालोजी राजे भोसले यांच्या आकस्मित निधानंतर (इ स१६०६ ) शहाजी राज्यांच्या आई उमाऊ साहेब या वेरूळ घृणेश्वर येथे मुक्कामास
कायम केले .शहाजींची आई उमाऊ साहेब या एक धाडसी , दूरदृष्टी असलेली महिला होती .
तेथे कायम मुक्कामास
असताना धाकटे दीर विठोजी राजे भोसले
यांच्या मदतीने कारभार
सांभाळत त्यांनी आणि राजे विठोजी यांची शहाजीला घडविले ,
राज्यकारभाराचे धडे दिले , आणि आपल्या सुभ्याचे मुख्य ठिकाण
मकरंदपुरा (श्रीगोंदे ) वास्तव्य केले .
पुढे सन १६१२ च्या सुमारास
मालोजी राजेंचे बंधू विठोजी राजे
यांचा मृत्यू झाला , त्यानंतर
विठोजी राजे यांच्या आठ
पुत्रांपैकी संभाजी कडे
या शिगणापुरची मालकी गेली .
शहाजी राजे मुळातच महापराक्रमी होते ,
त्यामुळे युद्धात त्यांची मदत
मिळविण्यासाठी निजामशाही ,
आदिलशाही , मोघाल
शाही वेळ प्रसंगी त्यांना मदत करीत असे . यामुळे शहाजी राजे यांचे
जीवन खूपच धावपळीचे होते .सन १६२४ मध्ये
झालेल्या भातवडीच्या युद्धात तर
शहाजी राजानि गाजविलेला पराक्रम आणि मिळविलेले विजय
दृष्ट लागण्यासारखा होता . यामुळे निजामशाहीत
शहाजी राजे यांचे वजन
खूपच वाढले होते . हे निजामशाहीचा व
वजीर मालीकबंर यास खटकू
लागले . तो शहाजी राजांचा हेवा करू , हि कटकट नको म्हणून
शहाजी राजे आपल्या कुटुंबासह म्हणजे जिजाऊ साहेब
आणि संभाजी सहा पुण्याच्या आपल्या जहागिरीत १६२५
च्या सुमारास आले त्यांनी आदिलशाहीची चाकरी इ.स १६२५ ते
१६२८ या काळात सांभाळली . नंतर पुन्हा १६२८ - २९
ला पुन्हा निजामशाहीत रुजू झाले शहाजी राजे . मग सन १६३० -
३१ मध्ये मोघालांकडे गेले . आणि परत १६३२ ला निजामशाहीत इथे
१६३६इथ पर्यंत .
आणी शाहाजीची हि धावपळ जिजाऊ
साहेबांच्या साथीने स्वातंत्र्याच्या
वाटा शोधण्यासाठीच होती..
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानचा मुजरा
*लेख व माहिती संकलन* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
शहाजीराजेचे जन्म तारीख -- 18/3/1594
जिजाऊचे जन्म तारीख -- 12/1/1598 . वेळ. सुर्योदय वेळी
संभाजीराजे चे जन्म तारीख. .1621साली
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मचे तारीख 19/2/1630 रोजी सायंकाळी 6 वाजता किल्ले शिवनेरीवर राजश्री शहाजी राजे व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ च्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ..अंखड महाराष्ट्र च्या दैवत जिजाऊ साहेबांनी जन्म दिला. शहीराच्या डफवरील कवन असे.
तुम्ही माय माऊली या मातीची..
तुम्हीच तेज धार भवानीच्या पातीची..
घोट जणु गोड मधाचा..
माँ जिजाऊ हा चमत्कार तुमच्या दुधाचा..
तुम्ही घडवीला धुरधंर पराक्रमी पुत्र..
रुजविले मनी त्याचे स्वराज्याचे सुत्र..
तुम्ही दिले स्वातंत्र्य आम्हा जगन्याचे..
धैर्य तुमचेच देई बळ संकटा समोर तगन्याचे..
