जन्म = इ स १६४९-५० च्या सुमारास राजगड येथे झाला. म्रुत्यु = २७ जुन १७०८
धनाजीराव हे राजेलखुजीराव यांचे द्वितिय पुञ राजेअचलोजी यांचे पणतु होत. परंतु यांची शाखा यांचे आजोबा स्रजनसिँह/संताजी यांच्यापासुन राजमाता जिजाऊ साहेबासोबतच होती.
पुञ = संताजीराव,चंद्रसेनराव शंभुसिँह. आणि पतंगराव
कारकिर्द = यांचे युद्ध प्रशिक्षण प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली पुर्ण झाले.परंतु शिवरायांची नजर यांच्या शिक्षणावर होती.त्यामुळेच शिवरायांची लढण्याची रीत व कावे धनाजीरावानी पुर्णपणे उचलले होते.
1) इ स 1672 मध्ये प्रतापराव पराभव पाऊन पडल्यावर मागील पथकातील धनाजीराव यानी पराभुत सैन्यास धिर देऊन धनाजीराव ,संताजी घोरपडे व हंसाजी मोहिते यानी बहलोलखानावर हल्ला चढवुन पराभव केला.त्यावेळपासुन धनाजीराव याना स्वतंञ सरदारकी व हंसाजी मोहिते याना "हंबिरराव" किताब शिवरायानी दिली.
2) इ स 1674 मध्ये मोगल व आदिलशहा हे एकञ येऊन स्वराज्य बुडवण्याचा कट केला त्यावेळी शिवरायानी त्यांच्या प्रत्येक सरदारावर आपले कडील सैन्य पाठवुन पराभव केला.यात धनाजीराव यानी खुप पराक्रम केला .
3) सावनुरची लढाई = यावेळी यांचे वय 20 ते 25 दरम्यान होते.स्वतंत्रपणे लढाई देण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता.या लढाईत हंबीरराव मोहिते,धनाजीराव व संताजी घोरपडे यानी विजापुरकराची लंगडेतोड करुन विजय मिळवला.यात धनाजीराव यांच्या हालचाली विद्युतवेगाच्या होत्या. एवढ्या वयात एवढे मोठे जबाबदारीचे कार्य केल्यानंतर धनाजीराव आण्णाजी रंगनाथ मालेकर सोबत शिवरायाना भेटण्याकरिता रायगडावर गेले असता शिवरायानी त्यांची प्रशंसा केली व म्हणाले,"ही मनुष्य प्रतिस्रुष्टी निर्माण करतील.आम्ही येथे नसता बादशहाशी स्पर्धा करुन मुलुख घेऊन गर्वरहित केला.आम्हाशी बोलण्यास त्यास ऊरुज न राहिला,यांचे उतराई कोठे व्हावे? असो.आमच्या साह्यार्थ हे देवलोकाहुन मनुष्य रुपी निर्माण झाले असेच वाटते.जाधवराव 25 ते 30 हजार मुसलमान फौजेशी लढाई 6 ते 7 हजार माणसानिशी कशी केली?"
4) पुढे शिवरायांच्या म्रुत्युनंतर संभाजी महाराजाच्या कारकिर्दित औरंगजेबपुञ अजिम ने बागलाणात जाऊन साल्हेरचा किल्ला घेतला.त्याजवर सेनापती हंबिरराव,धनाजीराव व संताजी याना संभाजी महाराजानी पाठवले.या तिघांचा पराभव करुन मोगलानी सातार्यापर्यँत त्यांचा पाठलाग केला.यावेळी धनाजीरावानी मोगल अस्ताव्यस्त पाहुन माघारी तोँड फिरवले त्यामुळे मोगल मराठ्यांचे तावडीत सापडले .तिघानी तिन्हीकडुन हल्ला करुन पराभुत केले.
5) संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्याकडे धनाजीराव जाधवराव व संताजी घोरपडे हे दोन विशेष अनुभविक यौद्धे मराठ्यांकडे होते.इतर मराठे सरदार यांच्याच तंञाने वागत.धनाजीरावानी मुलुखाची नासाडी करुन मोगल सरदारास जेरिस आणले.त्यांच्यासमोर जो कोणी येई तो मरण पावे अगर त्यांच्या हातात तरी सापडे.एखादा कोणी निभावलाच तर कफल्लक होऊन परत जाई.मी मी म्हणणारे मुस्लिम यौद्धे यांच्यापुढे जाण्यास चळचळ कापत.त्यांच्याशी टिकाव धरणारा एकही योद्धा मोगलांपाशी नव्हता हे ऐकुन औरंगजेबाची पाचावर धारण बसली.इतका विलक्षण दरारा धनाजीरावांचा होता.तसेच त्याना "जयसिँगराव" हा किताब छञपतीनी त्यांचा पराक्रम पाहुन दिला होता.
