पंडिता रायबागन
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला माहूरचा किल्ला म्हणजेच रामगड, या किल्ल्याचा अखेरचा तट यादव राजा रामदेवाने बांधला. त्यावरुन याला रामगड हे नाव पडले.
माहूरचा किल्ला चौदाव्या शतकात गोंड राजांनी जिंकला, त्यानंतर इमादशाही व निजामशाही कडे हा किल्ला गेला. १७ व्या शतकात निजामशाही संपल्यानंतर हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला.
या किल्ल्याचे किल्लेदार होते उदाराम, त्यांच्या निधनानंतर त्याची पत्नी रायबागन म्हणजेच सावित्रीबाई उदाराम या शूर स्त्रीने सर्व सूत्र हातात घेतली.
ही रायबागन फार शूरवीर होती, औरंगजेबाने तिला स्त्रीशार्दूल ही पदवी दिली होती.
कोकणच्या अवघड मोहिमेवर उजबेग वंशातील सरदार कारतलब खानाची निवड झाली, याने नोव्हेंबर १६६० मध्ये आदिलशहाचा परिंडा हा बलाढ्य किल्ला जिंकला होता. त्याच्यासोबत ही रायबागन होती.
कवींद्र उवाच
स कारतलबं नाम यवनं कार्यकारिणम्।
पुरस्थितं समाहूय मिथः एतदभाषत।।५२।।
अर्थ : कवींद्र म्हणाला, समोर असलेल्या कारतलब नावाच्या कार्यकर्त्या यवनास बोलावून त्यास तो असे म्हणाला
कच्छपाश्चाहुबाणाश्च महाप्राणा महायुधाः।
तथैवामरसिंहोऽपि मित्रसेनः सबांधवः।।६०।।
गाढान्वयः सर्जराजो राजव्याघ्री च दुर्धरा।
जसवंतश्च कोकाटो यादवश्च महाभुजः।।६१।।
एतेऽति महिताः सैन्यसहिताः प्रहिता मया।
सैन्यास्त्वामनुयातारो विरोचनमिवासुराः।।६२।।
अर्थ : महाबलवान व पराक्रमी (मोठी आयुधे असलेले) कछप व चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, अजिंक्य रायबागीन, जसवंत कोकाटे, महाबाहू जाधव हे असे अत्यंत माननीय असे मी सैन्यासह पाठवलेले सेनानायक विरोचनामागून जसे असुर गेले तसे तूझ्यामागून येतील.
औरंगजेबाने या रायबागीन ला स्त्रीशार्दूल या नावाने गौरविल होत यावरून च लक्षात येत की ही स्त्री फार पराक्रमी आणि यूद्धकौशल्य निपुण असणार.
या च बरोबर रायबागीन ही राजकारण धुरंधर असणार याचा प्रत्यय श्री शिवभारत मधील अध्याय २९ मध्ये आपल्याला येतो.
कवींद्र उवाच
अथ द्युतिपतौ देवे दिवो मध्यमुपागते।
समेत्य शिवतेजोभिः संतापयितुमुद्यते।।१।।
अवीक्षितवने तस्मिन विपक्षविहितावने।
अलभ्यमानपवने दूयमानं महावने।।२।।
विलोक्यानीकमखिलं विषीदंतमनेकधा।
जगाद कारतलबं राजव्याघ्री मदोद्धता।।३।।
कवींद्र म्हणतो,
नंतर सूर्य मध्यान्ही येऊन शिवाजीच्या तेजाबरोबर ताप देऊ लागला असता, पूर्वी कधी न पाहिलेल्या, शत्रूच्या (मराठ्यांच्या) रक्षणाखाली असणाऱ्या, वारा मुळीच नसणाऱ्या, अशा महारण्यामध्ये सगळे सैन्य दुःखी होऊन धीर सोडताना पाहून मदोन्मत्त रायबागीन कारतलबास म्हणाली
राजव्याघ्री उवाच
अंकरोपितसैन्यस्त्वमकरोः कर्मगर्हितम।
प्राविशः सहसा येन शिवसिंहाश्रयं वनं।।४।।
रायबागीन म्हणाली
शिवाजीरूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनांत सैन्यासह प्रवेश केलास हे तू फार वाईट काम केलेस!
बत त्वया समानीय सैन्यं दिल्लीपतेरिह।
अहो महोत्साहवता पंचाननमुखेऽअर्पितम्।।५।।
दिल्लीपतीचे सैन्य येथे घेऊन येऊन ते त्वा गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय!
अद्ययावद् यशो यावदिंद्रप्रस्थभृतार्जतम्।
तत्तस्य भवतामुष्मिन् विपिने विनिमज्जितम्।।६।।
आजपर्यंत दिल्लीपतीने जेवढे यश मिळविले ते त्याचे सारे यश तू ह्या अरण्यात बुडविलेस!
पश्चात् पुरस्ताच्च पुनः सव्यदक्षिणपार्श्वयोः।
स्थिता पश्य युयुत्संते सोत्सवाः परिपंथिनः।।७।।
पहा! मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत.
अमी सर्वे सुप्रयोगसायकास्तव सैनिकाः।
तूष्णीमेवासते ह्यत्र बतालेख्यगता इव।।८।।
हे पटाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक येथे चित्रांतील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत!
अहो दिल्लींद्रसेनानीः शास्ताखानोऽल्पचेतनः।
परिपंथिप्रतापाग्नौ ससैन्यं त्वामपातयत्।।९।।
खेदाची गोष्ट की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाएस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरूपी अग्नीमध्ये तूला ससैन्य टाकले!
जीवग्राहं निगृहाशु द्वेषनस्त्वां निनीषति।
त्वं त्वंध इव कांतारे रुद्धो युद्धं चिकीर्षसि।।१०।।
शत्रू तूला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे. तू मात्र अरण्यात कोंडला गेला असून आंधळ्याप्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस.
सत्यां हि फलनिष्पत्तौ पुरुषस्येह पौरूषम्।
परथा परिहास्याय तदेव खलू साहसं।।११।।
फलनिष्पत्ती होत असेल, तरच पुरूषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत होते.
तदद्य सद्य एव त्वं तं प्रपद्य महीभृतम्।
अये ससैन्यमात्मानं मृत्युपाशाद् विमोचय।।१२।।
म्हणून तू आज लगेच त्या राजास (शिवाजीस) शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातून सोडीव.
वरील प्रसंगातून आपल्याला रायबागीन चे युद्धातील डावपेचाची समज, राजकारणातील समज, स्पष्टवक्तेपणा, प्रसंगावधान हे गूण दिसून येतात.
संदर्भ :
वेध महामानवाचा (डॉ. श्रीनिवास सामंत)
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज खंड २
शिवभारत अध्याय २८ (श्लोक क्र ५२)
शिवभारत अध्याय २८ (श्लोक क्र ६० ते ६२)
शिवभारत अध्याय २९ (श्लोक क्र १ ते १२)
संकलन
आयशा आस्मा
९६१९९७१४९५
No comments:
Post a Comment