अनंत तुमचे उपकार मराठ्यांच्या जातिवर..
फिटनार नाही आम्हास नाव तुमचे कोरले जरी छातिवर..
भगव्याच्या रक्षणा हाती दिली तुम्हीच हि तलवार..
हिमालय गर्जला जरी सह्यांद्रि उभा खंबिर..
शपथ या दौलतीची..
शपथ तुमच्या दुधाची..
शपथ शिवछत्रपतिची च्या स्वराज्याचे.
जिजाऊ व शहाजीराजानी संभाजी राजे व शिवाजी या दोन भावंडांना शास्त्र. शस्त्र. राजनिती.भाषा. विज्ञान. भुगोल. अशा सर्वच क्षेत्रात निपूण केला. शहाजीराजानी निजामशाही वाचविण्यासाठी बाल निजाम मुर्तझास मांडीवर बसवून राज्यकारभार दोन वर्षे चालविलीा.यातून मराठ्याचे व रयतेला आपले राजा सिंहासनावर बसावा याची भावना निर्माण झाले होते. शहाजीराजानी स्वतंत्र रयतेच राज्य स्थापन चे प्रयत्न शी अपयश आले. यावेळी जिजाऊ व शिवबाराजे शिवनेरी किल्ला वर होते. मोगलशाही व आदिलशाहीच्या सामूहिक तहात शहाजी राजानी व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना कनार्टकात जावे लागले. यावेळी जिजाऊ व शहाजीराजानी एक संकल्प केला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना बाल शिवबाला सोबत घेऊन महाराष्ट्र मध्ये स्वतंत्रपणे स्वराज्याची निर्माता करावेत व थोरला संभाजीराजे व एकोजीराजे यांना बेंगलोर येथे शहाजीराजानी जवळच दक्षिण भारतात स्वतंत्र रयतेच राज्य स्थापन करावेत व शहाजीराजानी दोन्ही राज्याचे राज्यकर्ता व्हावे हे संकल्प घेऊन.. जिजाऊ .. बालशिवबा .1642 ले बेंगलोर वरून आजचे पुणे शहर म्हणजेच जिजापूर आले.1629 मध्ये आदिलशाहीचा सरदार मुरारजगदेव याने उध्वस्त केले त्यावरून गावाचा नांगर फिरवला होता. "तेथे बाराफुटी पहार रोवून त्यांवर फाटकी चप्पल. तुटकाझाडू. फाटके वस्त्र अशुभ जाहीर होते. सदराचे पहार काढणारे वंश नुपूत्र होईल. .हे अंधश्रद्धा व धार्मिक् दहशतवाद्यांना गाडला.व भूमी सोन्याच्या फाळाच्या नांगराने नांगरली हे या सर्व गोष्टी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्वतःची केला व सदर परिस्थिती बाल शिवबाला सागंतील. हे शापित भुमीका छत्रपती शिवाजी महाराजांचे एक रयतेच राजे कशीप्रकारे जनतेला न्याय. आधार.हिम्मत. देण्यासाठी शहाजीराजानी बाल शिवबाला स्वतंत्र राजमुद्रा व भगवा झेंडा व जिजाऊ साहेब चा शिक्का दिले
शहाजीराजाचा राजमुद्रा --
शहाजीराजाची राजमुद्रा अष्टकोनी असून तो पाऊण इची रूंदीचा आहे त्या मुद्रेत " बंदा शहाजी भोसला " अशी अक्षरे होते.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ याचे राजमुद्रा -- राजमाता जिजाबाई या शहाजीराजाच्या अर्धागिनी जिजाबाईशी राजमुद्रा शहाजीराजानी जिजाऊ साहेब यांना स्वराज्यातील जवळ जहगिरी तील सर्व अधिकार देण्यासाठी हे राजमुद्रा दिले. पुणे जहागिरीचा कारभार " माहुलीच्या तहानंतर निजाम शाहीचा शेवट झाला या कालखंडात जिजाऊ साहेबांचे कुटुंब शिवनेरी किल्यावर होते .किल्लेदार "विश्वासरावराजा " च्या वंशातील विजयराजा यांची कन्या "जयंतीबाई" शी झाले यावेळी शिवाजी राजे व भाचा संताजीराव जाधवराव सोबत होते. पुणे परगण्याची एक 288 गावे होतं पैकी शिवाजी महाराज कडे 36 गावे त्याचा चुलत बंधु मंबाजीराव राजेभोसले 23गावे.आदिलशाहीले जहागिरतील उत्पन्न देण्यासाठी232गाव दादोजी कोडंदेव कडे व सुपे भागातील गाव संभाजी मोहिते कडे शहाजी राजे यांना दिले यावर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना सर्व अधिकार दिले.
