विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 May 2021

थोरले शाहु महाराज

 त्रपती


थोरले शाहु महाराज यांना ९ मे १७०३ रोजी औरंगजेबाने धर्मांतरासाठी विचारणा केली, याचा पुरावा मोगल दरबारची बातमीपत्रे खंड तिसरा यात मिळतो...यास शाहु महाराजांनी ठामपणे विरोध केला..या बाबीचा विचार केला असता आपणांस महाराणी येसुबाईसाहेब यांचे शाहु महाराजावर झालेले संस्कार दिसुन येतात...शाहु महाराजांनी ठामपणे विरोध केल्यामुळे महाराष्ट्रावरील मोठे संकट टळले..पुढे छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा रथ हातात घेतला नसता तर प्रधान- शिंदे व होळकर देखील घडले नसते व मराठा साम्राज्याचा विस्तारही झाला नसता.... यात आणखी एक प्रवाद उभा केला जातो," तो म्हणजे छत्रपती थोरले शाहु महाराजांनी धर्मांतरास विरोध केल्यामुळे त्याबदल्यात सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुत्रांचे धर्मांतर केले..." परंतुही बाब खोटी आहे त्याचा पुरावा देखील मोगल दरबारची बातमीपत्रे यातच मिळतो तो पुढीलप्रमाणे," छत्रपती राजाराम महाराज यांचे मेहुणे म्हणुन व छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या मराठा स्वराज्य गिळंकृत करण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावल्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या दोन पुत्रांचे धर्मांतर औरंगजेबाने इ सन १७०२ च्या अगोदरच केलेले आहे...असा सज्जड पुरावा मिळतो.... त्यामुळे छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी धर्मांतरास केलेला विरोध व सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या दोन पुत्रांचे धर्मांतर या दोन्ही घटना भिन्न असुन त्या जोडुन मांडु नये.

छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन 🙏🙏 व सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🚩🚩🌷🌷
- राजेनरेश जाधवराव

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...