सदर पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा करारीपणा दिसून येतो.
“आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे”
“हा प्रदेश काबीज करायची गोष्ट कशाला करता!”
“आपल्या भुमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे”
“मी आपले कर्तव्य बजाविण्यास कधी चुकणार नाही”
पत्रातील वरील वाक्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रूबाब आणि त्याकाळातील दरारा अधोरेखित करतात.
प्रस्तुत पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६३ च्या दरम्यान आपला फारसीनवीस नीलप्रभू याच्या हस्ते पाठवले होते. वरील पत्राचा अनुवाद जदुनाथ सरकारांनी ‘Modern Review’ आणि सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत भाग १ पृ. २९४’ मध्ये छापला होता. याच पत्राचा उल्लेख स्व.निनादजी बेडेकर यांनी आपल्या एका भाषणात केलेला आहे.
संदर्भ : शिवकालीन पत्रकार संग्रह खंड १ लेखांक ९८२
पोस्ट Shekhar Shinde sarkar
No comments:
Post a Comment