मोरे राजे
पुरातन कालीन भारत खंडामधील तत्कालीन राज घमोरे राजेराण्यांची संस्थाने असून त्या पैकीच सह्याद्री पर्वत रांगांच्या निसर्ग रम्य डोंगर माथ्यावर थंड हवेच्या घमदाट अरण्यात श्री क्षेत्र महाबळेश्वर या महादेवाच्या स्वयंभू लिंगाच्या सानिध्यात पंच नद्यांचा उगम झाला.कृष्णा ,कोयना,वेण्णा,सावित्री,गुप्त गायत्री तत्कालीन कालखंडात या प्रदेशावर शिलाहार राजाचे आणि नंतर मोरे राजे यांचे 9 पिढ्या राज्य होते याच मोरे घरण्यातून इ.स.१२१५ मध्ये जावळीच्या मोरे घराण्यातील थोर पुरुष विश्वंभर बाबा मोरे यांनी देहूला प्रयान केले त्यांच्या पासून 8व्या पिढीला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म झाला.
*जावळी*हे गाव ऐतिहासिक मोरे राजे यांची राजधानी कोयना नदीच्या काठावर वसलेली शिवजन्मापूर्वी 9 पिढ्या या प्रदेशावर राज्य करीत होत्या रायरी,जोर,पाली,चतुरबेट, शिवथरघळ, चिपळूण व जावळी मुख्य गादी जावळीला असून या प्रदेशातील कोकणातून घाटमाथ्यावर येण्या-जाण्यासाठी घाटांचा उपयोग केला जात होता मोरे राजे व छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे जाणे येणे उठणे बसने सर्व काही चालू होते दौलतराव मोरे यांचे नंतर बागराव शिवतरघळ यांचा मुलगा यशवंतराव यांना गादीवर दौलतरावांची पत्नी मानकाबाई ,कारभारी हनुमंतराव मोरे व शिवाजी महाराज यांनीच जावळीच्या सुभेदार पदी बसवले.
स्वराज्य स्थापणेस महाराजांना यशवंतरावांनी विरोध केल्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी केली त्यावेळी महाराजांनी 15 दिवस जावळीत मुक्काम करून कृष्णाजी बाजी मोरे यांना सुभेदार पदी बसविले आणि देवस्थानचे व्यवस्थापन केले त्या लढाई कालखंडात स्थलांतरीत झालेली मोरे घराणी कुलदैवत कालभैरवनाथांच्या दर्शनाला येत असतात तसेच 1545 साली पार गावी श्री समर्थानी बसवलेल्या रामवरदायिनी मूर्तीशेजारी वरदायिनीची मूर्ती बसविली असून त्या वेळचे शिक्के आजही उपलब्ध आहेत जावळीच्या लढाईनंतर शिवाजी महाराजांनी मोरे राजांनी पार गावी बसवलेली मूर्ती संग्रही ठेऊन त्या ठिकाणी महाराजांनी नवीन मूर्तीची स्थापणा केली तसेच श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवस्थानात 1545 साली पितळी नाग,पितळी घंटा याचे व्यवस्थापन केले 18व्या शतकातील महाबळेश्वर, पुरातन मोरे घराणी,12 वे शतक,16 व्या शतकातील तुकाराम महाराज व शिवाजी महाराज भेट सचित्र माहिती पुरातत्व विभाग पुणे,भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे,नाशिक,देहू,सातारा वइतिहास तज्ञांकडे उपलब्ध आहे.
मोरे घराण्यांबाबत दुर्मिळ माहितीसाठी संपर्क-
नारायण मोरे (गुरुजी)
मु. जावळी, महाबळेश्वर
No comments:
Post a Comment