विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 19 June 2021

शाहू छत्रपतीं

 १९ जून इ.स.१७४३

शाहू छत्रपतींच्या दरबारात स. १७२४ मध्ये श्रीपतराव प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. “मराठ्यांनी प्रथम दक्षिण दिग्वजय करावा दक्षिणेत आपली सत्ता प्रस्थापून दक्षिण ताब्यात आणावी आणि मग उत्तरेकडे जावे.” प्रतिनिधीचे कोणीही ऐकले नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यास हिंदु पतपादशाहीचा झेंडा हिमालयापर्यंत घेऊन जाण्यास मुभा दिली. कर्नाटकमामला फत्तेसिंग भोसले याजवर सोंपविला. फत्तेसिंगानी १७२५-२६ मध्ये एक स्वारी कर्नाटकात नेली. दुसरी स्वारी चिंत्रदुर्गची बाजीराव पेशव्यांनी नेली. स. १७३९ मध्ये रघोजी भोसले व फत्तेसिंग या उभयतांनी कर्नाटकावर चाल करून तेथील नबाबास मारीले व तंजावरचा राजा प्रतापसिंग यास अभय दिले. ह्यावेळी रघुजीचा संबंध फ्रेंच सेनापती डुमासशी आला. बाळाजी बाजीराव यांस पेशवाई पद दिल्यावर छत्रपतीनी पेशवे पदासाठी झुंजणाऱ्या बाबुजी नाईकास कर्नाटक मामला दिला. वास्तविक कर्नाटक सुभा, विजापूर, भागानगर आणि तुंगभद्रा व
रामेश्वर मधील सर्व प्रदेश हा राजाच्या खाजगीकडचा. त्या सर्व प्रदेशात मुलूखगिरी करण्याचा हक्क बाबुजी नाईक बारामतीकर यांस शाहू महाराजांनी तारीख १९ जून १७४३ च्या हुकूमान्वये दिला. ह्या मोबदल्यात बाबुजी नाईकानी दरसाली महाराजास ७ लाख रुपये द्यावयाचे असून शिवाय ५ लाख रुपये खंडणी तंजावर राजाकडून घेऊन द्यावयाची असे बा. नाईकांनी कबूल केले होते. कर्नाटक क्षेत्र आपल्यास मिळाल्यावर बाबूजी नाईकांनी कर्नाटकात दोन स्वाऱ्या केल्या.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...