यानंतर शहाजींना जिजाबाईंपासुन 4 मुले झाली पण दुर्दैवाने ती फार जगली नाहीत! 25 जुलै 1629 ला पुन्हा एक दुःखद घटना घडली! भर दरबारात निजाम आणि काही कपटी सरदारांनी जिजाबाईंचे वडील लखुजी आणि काही नातलगांची हत्या केली! या वेळी जिजाबाई गरोदर होत्या!
य लवकरच संभाजीचा विवाह शिवनेरीच्या किल्लेदाराच्या विश्वास राव राजे यांचे कन्या जयंतबाई शी झाले.तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकाने 8 विवाह शहाजी राजे व जिजाऊ साहेब यांना केला सईबाई.सगुणबाई. सोयराबाई. पुतळाबाई लक्ष्मीबाई. सकवारबाई.काशीबाई.गुणवंतबाई या विविध मातंब्बर घराण्यातील लोकांशी शिवरायानी विवाह जिजाऊ साहेब यांना करून स्वराज्यासाठी विश्वास तील नातेवाईक जवळ केला. शिवराय लहान असेल्या मुळे जहागिरीतील कारभार सर्व जिजाऊ साहेब याचे पाहता असे .जिजाऊच्या कडक सत्य व्यवहारी मार्गदर्शनाखाली बाल शिवबाचे स्वराज्यात निमित्तीते काम सुरू करून घेतला. जहागिरीदाराचा पूत्र हे ओळख विसरून शिवबाला शेतकरी. आदिवासी. कोळी.बिल्ला.महाराष्ट्र.माग.मुसलमान. मराठे.कुणबी. अशी.विविध धर्माच्या गरीब मुलांसोबत फिरून एकत्र जेवण करणे.एकत्र शिक्षण व प्रशिक्षण जिजाऊ यांना शिवबाला दिले
. जिजाऊ स्वत चे गाव गावी .वस्ती .वाडी पाडायचा जाऊन जिजाऊ रयतेच सुख.दुख.सहभागी होते जिजाऊचे राहणीमान अत्यंत साधे होते. जिजाऊ साहेब स्वतंत्र राज्य स्थापना साठी शिवरायाच्या पाठीशी सह्याद्रीपेक्षा कणखरपणे उभ्या होत्या. भोर तालुका येथील रायरेशश्वराच्या मंदिरात शिवरायानी आपल्या सवंगडयासोबत "हिदंवी स्वराज्य व्हावे हीच श्रीची इच्छा ".हे शपथ घेतली. बंगळूर येथून शहाजी यांना या कालखंडात सोने-नाणे. पैसा पाठविणे दिले .बारा मावळे तील कोन्होजी जेधे.बाजीराव पासलकर. मालूसरे.मोहिते.ढमाले.जगताप. कंक. जाधव.शिलीमकर. महाले.निबालंकर. आदी लोकांना शिवरायाच्या पाठीशी शहाजीराजेनी उभे केला. जहागिरीतील रयतेला .शेतकरीना.सुरक्षिततेची सोबतच रोजगार. न्याय. स्त्रियांना सुरक्षित देऊ न सर्वंच जाती- धर्मातील देशमुखापासुन सामान्य माणसे एकत्रित करून जिजाऊ साहेब व शहाजी राजे च्या मार्गदर्शन खाली बालशिवबास स्वराज्याचा नेता जाहीर केला व शिवापूर हे नवीन गाव जिजाऊ यांना वसवले या कामगिरीसाठी देहूचे संत तुकाराम महाराज अंबीले याचे सहाय्य लाभले.शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांना संभाजीराजे हे पुत्र झाले. सईबाई यांची प्रकृती व आजारपणा असल्याने म्हणून बालशंभुच्या दूध साठी जिजाऊ साहेबांना कापूरहोळच्या गाडेपाटलाची धाराऊ शंभुराजाची दूधाआई केली व त्या त्यागा बद्दल 16 होनाची तैनात करून दिले.
