।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।
भाग १
..................................................
शिवकाळातील त्यावेळचे एक तालेवार 96 कुळी मराठे घराणे.. सरदार कृषणाजी कदमबांडे हे मोठे पराक्रमी.. हा त्यांचा वाडा आता जीर्ण अवस्थेत असून तटबंदी मजबूत आहे आळकुटी ता पारनेर जि नगर ठिकाण (कल्याण,-आळेफाटा- आलकुटी- पारनेर हमरस्त्यावर आहे त्यांचा थोडक्यात इतिहास त्याचे वंशज ऋषी कदमबांडे +91 7030122015
यांसकडून मिळाला
त्यांना परीसरातील गावाची जहागरी मिळाली.. थोड्याच कालावधीत त्यानी अळकुटी जहागीरी नावारूपास आणली.. निजामशाहीकडून लढताना त्यानी मोठा पराक्रम गाजवला.. संपूर्ण जुन्नर परगणा व अहमदनगरच्या निजामशाहीपर्यंत त्याचा दबदबा वाढला होता. त्याकाळात शहाजीराजे भोसले निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. त्यामुळे कृष्णराव कदमबांडे यांचा शहाजीराजे व जुन्नरचे किल्लेदार विजयराजे यांच्याशी अतीशय स्नेह होता. तो काळच धामधुमीचा होता. निजामशाही, अदिलशाही व मोगल यांचा सत्तासंर्घष पराकोटीला पोहचला होता. जुन्नर फिरत्या चक्रॅप्रमाणे निजाम,अदिल, मोगल यांच्याकडे जात होता. कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे िनजामशाहीकडून मोठा पराक्रं गाजिवत होते. िन
निजामशहाकडून त्यांना बढती मिळाली. 1628 साली या भागात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी हे गाव दिशणेकडे 1 मैल अंतरावर मुबलक पाण्याच्या ठिकाणी सपाट प्रदेशात आवळकंठीच्या बनात एका छोट्या नदीिकनारी त्यांनी अळकुटीची स्थापना केली. आवऴकंठीचे बन साफ करुन नियोजनपूर्वक तेथे सुंदर नगर वसिवले. दिवसेंिदवस येथील वस्ती वाढू लागली. अऴकुटीचे एका छोट्या शहरात रुपांतर झाले. आवळकंठी बनात हे गाव वसल्यामुऴे अमरापूर उर्फ आवळकंठी हे गावाचे नाव रुढ झाले. येथे त्यांनी छोटा वाडा बाधंला, एके दिवशी शहाजीराजे जुन्नरकडे जात असताना राञ झाल्यामुऴे कृषणराव कदमबांडेच्या वाड्यात मुक्कामाला गेले. त्यावेळी शहाजीराजेंसोबत गरोदर जिजाऊही होत्या. जिजाऊमाता गरोदर असल्यामुळे मार्गक्मणाला मर्यादा पडत होत्या. कृष्णराव कदमबांडेंना खूप आंनद झाला. प्रत्यक्षात शहाजीराजे व जिजाऊ आपल्या घरी मुक्कामाने कृष्णराव धन्य झाले. असे म्हणतात की, दोन दिवस राजांना ठेवून घेतले. खूप सेवा केली. जिजाऊंचा यथोचित मानसन्मान केला. त्याची ओटी भरली. शहाजीराजांनी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर आपले व्याही विजयराजे विश्वासराव यांचेकडे जिजाऊ यांना ठेवून राजे पुढील मोिहमेकरता रवाना झाले. थोड्याच दिवसात शिवनेरीवर ते स्वातंञ्यसुर्य उगवले.. ज्यांनी मराठी मुहूर्तमेढ रोवून स्वराज्यात रुपांतर केले. त्या एका घटनेने अळकुटीची भूमी पिवञ झाली. कृष्णराव कदमबांडे कृतकृत्य झाले
No comments:
Post a Comment