विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 May 2021

धर्मवीर गड पेडगाव

 











धर्मवीर गड पेडगाव

.
हा पेडगाव चा भुईकोट किल्ला बहादूर गड आणि धर्मवीर गड या नावांनी प्रसिद्ध आहे. हा पेडगाव चा किल्ला तसा भव्य नाही पण या किल्ल्यात प्रवेश केल्या केल्या इतिहासातल्या काही घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि प्रत्येक माणसाच्या अंगावर शहारे आल्या शिवाय रहात नाही .प्रवेश केल्या केल्या समोर शौर्य स्तंभ दिसतो आणि त्या शौर्य स्तंभा समोर नतमस्तक झाल्या शिवाय माणूस रहात नाही.
त्यात त्या कवी कलशांच्या ओळी समोर दिसतात.
यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग|
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग |
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग|
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग||'
.
या ओळी वाचल्यावर परत एकदा अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही . पण जेव्हा आपण धर्मवीर गडाला भेट देतो तेव्हा तिथली परिस्थिती पाहून आणि गडाची सध्याची अवस्था पाहून खेद वाटतो .
या जागेला एवढा मोठा इतिहास आहे आणि या जागेची झालेली दुर्दशा पाहून मनात नक्की एक विचार येतो की हीच का आपली देशभक्ती ???
अहमदनगर पासून एवढ्या जवळ अंतरावर असूनही किती जणांनी या गडाला भेट दिली असेल??हा प्रश्न दूरच राहतो,ही जागा किती जणांना माहीत असेल? हा प्रश्न मनात घोळत राहतो.
खरचं प्रत्येकानी या किल्ल्याला नक्की भेट द्या .
या किल्ल्यामध्ये ४ प्राचीन मंदिर आहेत आणि या सगळ्या मंदिराची रचना व कोरिवशिल्प काम नक्कीच मनात घर करुन राहत .
गडा शेजारून वाहत असलेल्या भीमा नदीच विहंगम दृष्य पाहून मनाला आल्हाददायक वाटतं.
.
लोकांकडे किती थोडा इतिहास असून त्याला ते भव्य रूप देतात आणि आपल्या या एकाच गडाला एवढा मोठा इतिहास आपण तो जगासमोर आणायचं तर सोडाच त्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या या गडाची सध्याची अवस्था पाहून आपलीच आपल्याला लाज वाटल्या शिवाय रहात नाही .
-मनीष दाणी
. @mr.clickseeker
@maharashtra_desha @maharashtra_forts @gadkille @gadkot__ @ilovenagar @meahmednagarkar @myahmednagar @maharashtratourismofficial
@history_maharashtra

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...