विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 19 June 2021

महाराणी लक्ष्मीबाईंचे अश्व : सारंगी, पवन, बादल, राजरत्न

 *****************************************


महाराणी लक्ष्मीबाईंचे अश्व : सारंगी, पवन, बादल, राजरत्न
पोस्तसांभार ::रितेश ठाकूर
१) सारंगी अश्व
श्रीमं महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या निधनानंतर झाशी वर महाराणी लक्ष्मीबाई यांचे शासन सुरू झाले. त्या जेवढ्या मोठ्या राजकर्त्या तेवढ्याच
मोठ्या चिकित्सक. १८५४ साली झाशी येथे अश्व विक्रेता आला. त्याच्याकडे अनेक प्रकारचे अश्व होते. काही भारतीय तर काही ब्रिटिश जातीतले अश्व होते. त्यातच एक भारतीय पांढऱ्या रंगाची नारी अश्व होते. महाराणी लक्ष्मीबाई यांनी पहिल्या नजरेतच ओळखले हे अश्व किती फायद्याचे आहे. महाराणी लक्ष्मीबाईंनी ते अश्व खरेदी करण्याचे प्रयत्न केले. पण त्या विक्रेत्याने अश्व विकण्यास नकार दिला. कारण त्या अश्वावर कोणी ही बसले तर ते अश्व त्या सवारीला खाली पाडत असे. तेव्हा महाराणी ने त्या अश्वाचे निरिक्षण करून आपल्या पशू चिकित्सकास त्या अश्वाची शस्र क्रिया करण्याचे सुचविले. आणि त्याच्या पोटाच खिळा असल्याचे सांगितले.
पशू चिकित्सकाने महाराणीच्या सांगितल्या प्रमाणे केले आणि खरोखरच त्या अश्वाच्या पोटात खिळ्याचा तुकडा निघाला. काही आठवड्यातच त्या अश्वाची स्वास्थ्य ठिक झाले. आणि ऐवढ्या जलद गती ने ते अश्व पळायचे की संपुर्ण बुंदेलखंडात त्या अश्वाचा सामना कोणी करीत नसे. महाराणी लक्ष्मीबाईंनी खुप प्रेमाणे ह्या अश्वाचे नाव "सारंगी" ठेवले.
स्री वा पुरूष वेशात सारंगी वर बसून महाराणी नगर भ्रमण करीत असे. तर दर शुक्रवारी महाराणी सारंगी वर बसुन कुलदेवी महालक्ष्मी मंदिरात जात असे.
सारंगी हे अश्व अतिशय प्रामाणिक. आपल्या मालकिनीला अर्थात महाराणीला युध्दात देखील साथ दिली. ४ एप्रिल १८५८ ला महाराणीने झाशी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्या दत्तक पुत्राला पाठिशी बाधले. आणि सारंगी वर स्वार होऊन शत्रूची फळी फोडून निसटून काल्पीला गेल्या. झाशीच्या लोककथे नुसार असे सांगितले जाते की महाराणी लक्ष्मीबाई सारंगी वर स्वार होऊन किल्ल्याच्या ३० फीट उंच कड्यावरून खाली उडी मारली. जख्मी अवस्थेत असताना ही महाराणीला सारंगी ३ तासात १०३ मैलाचे अंतर कापत झाशी वरून काल्पीला गेली. काल्पी, कोंच लढाईत ह्या सारंगी ने महाराणीला साथ दिली.
२२ मे १८५८ रोजी काल्पीच्या गुलौली युध्दानंतर महाराणी लक्ष्मीबाई यांची आवडती व प्रामाणिक घोडी सारंगीचा मृत्यु झाला.
आज आप जे काही राणीचे चित्र दुवा हतो त्यातील सफेद घोडा म्हणजे सारंगी अश्व.
२) पवन अश्व
पवन नावाचे हा पांढरा अश्व महाराणीचा पहिला अश्व होता. बिठूर येथे वास्तव्यास असताना अनेकदा महाराणी पवन ह्या अश्वावर बसुन घोडस्वारी, भाला फेक, बंदूक निशाणा, दांडपट्टा, दोन्ही हातांनी तलवार चालवणे ह्या सर्व कला रावसाहेब पेशवे, नानासाहेब पेशवे आणि बाळासाहेब पेशवे यांच्या बरोबर गुरू तात्या टोपेंकडून शिकल्या. पण एकदा घोडस्वारी करत असताना ह्या अश्वाला इजा झाली. त्यामुळे ह्या अश्वाला पळण्यात अत्यंत त्रास होत असे. १८५८ साली राणी किल्ला सोडून गेल्यावर ह्या अश्वाने किल्ल्यातच आपले प्राण त्यागले.
३) बादल अश्व
महाराणीचा विवाह झाल्यावर महाराज गंगाधररावांनी महाराणीला दहा गाव, दहा सालंकृत हत्ती व दहा अश्व भेट स्वरूपात दिले. त्यातील काळ्या रंगाचा हा अश्व म्हणजे बादल. राजमहालात असताना अनेक निर्बंध असताना महाराणी ह्या अश्वावरून फक्त घोडस्वारी करीत असे. काही काळानंतर आजारपणामुळे ह्या अश्वाचे निधन झाले.
४) राजरत्न अश्व
काल्पी युध्दात सारंगीचे मृत्यु झाल्यावर पेशव्यांच्या मराठा सेनेतील तात्या टोपे यांनी राजरत्न नावाने अश्व महाराणीला दिले. ह्याच अश्वावर स्वार होऊन महाराणी ग्वाल्हेरचे युध्द लढल्या. १६ जून १८५८ पर्यंत हा अश्व महाराणी बरोबर होता. युध्दामुळे हा अश्व खुप थकला होता. म्हणून महाराणी ने ह्या अश्वाला मुरार छावणीत सोडून दिले. आणि ह्या बदल्यात सिंधिया राजांच्या अश्वशाळेतील नविन अश्व घेतले. हेच अश्व ओढा पार करू न शकल्या कारणाने महाराणी लक्ष्मीबाई ह्या युध्दात धारातीर्थी पडल्या. जर ह्या युध्दात सारंगी असती तर नक्कीच इतिहास आज वेगळा असता.
तर अश्या प्रकारचे महाराणी लक्ष्मीबाईंवर त्यांचे हे अश्व प्रेम करीत असे. ऐवढच नाही महाराणी आपल्या ह्या सर्व अश्वाची काळजी घेत असत. सर्व अश्वांना गुळ, चणे, उस खाऊ घालत. महाराणी लक्ष्मीबाई नेहमी आधी अश्व मग दत्तक पुत्र यांना खाऊ घातल्यावर स्वतः भोजन करीत असे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...