विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 May 2021

दत्ताजी शिंदे तो ईश्वराचा शिपाई

 


दत्ताजी शिंदे तो ईश्वराचा शिपाई
पोस्टसांभार : गडप्रेमी बाळासाहेब पवार
पौष महिना होता , उत्तरेत अतिशय कडक प्रमाणात थंडी असते , या दक्षिणेतल्या मराठ्यांना थंडीची फार तर सवय नव्हती .अब्दालीस रोखण्यासाठी राणोजीपुत्र वडील बंधू जयप्पाचे शिंदेचे यांचा खुनाचा बदला घेऊन दत्ताजी यांनी यमुना ओलांडून शामलीला मुक्काम केला , नाजीबाची गय करू नका म्हणून नानासाहेबांनी सांगितले होते पण मराठे नद्या ओलांडून जायचे तंत्र अवगत नव्हते ।म्हणून नाजीबास सख्य धरून त्याकडून होड्यांचा पूल बांधून गंगा ओलांडायचा बेत होता शामळीच्या छावणीत दोघांची भेट ही झाली होती दत्ताजीस मदतीचे अस्वसन देता त्याने रोहिल्यांची जमवाजमव सुरू केली होती .
शुक्रतालास पूल होता तो रसद गंगापारकरून आणत होता आणि अवधाच्या शुज्यास त्याने मराठे गंगा पार करून अवध वर येतील तुम्ही मला साथ द्या नाजीबाने हळूहळू दत्ताजीविरोधात मोठी फळी उभी केली .
नाजीबाने अब्दालीस पत्र पाठवून आपल्या देशबांधवांना मराठ्यांपासून वाचवण्यासाठी हा देश मराठ्यांपासून सोडवण्यासाठी अब्दालीस भीक घातली होती . वजीर इमादने बादशाही कुटुंबातील सदस्यांना छळ केल्याने बादशहाने देखील अब्दालीस बोलावले होते .
एवढेच नव्हे तर इथे जयपूर जोधपूरच्या राजपुतांनी देखील मराठांच्या धास्तीने त्यांना थांबवायला अब्दालीस बोलावले होते .उत्तरेत मराठ्यांना मित्र उरले नव्हते जे काही असेल ते स्व बळावर मराठे उत्तर भारतात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते .
त्यात दत्ताजी शिंदे फार अनुभवी कसलेला योद्धा अब्दालीस ही भीड राखणार नाही असा पराक्रमी योद्धा होता .
नाजीबाची पूल बांधून देण्याची चालढकल ध्यानात घेऊन छावणी मिरनपुरला हलवली होती जवळच शुक्रतालास नजीब होता त्याचे पारिपत्य करायचे ठरवले होते .
शुक्रताल या प्रदेशात उंच सखोल भागात हजारो रोहिले बंदूक घेऊन तयार होते आणि तोफा दडवून उभे होते , हा भाग अतिशय दलदलीचा त्यामुळे मराठ्यांच्या घोडदळाला अतिशय त्रासदायक ठरला , शुक्रताळजावल एक नदीच पात्र होत त्यामुळे दलदलीच मोठं बेटं तयार झालं होतं . नाजीबाने खंदक खणून तट उभे केले होते , दत्ताजींला जो पूल हवा होता तो पूल नाजीबने बांधून आपल्या दळणवळण सुरू केले .
दत्ताजींच्या घोडदळाला दलदळीमुळे मोठे हल्ले करता येत नव्हते पावसामुळे हालचाली थंडावल्या होत्या .
शुज्यास वारंवार पत्र पाठवून नाजीबाने इमादशी मराठ्यांची युती जुळलेली पाहून शुज्याने दोन गोसावी टोळीप्रमुख नाजीबाकडे पाठवले .
मराठे हजारो मैल कोसो दूर अनोळखी प्रांतात जाऊन बसले होते दत्ताजींच्या घोडदलाने दोन भाग करून चाल करायचे ठरवले , नाजीबाची सैन्य दडून वाट पाहत होते घोडदळ शुक्रतालच्या घळीजवळ आले आणि दडून बसलेल्या रोहिल्यांनी अचानक हल्ला चढवून गोळ्यांचा वर्षाव केला जनकोजी शिंदे जखमी झाले सैनिक पडले आणि दातराजीस हल्ला थांबवावा लागला .
