विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 19 June 2021

श्रीमंत युवराज लक्ष्मणराव झाँसीवाले (नेवाळकर)

 *****************************************


श्रीमंत युवराज लक्ष्मणराव झाँसीवाले (नेवाळकर)
पोस्तसांभार ::रितेश ठाकूर
जन्म :- २३ अॉक्टोबर १८७९
मुळनिवासी :- कोट, रत्नागिरी
रहिवासी :- इंदूर
मृत्यु :- ४ मे १९५९
श्रीमंत युवराज लक्ष्मणराव हे श्रीमंत दामोदरराव नेवाळकर यांचे पुत्र होते. अर्थात झाशीचे राजकुमार. यांचा जन्म २३ अॉक्टोबर १८७९ साली इंदूर येथे झाला. इंग्रजांनी दामोदररावासह लक्ष्मणरावांवर ही बाहेर जाण्यास बंदी घातलेली. इंदूर रेसिडेंसी मधून ह्यांना प्रति मास २०० रूपये पेंशन येत असे. वडील दामोदरराव यांच्या मृत्यूनंतर ही पेंशन १०० रूपये करण्यात आली. १९२३ साली पुन्हा पेंशन ५० रूपये करण्यात आली. नंतर ही पेंशन बंद झाली.
भारत स्वातंत्र्य झाल्यावर १९५१ साली उत्तर प्रदेश सरकारने लक्ष्मणरावांच्या आर्थिक मदतीसाठी ५० रूपये पेंशन देऊ केले. पुढे ही रककम ७५ रूपये करण्यात आली. वडील दामोदररावांप्रमाणे लक्ष्मरावांनी ही अनेक वेळा झाशीचे राज्यअधिकार परत मिळवायचा प्रयत्न केला. इंग्रज सरकारांनी त्यांचे निवेदन नाकारले. व दामोदररावांच्या मालकीचे सहा लक्ष रूपये ही देण्यास नकार दिला. लक्ष्मणराव हे अत्यंत स्वाभिमानी होते. त्यांनी इंदूर मध्ये नोकरी सुध्दा केली. त्यांनी झाशीच्या नेवाळकरांना कोणी विसरू नये म्हणून स्वतःचे आडनाव नेवाळकरच्या ऐवजी झांसीवाले असे धारण केले. राणी लक्ष्मीबाईंची पिढी आज ही हेच आडनाव लावतात.
उतारत्या वयात लक्ष्मणरावांनी महाश्वेता देवी यांची झांसी की रानी हे पुस्तक लिहीण्यास सहाय्य केले. हे पुस्तक लिहीण्यात लक्ष्मणरावांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक माहिती लक्ष्मणराव आणि गोविंदराव यांच्या तसेच इतर मंडळीच्या माध्यामातून लिहले गेले.
लक्ष्मणराव यांना कृष्णराव व चंद्रकांतराव अशी दोन मुले होती.
४ मे , १९५९ रोजी इंदूर येथे श्रीमंत लक्ष्मणराव यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...