वेध इतिहासाचा.
गणेश उत्सवाचे अद्य संस्थापक भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी .
१८ व्या शतकातिल एक अपरिचित अग्रगण्य नाव.मुळ व्यवसाय शालू रंगवणे तसेच राजवैद्य म्हणुन परिचित होते . इग्रजांन विरुध्य बंड करण्या साठी व लोकांन मध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश उत्सवाची सुरवात केली.त्यांचा गणपती पाहिल्यानंतर अस दिेसत की गणेशाने चारही हातात आयुध (शस्त्र )घेउन असुराचा वध केला आहे .असा प्रतिकात्मक गणपती च्या रुपाने लोकांना सांगीतल की तुम्ही पण हातात शस्त्र धारण करा व या इंग्रजरुपी असुरांचा नाश करा.
भाऊ रंगारी गणपती त्यांच्या वाड्या च्या बाजुला गणपती उत्सवात देखाव्यात बसवतात. त्यांचा वाडा म्हणजे पुण्याचे एक वैभव असुन हा वाडा प्रत्येकाने पहावा असा आहे. या वाड्यात प्रवेश करतानाच डाव्या हाताला तळघर असुन येथेच इंग्रजांन विरुध्य आनेक कारस्थान रचली गेली.वरच्या मजल्यावर समोरासमोर दोन खोल्या असुन एका खोलीत इंग्रजां विरुध्य बंडा साठी वापरलेल्या आनेक बंदुका ( लहान मोठे) तलवारी,तोफ गोळे, बारुद दानी,काडतुस असे आनेक शस्त्र पाहण्यासाठी ठेवली आहेत.ही सर्व शस्त्र मागील काही वर्षा पूर्वी वाड्यात सापडली आहेत .आज ती आपणास पहावयास मिळतात.समोर च्या खोलीत तुळ्यांवर आनेक हंड्या लटकवकेल्या आसुन ते आपल्या वैभवाची साक्ष देतात.याच खोलीत सार्वजनिक गणेशउत्सवाची पहिली मुर्हतपेढ रोवली गेली.
भाऊ रंगारी गणपती मानाच्या पाच गणपती मध्ये नसला तरी ह्या गणपतीनेच सार्वजनिक गणेशउत्सवाचा श्रीगणेशा झाला असे म्हणावे लागेल. असा हा भाऊ रंगारी गणपती पाहण्यास पुण्यात याल तेव्हा या वास्तुला जरुर भेट द्या.किवा पुण्यात फिरायला आला तर हा वाडा नक्की पाहुन जा.
अधिक माहिती साठी ह्या वाड्यातील विश्वस्त आपणास जागेवर आधिक माहीती देतील तसेच आनेक माहिती खालच्या खोलीत फोटो रुपाने आपणास मिळते.
या वाड्यात कायम स्वरुपी हे संग्रालय उभे आहे.
हा वाडा एक पवित्र वास्तू असून भारतमातेच्या स्वातंत्रसाठी कार्यकरणा-या क्रांतिवीरांचा हा वाडा #कोट ठोरला आहे. या वाड्यां आनेक देशभक्त भुमीगत असताना कधी फितुरी झाली नाही.
याच पावित्र आपण वाडा बघतांना जपायला पाहिजे.
संतोष चंदने , चिंचवड पुणे.
No comments:
Post a Comment