विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 May 2021

सरदार राणोजी शिंदे

 


सरदार राणोजी शिंदे

शिंदे घराण्याचा राजकीय उत्कर्ष हा राणोजी शिंदे यांच्यापासून झाला असे दिसून येते. राणोजी शिंदे हे जनकोजी शिंदे व द्वारकाबाई शिंदे यांचे पुत्र होय. राणोजींची जन्मतिथी अगर पूर्वायुष्यातील गोष्टींबाबत फार सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. परंतु त्यांनी पेशव्याची चाकरी पत्करली व त्यात त्यांच्या उर्जितावस्थेत प्रारंभ झाला असे दिसते.
इ.स १७१६ मध्ये राणोजी शिंदे यांनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे नोकरी पत्करली. पेशव्याच्या पदरी नोकरी पत्करल्यानंतर त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे दिसून येते. राणोजी शिंदे बाळाजी विश्वनाथ याकडे राहिले असता त्यावेळी ते 'पावलोक' या पदावर कार्यरत होते. पुढे राणोजी शिंदे यांची पावलोक या पदावरून १७२१ मध्ये 'बारगिर' म्हणून नेमणूक झाली.
इ.स १७२४ मध्ये पेशवा बाजीराव यांनी राणोजी शिंदे यांना बारगीर या पदावरून 'करोल' या पदावर नेमले. अल्पावधीतच ते ५ नोव्हेंबर १७२४ रोजी 'करोल' या पदावरून शिलेदार बनले.
पेशवा बाजीराव यांनी माळव्याच्या स्वारीचे वेळी शिंदे, होळकर व पवार या सरदारांना आपल्याबरोबर नेले होते. माळ्याचा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला असता शिंदे, होळकर पवार व स्वतः पेशवे यांनी माळव्याच्या उत्पन्नाची वाटणी करून सनदा दिल्या. त्या पुढील प्रमाणे-
पेशवे- ४५
शिंदे- २२
होळकर- २२
पवार- १०
मराठ्यांनी पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली निजामाचा पराभव केला. निजामाचा पराभव करण्यामध्ये प्रामुख्याने राणोजी शिंदे यांचे कार्य महत्त्वपूर्ण होते. याचे फळ म्हणजे इ.स १७३० मध्ये राणोजी शिंदे यांना 'सरदार' म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर रानोजींनी सुभेदार व राव शबहाद्दर असे बहुमान अल्पकाळातच मिळवले.
मराठ्यांनी जेव्हा माळवा प्रांत जिंकला त्यावेळी त्या प्रांताच्या बंदोबस्ताकरिता मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांनी आपल्या प्रांताची व्यवस्था पाहून जवळील मोगलाई मुलुखातून चौथाई वसूल करण्याचा आपला हक्क त्यांना दिला. शिंद्यांनी 'उज्जैन' आणि होळकरांनी इंदोर' हे आपले मुख्य ठिकाण केले.
राणोजी शिंदे यांचे मराठेशाहीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिंदेशाहीचे संस्थापक म्हणून त्यांना मान दिला जातो. राणोजी शिंदे यांचा पावलोक ते बारगीर, शिलेदार, सरदार व सुभेदार असा उत्कर्ष झाला. त्यांनी मराठा सैन्यात साधा सैनिक म्हणून नोकरी पत्करली व नंतर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सुभेदार पदापर्यंत झेप घेतलेली दिसून येते.
सरदार राणोजी शिंदे यांना मानाचा मुजरा!!!
संदर्भ- महादजी शिंदे आणि मराठी सत्ता (शोधनिबंध)
@maratha_riyasat ©

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...