आदिलशाहीचे सरदार अफजल स्वराज्यात चालून आले त्या वेळेस अफझलखानाच्या भेटीसाठी शिवाजी राजे निघाले तेव्हा जिजाऊ साहेब शिवरायाना सांगतात." शिवबा .अफझलखानाच्या भेटी प्रसंगी आपण कामी आलात तर भिती बाळगू नको तुमच्या पाठीमागे बालशंभुस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्माता करीन.पण आपले बंधु शंभुराजे चे उसनं या छानसा परत करावे "हे दृढनिश्चया मेंदूत सतत जागृत ठेवणारी जिजाऊ !!छत्रपती शिवरायानी एक आदर्श राजे होते आणि त्याचा वर जिजाऊ यांना कोणत्याही व संस्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा ओळख हे रयतेच राजे बरोबर एक स्त्रीवाद राजे व त्या कालखंडात हिदुस्थानात सर्वात जास्त स्त्री शक्तीचा आदर करणार राजे होते उदा. राणझीच्या गुजर पाटील शी केलेला शासन असे .किवा सतीचे चाल बंद करण्यासाठी स्वराज्यात केलेला कायदे . स्त्रियांना फक्त घरासोबत स्वराज्यात पण आपले यागदान दिले पीहिजे म्हणून याचे आदर्श उदाहरण म्हणजे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या यांना दररोज स्वराज्यात फिरून गरीब व शेतकरी च्या अडचणी समजणे घेणे .शेतकरी साठी गरजा असेल तेव्हा तबडतोब शेतकरी साठी विहीर बारव मुजंरी करणे तसेच जमीन च्या प्रत तापासुन आलेल्या उत्पन्न तुने पाटील .देशमुख. कुलकर्णी. चौगुले. रयतेवर अन्याय करणार नाहीत याचा चौकशी करणे व न्याय मागणीसाठी आलेल्या रयतेच अडचण सोडवून न्याय देणे . राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिवबा व शंभुराजे हे स्वत शेतात जाऊन शेती करून आपल्या कुटुंब चे गरज पुर्ण केल्या पाहिजे असे आदर्श काम जिजाऊयांना आपल्या सुनबाई कडुन करून घेतील.
शहाजीराजांशी संबंधित काही महत्वाच्या घडामोडी पुढीलप्रमणे
जुलै 1648: शहाजीराजांना काही कारणामुळे कर्नाटकातील जिंजी या किल्ल्यासमीप मुस्तफाखानाकडुन अटक! त्यांची विजापुरला रवानगी! केला तेव्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ च्या मार्गदर्शन खाली शिवाजी महाराज व थोरला संभाजी महाराजांना आदिलशाहीच्या फौजाचे पराभव केला व दिल्लीच्या शहाजहान बददल शी चर्चा करून शहाजी राजे चे सुटका केला हा गोष्ट भारतीय इतिहासातील मराठयाचे योद्धा निती समोरच आदिलशाही पराभव आहे .
