विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 June 2021

“बायजाबाई शिंदे”..

 

राणोजी शिंदे यांच्यापासून सुरु झालेली शिंदे घराण्याची पायाभरणी उत्तरोत्तर कर्तुत्वरुपी इमारतीच्या कळसाच्या रूपानेचं उंचावत गेली आजमितीला कण्हेर खेड इथले शिंदे मध्यप्रदेशमध्ये सिंधिया या नावानं शासन करत आहे एकसे बढकर एक कर्तुत्ववान योध्यांची खाण असणाऱ्या शिंदे घराण्यातील स्त्रियांचे कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगं होतं परंतु काळाच्या ओघात काही इतिहासाची पान निसटली किंवा काही तशीचं सोडून देण्यात आली त्यातीलचं एक नाव म्हणजे

“बायजाबाई शिंदे”... 🙏🚩
बायजाबाई म्हणजे ग्वाल्हेरच्या महाराणी त्यांचा जन्म इ.स १७८४ मध्ये झाला यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव बायजाबाई लहानपणी फार बाळसेदार व देखण्या होत्या त्या घोडयावर बसण्यात पटाईत अशा निपजल्या बायजाबाई शिंदे यांस कित्येक इतिहासकारांनी ‘दक्षिणची सौंदर्यलतिका’ अशी संज्ञा दिली आहे राजस्थानातील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले त्याप्रमाणे बायजाबाई यांचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले..
१८५७ च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा, याची योजना या चपात्यांच्या वाटपातून साकारली गेली युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर मथुरेला मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले या यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली. अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले हा यज्ज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला होता १८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा चोहीकडे पसरला होता २७ जून इ.स १८६३ रोजी ह्या राजकारस्थानी व शहाण्या स्त्री कैलासवासी झाल्या..
विद्वानांनी यांच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात तत्कालीन ‘मुंबई गॅझेट’ पत्रात बायजाबाईसाहेब संबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की.., बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राज स्त्री ही आपल्या परीने प्रख्यात असून, ह्यांनी अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...