मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद पेशवे
भाग २
भट घराणे श्रीवर्धन मधील प्रतिष्ठित घराणे. जे पुढे स्वराज्याचे पेशवे म्हणून नावारूपाला आले.
या घराण्यातील पहिल्या पुरुषाचा उल्लेख महादजीपंत भट या नावाने मिळतो. जे दंडा-राजपुरी येथील देशमुखी सांभाळत होते.
महादजीपंत भट - एकूण मुले दोन. = १. परशुराम पंत २. नारोपंत.
परशुराम पंत - एकूण मुले दोन. = १. विश्वनाथ २. कृष्णाजी.
विश्वनाथ परशुराम भट -एकूण मुले पाच .= १.कृष्णाजी. २. जनार्दन. ३. रुद्रजी ४. बाळाजी(बालाजी विश्वनाथ भट) ५.विठ्ठल.
बाळाजी विश्वनाथ भट (भट घराण्यातील पाहिले पेशवे) - पत्नी - राधा बर्वे - एकूण मुले सहा. औरस = १. थोरले बाजीराव. २. चिमणाजी (इतर नावे - अनंत, चिमजीआप्पा) ३. भिऊबाई. ४. अनुबाई. अनौरस = १. राणोजी शिंदे. २. भिकाजी शिंदे.
बाजीराव बल्लाळ भट. मूळ नाव - विश्वनाथ, विश्वासराव. - पत्नी - काशीबाई जोशी - एकूण मुले सहा. औरस = १. नानासाहेब २. रामचंद्र(बालमृत्यू) ३. मुलगा(बालमृत्यू) ४. रघुनाथराव ५.जनार्दन. अनौरस = १. समशेर बहादूर(कृष्णराव - मस्तानीबाई)
नानासाहेब बाजीराव भट . मूळ नाव - बल्लाळ, बाळाजी. - पत्नी - गोपिका रास्ते, राधा वखारे. एकूण मुले पाच. १.विश्वासराव २. माधवराव. ३. यशवंत(बालमृत्यू) ४.मोरेश्वर(बालमृत्यू) ५.नारायणराव.
माधवराव बाळाजी भट. - पत्नी - रमाबाई जोशी. - संतती नाही.
नारायणराव बाळाजी भट - पत्नी - गंगाबाई एकूण मुलं एक. १. माधवराव.(सवाई)
रघुनाथराव बाजीराव भट - पत्नी - आनंदी ओक. एकूण मुले सहा. १. भास्कर. २. विनायक ३. दुर्गाबाई ४. बाजीराव. ५.चिमणाजी. दत्तक - १. अमृतराव
सवाई माधवराव नारायणराव भट - पत्नी - यशोदा गोखले. संतती नाही.
बाजीराव रघुनाथ पेशवे - पत्नी- सरस्वतीबाई. औरस संतती नाही.
No comments:
Post a Comment