6) छत्रपती राजाराम महाराजाच्या कारकिर्दित धनाजीराव व संताजी घोरपडे यानी स्वराज्य वाचवुन मोगलावर मराठ्यांची वचक बसवली त्या अतुलनिय पराक्रमास तोड नाही.त्यामुळेच राजाराम महाराजानी त्यांचा पराक्रम पाहुन दोन गावे मौजे पाडळी व मौजे बोरगाव (बारामती) इनाम दिले व ती गावे वंशपरंपरागत म्हणुन ईनाम दिले.तसेच खुद्द धनाजीरावानी पिराजी बीन चंडोजी,नरसोजी बीन जयताजी व महादजी बीन आबाजी यादव देशमुख परगणे व तर्फ उंब्रज व तारगाव परगणे मजकुर याजकडुन 5 गावचे (नागठाणे,अतीत,इंदोली,कसबे पाली व हिँगनोळे) देशमुखी वतन 2700 रुपयास खरेदी केले.राजाराम महाराजानी 1000 रुपये नजराणा घेऊन 5 गावचे देशमुखीचे वतनाबद्दल वंशपरंपरागत दुमालपञ करुन दिले.याशिवाय राजाराम महाराज वारल्यानंतर पिराजी बीन चंडोजी ,पदाजी बीन आबाजी व गिरजोजी बीन मुधोजी यादव देशमुख परगणे कराड याजकडुन 138 गावची देशमुखी खरेदी करुन घेतली,त्याबद्दल सरकारात नजराणा 5000 रुपये भरुन देशमुखीबद्दल कबुलायत करुन घेतली.धनाजीराव यांच्या अधिकाराखाली राजाराम महाराजाच्या निधनानंतर मुलकी व लष्करी ही 2ही सेवा होत्या परंतु यानी या स्वराज्याकरिता एवढी मोठी कामगिरी करुन 10-15 लाखाचा मुलुख तोडुन घेण्याऐवजी स्वार्थत्याग करुन फक्त 2 गावे इनाम घेतली व 138 गावे स्वतःच्या कमाईवर विकत घेतली.म्हणजे खरोखरच छञपती शिवराय महाराजांच्या विचाराच्या मुशीतुन घडलेले मावळेच.
7)राजाराम महाराजाच्या निधनानंतर मुलकी व लष्करी कार्य यांच्याच अधिकाराखाली होती व त्यानी ती लिलया पार पाडुन मोगलावर एक विलक्षण वचक बसवला कि मोगलांचे घोडे पाणी पिईनातसे झाले तर मोगल त्यास म्हणत,"क्योँ पानी पिता नही? पानिमे धनाजी नजर आता है क्या?
तसेच धनाजीराव यांचे आणखी एक वैशिष्ठये आढळते ते म्हणजे स्वराज्यातील बंडखोर बेरड नाईक लोकाना देखिल स्वराज्याच्या कार्यात सामावुन घेतले होते.
9) औरंगजेबाने मरतेवेळी धनाजीराव व मराठे याविषयी असे उद्गार काढले कि," आपण स्वतः दक्षिणेत येऊन 25 वर्श याजबरोबर युद्ध चालविले ही आपली फार मोठी चुक जाहली.धनसिँग जाधवराव ये कुछ इन्सान नही है,सैतान है.हमारे सायप्याज खाके आजतक लडता है और हमारी पातशाही यह छीन लेगा ऐसा हमे मालुम पडा है ".आणी असे बोलुन प्राण सोडला.
10) छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर आलेल्या औरंगजेब रुपी काळ्या ढगांना आपल्या तलवारीच्या चमकत्या पात्याने अन वाऱ्याच्या वेगाने दूर सारणाऱ्या त्या रणभैरव पराक्रमी
“सरसेनापती धनाजीराव जाधवराव”
11) धनाजीराव यानी शिवराय महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व शाहु महाराज या प्रत्येक छत्रपतीँच्या अधिकाराखाली अतुलनीय पराक्रम करुन खरोखरच या स्वराज्यासाठीच जन्मले आहेत हे सार्थ करुन दाखवले. धनाजीराव यांच्या म्रुत्युनंतर देखिल त्यांच्या वंशजानी या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावला परंतु पेशव्यानी मात्र त्यांच्या वंशजाना स्वराज्य सोडण्यास भाग पाडले....
११) वंशजशाखा - माळेगांव बुद्रुक , मांडवे व बोरगाव !!!
सरसेनापती धनाजीराव जाधवराव याना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा...... ......^.........
No comments:
Post a Comment