विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठे महाराष्ट्र सोडून इतक्या लांबच्या प्रदेशात उत्तर हिंदुस्तानात का गेले ? भाग १

 

मराठे महाराष्ट्र सोडून इतक्या लांबच्या प्रदेशात उत्तर हिंदुस्तानात का गेले ?
पानिपतचा रणसंग्राम
सांभार :मुकुंद पायगुडे (सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज )

भाग १
हा प्रश्न वाचकांना पडेल ? त्याचे उत्तर असे आहे की,अफगाणिस्तानचा बादशहा अब्दाली याने दिल्लीवर अनेक स्वाऱ्या संपत्तीच्या लोभाने केल्या. इ.स १७५२ मध्ये त्याने पंजाब जिंकून घेतला त्यामुळे मुघल प्रदेशात अंदाधुंदी निर्माण झाली होती या परिस्थितीत त्यांना मराठ्यांची मदत आपल्या सौरक्षणासाठी घेणे गरजेचे वाटले म्हणून अयोध्येचा नवाब सफदरजंग याने मुघल बादशहातर्फे मराठ्यांशी एक करार केला. या करारानुसार मराठ्यांनी मुघल सत्तेचे रक्षण करावे व त्या बदल्यात पंजाब,मुलतान,राजपुताना,सिंध,रोहील खंड या प्रांतातून मराठ्यांनी चौथाई वसूल करावी याचप्रमाणे हक्क मिळाले. यालाच अहमदीया करार म्हंटले आहे . या करारानुसार मराठे उत्तरेकडे गेले.
इ.स १७५१ मध्ये अयोध्येचा नवाब सफदरजंग याने बंगशाचा पराभव करण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली.त्याचप्रमाणे मराठ्यांनी बंगशाचा पूर्ण पराभव करून गंगा यमुनेच्या दुआबात आपली सत्ता बसविली.सन १७५२ मध्ये अब्दालीने हिंदुस्तानावर तिसरी स्वारी केली. यावेळी गाजीउद्दीन वजीर याने सफदरजंगच्या मदतीने दिल्लीची सात काबीज केली.नबाद शहा अहमदशहा यास पदच्युत केले व दुसऱ्या आलमगीर यास दिल्लीच्या गादीवर बसविले. याकामी त्याने मराठ्यांची मदत घेतली.पुढे इ.स १७५६ मध्ये अब्दालीने दिल्लीवर पुन्हा स्वारी केली व दिल्ली,मथुरा पुन्हा लुटले.अब्दालीचा बेत दिल्लीत कायम राहण्याचा नव्हता. स्वदेशी परत जाताना त्याने नजिबखानास दिल्ली इथे व आपला पुत्र तैमूर शहा यास लाहोर येथे प्रतिनिधी नेमले. गाजीउद्दीनास हे सहन झाले नाही त्याने मराठ्यांस पुन्हा आवाहन केले. त्यांचप्रमाणे मराठ्यांकडील श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली इ.स १७५८ मध्ये पंजाबवर स्वारी करून तैमूरशहास अटकेपलीकडे पिटाळून लावले. हाच अटकेपारचा ऐतिहासिक विजय. या अटकेच्या दैदिप्यमान विजयात साबाजी शिंदे,मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर ,गोपाळराव गणेश,तुकोजी खंडोजी कदम , नरसोजी पंडीत इत्यादी शुर सेनानी होते. पंजाबमध्ये मराठ्यांची सत्ता अधिक काळ टिकली नाही. अब्दालीने इ.स १७५९ च्या ऑगस्ट महिन्यात पंजाबवर पुन्हा स्वारी केली तेथील सुभेदार साबाजी शिंदे यास अटकेतून पुन्हा पळावयास भाग पाडलेव रोहिल्यांच्या मदतीने त्याने दिल्लीकडे आपला मोर्चा वळविला.दिल्लीच्या रक्षणासाठी असलेल्या दत्ताजी शिंदे यांची अब्दालीशी यमुनेच्या काठावर बुराडी घाट येथे गाठ पडली यात दत्ताजी शिंदे मारला गेला. हि घटना १० जानेवारी १७६० रोजी घडली. त्यांनतर दत्ताजीचा पुतण्या जनकोजी शिंदे हा राजपुतण्यात मल्हारराव होळकरांकडे आश्रयास गेला . इ.स १७६० मार्च महिन्यात मल्हारराव होळकरांचा अब्दालीने पराभव केला व मराठ्यांचे उत्तरेकडील वर्चस्व कमी केले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...