विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 May 2021

श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार

 


श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार
( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )
" धार" संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे ...! ( इ . स. १७३५ ते १७६१ )
वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).
माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .
कर्तबगार व करारी स्वभावाचे यशवंतराव पवार आपल्या कारकिर्दीत मराठा सत्तेचे प्रमुख आधारस्तंभ बनुन राहीले .
शाहू छत्रपतींचे अगदी मर्जीतले सरदार म्हणून पवारांचे नाव घेतले जाते.
अशा कर्तबगार सेनानींच्यामुळेच माळवा प्रांतावर मराठी सत्ता टिकली
!!... धार पवारांची राजमुद्रा ...!!
" श्री भवानीशंकर चरणी तत्पर .......!
आनंदरावसुत यशवंतराव पवार निरन्तर..!!!"
Painting Courtesy : abhishek kumbhar

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...