दत्ताजीन बुंदेल्यास गंगा पार करून नाजीबाच्या मुलखात हल्ले करायला पाठवले 1759 ऑक्टोबरमध्ये हल्ले केले आणि नजीब हताश होऊन हाफिज रेहमत आणि दूदेखान यांना मदतीला बोलावले पण यांचा पराभव बुंदेल्याने केला .
बुंदेल्याने नाजीबाकडे रसद जाणाऱ्या पुलकडे सैन्य वळवले पण नाजीबने सुज्याच्या कडवट सैन्याला पाठवून गोसाव्यांच्या उग्र हल्ल्याने बुंदेला पराभव पत्करून निघून आला.
अब्दालीने पाचव्या स्वारीची तयारी करून 1759 सप्टेंबरमध्ये कंदारमधून निघून दोन मार्ग निवडले . खैबर खिंडीत 20 हजार सैन्य तर बोलन खिंडीत 40 हजार सैन्य घेऊन सिंधू नदीतून गझिखान गावी आला .
मोठं सैन्य येत असल्याने साबाजी शिंदे पेशवरहून माघार घेतली , दत्ताजीन अहमदखान बंगश आणि सुराजमल यास मदतीस बोलावले जयपूरला असलेल्या मल्हाररावांस ही बोलावले आणि 11 डिसेंम्बर 1759 अब्दालीशी सामना करण्यासाठी यमुना गाठली .
शुक्रताल सोडून दिल्ली बचावासाठी 16 डिसेंबरमध्ये कुंजपुर्यास आला आणि गर्भवती पत्नी आश्रित लोक इथे ठेऊन जड समान दिल्लीत पाठवले .
दत्ताजींच्या तयारी बघून अब्दालीने नाजीबास मिळण्यासाठी यमुना ओलांडली आणि दत्ताजीस सरळ भिडन टाळलं .
20डिसेंम्बर1759 ला शिवाजी भुईटे यांच्या नेतृत्वाखाली पुढे निघालेल्या मराठा सैन्याची गाठ अफगाण सैन्याशी पडली आणि अफगाण सैन्यास मागे रेटले पण इमाद आणि मराठ्यांच छोट सैन्य शहा पसंदखानाचे 5000 सैन्यापुढे इमादने पळ काढला आणि अब्दालीच्या तोफांनी मराठे कमी आले .
मराठे भाले , तरवरीच्या पुढे तोफा सरशी ठरली , मृत सैन्यांचे शीर कापून नेऊन धड मैदानात असलेले पाहून दातराजी क्रोधीत झाला आणि तोफखाना मागे असल्याचा पाश्चाताप झाला .
अब्दाली दातराजीस थेट भिडू शकत नव्हता म्हनून रातोरात बुधियाजवल यमुना ओलांडून शुक्रताल वाट धरली .इकडे दत्ताजीन मल्हाररावांना तातडीने येण्यासाठी निरोप पाठवला , करण दत्ताजी पण मल्हारराव येई पर्यंत लढाईस तोंड द्यायचे नव्हते .
अब्दाली सरहानपुराला नाजीबास मिळाला ही सेना यामुनेच्या डाव्या तीरावर दिल्लीकडे निघाली तर दत्ताजी उजव्या तिरावरून कुंजपुर्यास आला 27 डिसेंबर ला दत्ताजी सोनपात ला येऊन अब्दालीस यमुना पार करू द्यायची नव्हती , 5 दिवस सोनपात येथे काढल्यावर चौक्या उभारून दत्ताजी दिल्लीकडे निघाला .
जानेवारीत 1760 कोरड्या मोसमात नद्या आतल्या याबदली लुनी येथे होता अब्दाली यमुना ओलांडू नये म्हणून दत्ताजीन ठिकठिकाणी चौक्या उभारल्या होत्या , होळकर येइपर्यंत लढाईस तोंड देणार नाही हे ठरवून होता पण अब्दालीने लढाईस तोंड दिले होते .
10 जानेवारी 1760 ला संक्रांत होती दत्ताजींच्या सैन्य कडाक्याच्या थंडीत धुक्यात यमुना काठी सज्ज होते इमाद घाबरला होता , दत्ताजीन उदगार काढले होते ते असे ,
दुराणी नामर्द त्याच्याने काय होणे ?
