विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 May 2021

#शेलार_मामा #कोंडाजी_रायाजी _शेलार

 



#शेलार_मामा
कोंडाजी_रायाजी _शेलारउर्फ शेलार मामा मराठा साम्राज्यातील एक वीर योद्धा ज्याची पराक्रमाची गाथा आजसुद्धा पोवढ्यास्वरूपी गायली जाते. शेलार कुळात जन्माला आलेल्या ह्या वाघाचा पूर्ण नाव होतं कोंडाजी_रायाजी _शेलार. सरदार तानाजी मालुसुरेनच्या आई शेलार मामांच्या बहीण होत्या त्या रुपी ते नात्याने सरदार तानाजी मालुसरे ह्याचये मामा लागत होते .
मराठा लष्करात सेनापती पदावर असलेल्या शेलार मामांनी स्वराज्यासाठी खूप युद्ध सुद्धा लढले आहेत परंतु त्या सर्वात सिंहगड येथील लादलेलं युद्ध त्यांच्या आयुष्यातील एक खूप महत्वपूर्ण असे कारण त्या युद्धत त्यांनी गड तर जिंकला परंतु आपला लाडका भाचा म्हणजे सरदार तानाजी मालुसरे गमावला.
सिंहगड ( कोंढाणा ) १६७० साली महाराजा जयसिंग द्वारे काबीज केला गेला होता. महाराजा जयसिंग हे मुघल साम्राज्याचे ज्येष्ठ सेनापती आणि आमेर राज्याचे राज्यकर्ता होते . महाराजा जयसिंग ने आपला एक विश्वासू सेनापती उदेभान राठोड ह्याची नियुक्ती सिंहगडावर केली होती आणि हाच गड मुगल शाहीच्या ताब्यातून स्वराज्यात आणण्यासाठी लाधलागेल होता सिंहगडाचा युद्ध.
४ फेब्रुवारी १६७० सरदार तानाजी मालुसरे त्यांचा भाऊ सरदार सूर्याजी मालुसरे, शेलार मामा आणि काही मावळे हे अर्ध्या रात्री कोंडाणा किल्यावर हल्ला करण्यास निघाले. गडाकडे जाण्याचा मार्ग खूप खडताळ व उंच होता पण तरी सुद्धा शिवरायांसाठी आपला प्राण ओवाळून टाकणारे हे मावळे जीवाची प्रवाह ना करता यशवंती नावाच्या घोरपडीच्या साहाय्याने गड चढले.
गाद चढताच उदयभान आणि तानाजी मालुसरे दरम्यान खूप भीषण युद्ध झाले परंतु तानाजी त्यात वीर मरण पावले. आपला सेनापती पढला हे पाहताच सगळे मावळे युद्ध सोधून पळू लागले हे पाहताच शेलार मामा ह्यांनी आपला दुःख बाजूला ठेऊन युद्धाची कमान आपल्या हाती घेतली आणि मावळे परतू नये म्हून ज्या रशींच्या साहाय्याने ते व मावळे गड चढले ती रशीं त्यांनी कापली.
आत्ता मावळ्यांपुढे जिंका अथवा मारा असा प्रसंग उभा राहिला. अखेर शेलार मामांनी उदयभानच्या छातीत आपली तलवार घुसवून विजय मिळवला आणि कोंडाणा स्वराज्यात सामील झाला. तानाजी मालुसरेचा भाऊ सूर्याजी मालुसरे ह्यांनी नंतर मुघल सैन्याला सुद्धा परास्त केले.
ह्या विजयाची बातमी ऐकताच छत्रपती शिवरायांना जितका आनंद झाला तिक्तकच आपला लाडका सेनापती गमावल्याची दुःख त्यांना अधिक झाल. नंतर छत्रपतींनी तानाजी मालुसरेंना श्रद्धांजली म्हणून कोंडण्याचं नाव सिंहगड केला.

3 comments:

  1. कोंडाजी रायाजी शेलार

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...