राजश्री दक्षिणी दिग्गविजय शहाजीराजे ,
!!१६६२ ,,,, या भेंट बददल शिवभातर कार ,(पृ २०४)लिहातात
!!पादशाही हूकुम आणाेनकूच दरकूचकरुन सिगंणापुरी आले.महादेव चेही यथानुक्रम दर्शन घेतले , श्रीपंढरीस येऊन मायाविहारी चरण पाहुन , श्री जेजुरीस भेटीचा बेत ठरवुन अर्थ डांक बसवुन निघते जाले,,ती शिवाजी महाराजास बातमी घटके घटकेची हाेती. स्वारीचे पुवीे महाराज व श्रीमत् साैभाग्यादि संपन्न जिजाबाईसाहेब व उभयता साैभाग्यदिसंपन्न राणीसाहेब श्रीचे देवालयी जाऊन बसाेन,, शहाजीराजे माेठे समारंभे करुन श्रीदर्शनास आले भेंट झाले ...
९१कलमी बखरीतला उल्लेख असा
""हत्तीवर महाराजांना पाहुन शिवबा धाेडयावरुन खाली उतरुन भेटी झाल्या .आनंद थाेर झाले. नेत्रास अश्रु आले..शहाजीराजे महाराज पालखीत बसाेन चाले.पुत्रास(शिवराय) बसावयास बहुत आग्रह केला , परंतु त्यांने ऐकलें नाही ..पायी चालत पालखी समागमे पांच काेस पुण्यासी आले . महालात दाखल झाले..जिजाऊची भेट झाली (१९कलमी बखर पृ११९)
.मुळ भाषा बखरीत आहे तशीच दिले आहे नाेद घ्या..
खरी तर शहाजीराजे १६४४ते १६६२या काळात चार वेळ स्वाराज्यात येऊन गेलात संशोधन झाले पीहिजे ट शहाजीराजांचे 1664 मधे कर्नाटकातील होदेगिरी येथे शिकारीसमयी घोड्यावरुन पडुन जखमी
झाल्यामुळे निधन झाले !!
तर प्रतापगडच्या भवानी देवी चे स्थापना दलित समाजातील पाथरूट (व फार समाज )च्या लोकांच्या हाताने स्थापन केला व त्याच्याशी जिजाऊ व शिवाजी महाराजांना एकत्र भोजन केले ||
जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच;
शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत अस.
सदर स्वतंत्र राजमुद्रा त्याकाळात माँसाहेब जिजाऊ या भारतीय एकमेव स्त्री आहेत . नाही तर : राजमाता जिजाऊ चा वसा आणि वारसा सांगणाऱ्यां
छत्रपती शिवराय व संभाजीराजे हे महापुरुष होते. सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करुन स्वराज्य स्थापण्याचा दृढसंकल्प त्यांनी पुर्ण केला. वडीलधाऱ्यांचा सन्मान केला. शहाजीराजे, राजमाता जिजाऊ व इतर. आपणही आपल्या घरातील आईवडील व वडीलधाऱ्यांचा मान ठेवले पाहिजे हे विचार रयतेच मनात व शिवशंभुच्या कृती तुन अस्तित्व जिजाऊ साहेब यांना आणले.
माहिती व लेख संकलक
- संतोष झिपरे ९०४९७६०८८८
छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले. हा स्त्रियासंदर्भात शुद्ध दृष्टीकोन अंगी बाणवु जिजाऊ यांना छत्रपती शिवरायांनी परधर्माचा द्वेष केला नाही, उलट त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जगण्यास सहकार्य केले.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना शिक्षणाची महत्त्व ओळखुन होत्या छत्रपती शिवरायांनी व संभाजी राजांना संस्कृतपंडीत बनविले.
