विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 June 2021

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान भाग २

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान

भाग २
प्रतापराव गुजर यांना चार अपत्य
पहिलं अपत्य जानकीबाई जी प्रतापरावांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस अगोदर राजाराम महाराज बरोबर लग्न लावले.
1689 मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि रायगडला इतिहादखान उर्फ झुल्फिकारखान चा वेढा पडला .झुल्फिकारखान च्या वेढ्यातून राजाराम महाराज आणि त्यांच्या तीन राण्या ताराबाई राजसबाई अंबिकाबाई शिवाय प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ संताजी धनाजी सर्व सुखरूप निसटून गेले .मात्र प्रतापराव गुर्जर यांची कन्या आणि राजाराम महाराजांची पहिली राणी जानकीबाई ह्या येसूबाई आणि शाहू महाराजा बरोबर मुघलांच्या तावडीत सापडले.तिथून जानकीबाई चा मुघल कैदेतच अंत झाला.कारण 1719 ला बाळाजी पेशवानी येसूबाई ला सोडवले त्यात त्यांचे नाव नव्हते.
औरंगझेबाने शाहू महाराजांना आणि येसूबाई आणि जानकीबाई ला कैदेत ठेवले, मात्र औरंग्याची मुलगी झेबुनिस्सा ने मात्र त्यांची काळजी घेतली.औरंग्याने अनेकदा शाहूमहाराजना मुस्लिम होण्याची सांगितले त्यावेळी झेबुनिस्सा ते टाळले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलाला युवराज शिवाजी ऊर्फ शाहू महाराजांच्या धर्मांतर करण्यासाठी बादशहा औरंगजेब यांना सन 1700साल आदेश दिला दिले तेव्हा पण महाराणी येसुबाई यांनी ज्योतोजी आणि झेबुनिस्सा द्वारे बादशहा शी अप्रत्यक्ष तह केला ज्यात औरंगजेब यांना एक अट वर शाहू महाराजांच्या धर्मांतर रहीत किंवा रद्द केले" तो बोलला...
मी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो।।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...