Jai jijau Jay Aadivasi
कल्याण भिवंडी ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी जहाज बांधणीच्या कामास सुरुवात केली. मराठ्यांच्या विख्यात आरमाराची ही सुरुवात ठरली. ( *शिवरायांचा* *प्रताप* - *अशोक* *राणा* )
कल्याण भिवंडी फिरंगीयावरी स्वारी केली. राजश्री सामराजपंत यांचे चुलतबंधु दादाजी बापू यांस रवाना केले. तेसमयी कान्होजी नाईक याजवळ दादाजी कृष्ण व त्यांचे बंधु सखो कृष्ण मागोन घेतले. त्याबरोबर मावळच्या देशमुखांचा जमाव व मावळे लोक होते .तो अगदी पोख्ता जमाव देवून कल्याणचा नामजाद हवाला दादाजी कृष्ण ( दादा कृष्ण लोहकरे , सखो कृष्ण लोहकरे )यास सांगितला व सखोपंतास भिवंडीचा हवाला सांगितला आणि रवानगी केली.( वा सी बेंद्रे - श्री छत्रपती शिवाजी महाराज )
सखो कृष्ण लोहकरे दादा कृष्ण लोहकरे यांचे बंधु फ़िरंगियाचे युद्ध पडले. ( मृत्युमुखी पडले)
दादाजी रांझेकर यांनी कल्याण तर सखो कृष्ण लोहकरे यांनी भिवंडी एकाच दिवशी स्वराज्यात सामील करून घेतले. (दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास )
अश्विन वद्य द्वादशिस दादजीस कल्याण
भिवंडी राजरश्रीनि घेतले ते समयी बापूजीस
सुभा सांगोन रवाना केले तेव्हा
कान्होजी नाईक जेधे याजपासुन
दादाजी कृष्ण लोहकरे त्यांचे भाऊ
सखो कृष्ण लोहकरे
शके 1579 हेमलंबी संवछर
यांस माग़ोन घेतले आणि दादाजी
पंत यांस कल्याणचा नामजाद हवा
ला व सखोपंतास भिवंडीचा हवाला
सांगितला येथील गोपीनाथ यांनी
आपले भाऊ कान्होजी नाईक जेधे यां
कडील कारभार आम्ही करीत होतो
तैसाच करावा म्हणून हाती दिल्हे
( शिवचरित्रप्रदीप- द वी आपटे स म दिवेकर
जेधे यांची शकावली)
पूर्वी कल्याण- भिवंडी असा संयुक्त प्रांत होता. 1657 च्या सुमारास शिवाजी राजांनी सखो कृष्णा लोहकरे या सेनापतीस पाठवून कल्याण-भिवंडी जिंकून घेतले.
(भिवंडी बयान- सुधीर घनवटकर)
पुण्याखाली 12 व जुन्नरखाली 12 अशी 24 मावळे त्या काळी होती.
शिवनेरी किल्ला मीना व कुकड़ी नदीच्या मध्यवर्ती खोरयात आहे.
नीर म्हणजे पाणी आणि नेर म्हणजे त्या खो-यातील विशिष्टय प्रदेश .
प्रत्येक मावळ म्हणजे नदीचे एक खोरेच होते.
मावळे
मिननेर किंवा मिन्नेर, जुन्नर किंवा कुक्कड़नेर
शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवाई देवी जुन्नर परिसरातील आदिवासी ठाकर कोळी समाजाची कुलदैवता आहे.
दादा कृष्ण लोहकरे व सखो कृष्ण लोहकरे हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे लढवय्ये ,पराक्रमी शिलेदार. जुन्नर परगना म्हणजेच जुन्नरचे बारा मावळ. जुन्नर परगन्यातिल महादेव कोळी, ठाकर , भिल्ल समाजाने रक्ताच्या शाईंने स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. पण हा इतिहास दुर्लक्षित आहे.
आज इतिहासाची पाने उलगडत आहे.
कोळी चौथरा( शहाजीराजे यांचे कारकीर्दीत 1600 कोळी बांधवांचे शिवनेरी किल्ल्यावर मुंडक्यांचे शिरकाण मोगलानी केले , माहुली तहा नंतर
शिवनेरीवर शाहजीराजांच्या काळात, पेशवे काळात पेशव्याविरुद्ध उठाव.
इंग्रजांविरुध्द जुन्नरमध्ये आदिवासिनच्याच रक्ताचे सड़े पडलेले आहेत.
इतिहास आजही आदिवासी कोळी ठाकर यांच्या इतिहासाची गगनभेदी ललकारी देत आहे.
Wr by
गौतम डावखर
9890296490
No comments:
Post a Comment