आणि त्यास दिल्लीस पाठवले त्याच दिवशी सणाच्या वेळीच आठ मैलांवर चार ठिकाणी अब्दालीने यमुना ओलांडण्याचे ठरवले आणि ही गुप्तता ठेवली .
थंडीतल्या धुक्यामुळे निमच पात्र नदीच दिसत होतं दत्ताजींच्या उत्तरेकडे , साबाजी 700 सैन्यासह बुरडी घाटात उभा होता इथं खाली गेलेल्या पात्राचे दोन भाग झाले होते पूर्वेकडे जास्त ते पश्चिमेकडे अरुंद प्रवाह होता या दोन प्रवाहामध्ये एक बेटं उभ होत ते बेट जाऊ नावाच्या उंच आणि झाडाझुडपांनी आच्छादले होते रात्री न कळत अफगाण या आणि रोहिले बंदूकधारी येऊन दडून बसले , नाजीबाच सैन्य अलीकडे तीरावर येइपर्यंत सबाजीस कसलीच वार्ता नव्हती .
मराठ्यांच्या बाजूचा काठ दलदलीचा होता आणि मराठ्यांचे घोडदळ उपयोगीच नव्हतं , साबाजी प्रतिकार करण्याआधी च अफगाण सैन्याने जबर तुफानी गोळीबार होऊ लागला , हातात तरवार असनारे मराठे पीछेहाट होऊ लागली याची वार्ता दातराजीस लागली आणि सबाजीपुत्र बायजीस 5000 सैन्य देऊन पाठवले .
लवकरच बायजी पडले आणि मराठे रन सोडून सैरवर पळत आहेत याची वार्ता दत्ताजींच्या कानी आली आणि क्रोधीत दत्ताजी घोड्यावर उडी मारून थेट बुराडीस निघाला , त्याने जनकोजीस मागे थांबायला सांगून सैन्य घेऊन बुराडीकडे धाव घेतली .
दत्ताजी नैऋत्य दिशेने आला मागोमाग जनकोजी ही होता , हातात भाला आणि क्रोध हल्ला चढवला दत्ताजी स्वत भाल्याने रोहिले भोकासीत चालला होता , तोफांचा भडिमार चालूच होता , दत्ताजी पुढे होऊन रोहिले मारीत होता , मराठ्यांनी रोहिल्यांच्या निषणावर रोख धरून हल्ला केल्याने रोहिले नदीच्या पात्रात कठापालिकडे रेटत गेले होते दत्ताजीस गोळी लागली आणि दत्ताजी घोड्यावरून खाली पडला आणि दत्ताजी पडल्याने मराठ्यांच अवसान गळाल होत पण जनकोजीने सावरण्याचा प्रयत्न केला तर त्यासही दंडात गोळी लागली आणि तोही पडला पण त्यास मराठा सैन्यांनी पळवले पण दत्ताजी रणांगणावरच जखमी , थंड पडत चाललेला देह कसाबसा सावरत होते तेच नाजीबखनाचा गुरू कुतुबशाहा तेथे आला त्यानं उपहासाने दत्ताजीस विचारले ', क्यू पटेल , अब कैसे लढोगे ?'
त्यावर जखमी थंड पडलेल्या दत्ताजीन खड्या आवाजात उत्तर दिले ' बचेंगे तो और भी लडेंगे ' .आणि मृत्यूच्या दारात उभा असलेला एक जखमी शिपाई असा उर्मट उत्तर देतो हे पाहून कुतुबशाहने शिरच्छेद केला आणि ते शीर अब्दालीकडे पाठवले .
दत्ताजींच्या या रणभूमीवरील कैशल्य , रणनीती , आश्रतींना मागे ठेवणे चहू बाजूने चौक्या बसवणे , सैन्य खचल्यावर स्वतः हा तरवार घेऊन तोफांच्या भडीमरात घुसने , मृत्यूच्या दारात उभे राहून मृत्यूलाच आव्हान करणे , दत्ताजींच्या आशा अनेक बाबी लक्षात घेतलात पाहिजेत ,दत्ताजींच्या प्रमाणे होळकर वेळेवर पोचले असते तर पानिपत घडलेच नसते .
गडप्रेमी बाळासाहेब पवार
9604058030

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...