जिजाऊ साहेब यांना शिवाजी व संभाजीराजे यांना व्यसनमुक्ती ठेवले छत्रपती शिवराय आयुष्यभर व्यसनांपासुन आणि रंगेलपणापासुन जाणीवपुर्वक दुर राहिले. दारु, जुगार व परस्त्रीगमन ही व्यसने व्यक्तीला, त्याच्या कुळाला आणि समाजाला हानी पोहोचवतात. इतकेच नव्हे तर उच्च ध्येय, आदर्श जीवन या मार्गातील अडथळा बनतात. म्हणुन यापासुन कटाक्षाने छत्रपती शिवराय दुर राहिले. आपल्या सैन्याला पण हिच शिकवणी दिली . राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना आपल्या घरातील महिलांना स्वातंत्र्य आणि युद्धकलेचे, राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते. आपण आपल्या लेकीसुनांना वेगवेगळे शिक्षण घेण्याचे कितपत स्वातंत्र्य अधिकार दिले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शहाजी राजे च्या निधनानंतर सती गेल्या नाही त व संभाजीराजे च्या बलिदान महाराणी युसेबाईव छत्रपती राजाराम महाराजांची निधनानंतर महाराणी ताराबाईसाहेब छत्रपती पण सती नाही गेल्या हि तत्कालीन कालखंडात एक आदर्श उदाहरण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्वत स्ती गेल्या नाही व समाज पुढे आदर्श ठेवले. शिवरायांनी अंधश्रद्धा नाकारल्या. सतीप्रथा नाकारली. राजाराम पालथा जन्मला म्हणुन शांती करणे नाकारले, कुठलीही स्वारी/लढाई करताना मुहुर्त बघितला नाही. ते पुर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करीत राहिले आणि जिंकत गेले. जरी पुरंदरचा तह करावा लागला तरी आपला कुठलाही पराभव हा कायमचा पराभव न मानता जीवघेण्या संकटावर मात करत त्यांनी शेवटी अंतिम ध्येय गाठलेच.जिजाऊ च्या आदर्श विचार नुसार छत्रपती शिवरायांनी धर्माला जीवन जगण्याचा मार्ग एवढेच महत्व दिले. जेव्हा धर्माची तत्वे स्वाभिमानी माणुस म्हणुन जगण्याच्या आड येऊ लागली तेव्हा त्यांनी प्रसंगी धर्मतत्वे बाजुला सारण्याचे धाडस दाखविले. उदा.धर्मतत्वानुसार शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, मात्र शिवरायांनी समाजव्यवस्थेत स्थान नाकारलेल्या सर्वांच्या हातात शस्त्रे दिली. सती परंपरा मोडुन काढली. जर धर्म तुम्हाला माणुस म्हणुन न्याय हक्क देत नसेल, सन्मान देत नसेल तर धर्माची दुरुस्ती आवश्यक असते. पण धर्मप्रमुख या गोष्टीला तयार होत नाहीत. अशावेळी आपल्यावर लाजिरवाणी गुलामी लादणाऱ्या धार्मिक बाबींविरुद्ध बंड करुन आपला आत्मसन्मान, स्वाभिमान जपला पाहिजे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिकवणे प्रमाण छत्रपती शिवरायांनी रयतेस लेकराप्रमाणे वागविले. त्यांच्यावर चुकुनही अन्याय होणार नाही, याची दखल घेतली. स्वराज्यासाठी आर्थिक त्रास दिला नाही. बलवान माणसाने दुबळ्याचे रक्षण करावे शिवरायांनी स्वदेश व स्वभाषा यांचा अभिमान बाळगला. शत्रुशी शत्रुप्रमाणे व मित्रांशी ते आदर्श मित्राप्रमाणेच वागले.
राजमाता जिजाबाई साहेबाच्या सल्ला घेऊन छत्रपती शिवरायांनी प्रत्येक निर्णय पुर्ण विचारांती घेतला. दुसऱ्याच्या शब्दांवर भरवसा ठेऊन त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही छत्रपती शिवराय म्हणजे आदर्श नेतृत्व ! छत्रपती शिवराय म्हणजे न्यायप्रिय राजा.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे माँसाहेब जिजाऊ यांच्या 423व्या जयंती निमित्त विन्रम अभिवादन
संतोष झिपरे9049760888
No comments:
Post a Comment